एक्स्प्लोर

धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय

5 जुलैच्या संध्याकाळी अफरोज उर्फ भाईजान पठाण या पेरोलवर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराने त्याच्या एका सहकारी गुन्हेगाराससह चाकूचा धाक दाखवत सुहास हजारे या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यासह लुटले होते.

नागपूर : मुलाच्या ऑपरेशनसाठी तुरुंगातून पेरोलवर सुटलेला आरोपी पोलिसांच्या (Police) डोळ्यात धुळफेक करुन मुलाच्या ऑपरेशनपूर्वीच पुन्हा स्वत:हून तुरुंगात जाऊन जमा झाला. माझा पेरोल घेण्याचा उद्दिष्ट पूर्ण झाला आहे, आता मला तुरुंगातच ठेवा, असे म्हणत आरोपी अफरोज उर्फ भाईजान पठाणने पेरोलवरुन तुरुंगात जाणे पसंत केले. नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील फुकेश्वर भागात चाकूचा धाक दाखवत एका कुटुंबाला लुटणाऱ्या गुन्ह्यात हाच आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे अखेर पोलिसांच्या तपासातून समोर आले. नागपूर ग्रामीण पोलिसांपासून वाचण्यासाठीच त्याने असा डाव रचला होता. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासापुढे त्याचं काहीच चाललं नाही आणि अखेर तुरुंगात जाऊन लपू पाहणाऱ्या त्या गुन्हेगाराला लुटीच्या गुन्ह्यातही अटक झाली. 

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी पोलीस स्टेशन अंतर्गत फुकेश्वर शिवारात 5 जुलैच्या संध्याकाळी अफरोज उर्फ भाईजान पठाण या पेरोलवर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराने त्याच्या एका सहकारी गुन्हेगाराससह चाकूचा धाक दाखवत सुहास हजारे या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यासह लुटले होते. आपल्या कुटुंबासह ते कारने जात असताना त्यांची लूट करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे लुटीच्या या घटनेतील प्रमुख आरोपी "अफरोज उर्फ भाईजान पठाण" हा अमरावती तुरुंगातून पेरोलवर बाहेर आला होता, आणि पेरोलवर असताना त्याने आणखी एका गुन्हेगाराच्या मदतीने ही लूट केली होती.

लुटीच्या घटनेच्या वेळेला मागच्या सीटवर बसलेल्या हजारे यांच्या मुलीने लुटीची संपूर्ण घटना मोबाईलमध्ये चित्रित केली होती. मोबाईल फुटेजमध्ये दिसत असलेल्या चेहऱ्यांचा शोध घेत पोलिसांनी घटनास्थळापासून 25 किलोमीटरच्या संपूर्ण परिसरातील प्रत्येक सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्याच्या आधारावर पोलीस अफरोज उर्फ भाईजान पठाणच्या खरबी परिसरात जाऊन पोहोचले. अफरोज पठाणचा फोटो दाखवत पोलीस त्या भागात शोध घेत असताना त्याची माहिती अफरोज पठाणला मिळाली. माहिती मिळताच आपल्या मुलाच्या ऑपरेशन साठी एक महिन्याच्या पेरोलवर अमरावती तुरुंगातून सुटलेल्या अफरोज पठाण ने लगेच तुरुंगात जाण्याचा निर्णय घेतला आणि 11 जुलै च्या रात्री ( 10 आणि 11 जुलै ची मध्य रात्र) अमरावती तुरुंगात जाऊन मी पेरोल वरून परत आलो, माझे काम संपले, आता मला तुरुंगात घ्या अशी विनंती करत स्वतःहून तुरुंगात जमा झाला. (तुरुंग अधिकाऱ्यांना अफरोजने बाहेर काय प्रताप केले आहे याची माहिती नसल्यामुळे त्यांनी त्याला तुरुंगात जमा करून घेतले ...)

पोलिसांपुढे अफरोजचे बिंग फुटले

दरम्यान, नागपूर पोलीस लुटीच्या घटनेचा शोध घेत अफरोज पठाणच्या घरापर्यंत पोहोचल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी तो तर अनेक दिवसांपासून तुरुंगात असल्याचा बनाव केला. नागपूर पोलिसांनी अमरावती तुरुंग प्रशासनाशी संपर्क साधल्यावर अफरोज पठाणचं बिंग फुटलं. तो पेरोलवर बाहेर होता आणि 11 जुलै च्या रात्री तो तुरुंगात पोहोचल्याचे स्पष्ट झाले. नागपूर पोलिसांनी अमरावती तुरुंगातून अफरोज पठाणला लुटीच्या घटनेत ताब्यात घेतले आहे.. त्याच्या सहकार्यालाही वाठोडा परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी सराईत गुन्हेगाराने चक्क तुरुंगातच लपण्याचा डाव रचला होता. मात्र, पोलिसांसमोर त्याचा हाड डाव अपयशी ठरल्याचे उघडकीस आले. 

हेही वाचा

मुलगी झाल्यामुळे सासरच्यांनी कोल्हापूरात विवाहितेला संपवल्याचा आरोप, नवरा, सासू-सासरे अन् नणंदेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
Antilia Bomb Scare Case : अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
Sangli Crime : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण
चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
West Zone Squad for Duleep Trophy : ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
Dhananjay Munde: आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
Sinhagad Fort Closed : मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
Middle East Crisis: 'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
Embed widget