एक्स्प्लोर

Beed Crime News: बीडच्या माजी सरपंचाचा तामिळनाडूमध्ये प्रताप, बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी बेड्या; पेट्रोल पंपावर 'असा' झाला भांडाफोड

Beed Crime News: बीडच्या केज तालुक्यातील डोका गावच्या माजी सरपंचासह अन्य एकास तामिळनाडू पोलिसांनी अटक केली आहे.

Beed Crime News: बीड (Beed) जिल्ह्यातील केज (Kej) तालुक्यातील एका माजी सरपंचाने आणि कृषी पंप व्यापाऱ्याने तामिळनाडू राज्यात बनावट नोटा (Fake Notes) चलनात आणण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील थुवाकुडी पोलिसांनी (Police) या दोघांना अटक करत तब्बल 8 लाख 37 हजार 800 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पुढील तपास आता तामिळनाडू गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला आहे.

Beed Crime News: पेट्रोल पंपावर 'असा' झाला भांडाफोड 

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये केज तालुक्यातील माजी सरपंच रमेश बाबुराव भांगे आणि मूळचा राजस्थानचा असलेला कृषी पंप व्यापारी नारायण राम पटेल यांचा समावेश आहे. हे दोघे त्यांच्या खाजगी कारने तामिळनाडूच्या दौऱ्यावर गेले होते. बुधवारी तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावर इंधन भरताना त्यांनी 200 रुपयांच्या काही नोटा दिल्या. आरोपी निघून गेल्यानंतर पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला नोटांचा कागद व स्पर्श संशयास्पद वाटला. सतर्कता दाखवत त्याने तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली.

Beed Crime News: चेकपोस्टवर कार अडवली, कारवाईत मोठा खुलासा

पोलिसांनी माहिती मिळताच मंजाथिदल चेकपोस्टवर सापळा रचत संबंधित कार अडवली. कारची झडती घेतल्यानंतर पोलिस अधिकारीही थक्क झाले. कारमध्ये 200 रुपयांच्या नोटांचे तब्बल 41 बंडल लपवून ठेवलेले आढळून आले. तपासात या सर्व नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले, ज्यांची एकूण रक्कम 8 लाख 37 हजार 800 रुपये इतकी आहे.

Beed Crime News: इतर शहरांतही बनावट नोटा चलनात

पोलिस तपासादरम्यान आरोपींनी मदुराई, पुदुक्कोट्टई आणि तंजावर परिसरात यापूर्वीही अनेक बनावट नोटा चलनात आणल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ एका घटनेपुरते मर्यादित नसून, मोठ्या रॅकेटचा भाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Beed Crime News: रॅकेटमागील सूत्रधार कोण?

या बनावट नोटा आरोपींना कोणी पुरवल्या? या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे? आणि तामिळनाडूमध्ये त्यांना कोणाचा आश्रय मिळत होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता गुप्त वार्ता विभाग आणि CID कडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात केज तालुक्यातील माजी सरपंचाचा सहभाग उघड झाल्याने, बीड जिल्ह्यासह स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आणखी वाचा 

Nashik Crime News: दारूच्या नशेत खटके उडाले, बायको झोपेत असतानाच उपसरपंच पतीने काढला काटा; नाशिक हादरलं!

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget