एक्स्प्लोर

Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले

Beed Cyber Fraud Share Trading Case : जास्त नफ्याचे आमिष दाखवून आणि बनावट SEBI प्रमाणपत्र पाठवून तब्बल 7 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बीड : सुशिक्षित आणि तंत्रज्ञानाची माहिती असलेल्या नागरिकांनाही सायबर भामटे कसं सहज गंडवू शकतात, याचं एक धक्कादायक उदाहरण बीड जिल्ह्यातून समोर आलं आहे. बीडच्या गेवराई (Gevrai) येथील एका आयटी (IT) कंपनीत काम करणाऱ्या इंजिनियरला शेअर ट्रेडिंगमध्ये (Share Trading) गुंतवणूक करून बंपर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आलं. त्यानंतर तब्बल 7 लाख 80 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित इंजिनियरने बीड सायबर पोलीस ठाण्यात (Beed Cyber Police Station) धाव घेऊन दोन अज्ञात सायबर चोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.

Beed Cyber Crime : 'सुनील' नावाच्या व्यक्तीचा आला फोन, असा जिंकला विश्वास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेवराई येथील आयटी इंजिनियर दत्तात्रय सूर्यभान खराद यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरून मेसेज आणि कॉल आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव सुनील असल्याचे सांगितले. आपण 'ट्रेडिंग ॲडव्हायझरी' (Trading Advisory) सेवा देत असून शेअर मार्केटमधून कमी दिवसांत खूप मोठा नफा मिळवून देऊ शकतो, असे आमिष त्याने दत्तात्रय यांना दाखवले.

त्यानंतर सुनीलने त्यांना विवेक नावाच्या ब्रोकरमार्फत स्वतःचे ट्रेडिंग खाते (Trading Account) उघडण्यास सांगितले. सायबर चोरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दत्तात्रय यांनी आपली ओळखपत्रे पाठवून सुरुवातीला 30 हजार रुपयांची गुंतवणूक केली.

Fake SEBI Certificate : नुकसान भरपाईच्या नावाखाली उकळले लाखो रुपये

तक्रारदाराचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने त्यांना 'मार्केट प्लीज इन्व्हेस्टमेंट लिमिटेड' आणि 'भवानी स्टॉक ब्रोकर' नावाच्या वेगवेगळ्या खात्यांवर ट्रेडिंग करण्यास भाग पाडले. काही दिवसांनंतर दत्तात्रय यांना शेअर होल्डिंग आणि झालेल्या नुकसानीची भरपाई करून देतो, असे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यांवर 6 लाख 80 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास लावले. एवढ्यावरच न थांबता नफ्यातील हिस्सा देण्याच्या बहाण्याने आणखी 40 हजार रुपये उकळले.

आरोपी सतत आणखी पैशांची मागणी करत असल्याने दत्तात्रय यांना संशय आला. त्यांनी या कंपनीचे अधिकृत 'सेबी' (SEBI Securities and Exchange Board of India) नोंदणी प्रमाणपत्र मागितले. त्यावर सायबर चोरांनी त्यांना एक प्रमाणपत्र पाठवले, मात्र पडताळणी केली असता ते पूर्णपणे बनावट (Fake Certificate) असल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच दत्तात्रय यांनी सायबर पोलिसांत तक्रार नोंदवली.

शेअर मार्केट किंवा ट्रेडिंगच्या नावाखाली अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या कोणत्याही कॉल किंवा मेसेजला बळी पडू नका. गुंतवणूक करण्यापूर्वी ती संस्था 'सेबी' नोंदणीकृत आहे की नाही, याची अधिकृत संकेतस्थळावर जाऊन खात्री करा, असं आवाहन सायबर सेलने केलं आहे. 

ही बातमी वाचा: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकमेकाकडं पाहण्याच्या कारणावरुन वाद, परांड्यात भर चौकात तुंबळ हाणामारी, अनेकजण जखमी
एकमेकाकडं पाहण्याच्या कारणावरुन वाद, परांड्यात भर चौकात तुंबळ हाणामारी, अनेकजण जखमी
सैन्यदलातील जवानाने सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवलं, वाशिम जिल्ह्यात खळबळ, दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा नातेवाईकांचा आरोप
सैन्यदलातील जवानाने सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवलं, वाशिम जिल्ह्यात खळबळ, दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा नातेवाईकांचा आरोप
Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
Baramati Crime News: 'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget