Beed Crime News : वडील शासकीय सेवेत, मुलं निघाले चोर; बीड पोलिसांनी थेट गुजरातमधून दोघांना घेतलं ताब्यात
Online Fraud : पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत आरोपींना गुजरातमधील अटक केली असून, आरोपींचे वडील गुजरातमध्ये शासकीय सवेत नोकरी करतात.
बीड : शहरातील एका व्यापाऱ्याची ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) करून एक लाख रुपये लुटल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र, बीडच्या (Beed) सायबर पोलिसांनी (Cyber Police) या प्रकरणातील दोन आरोपींना थेट गुजरातमधून (Gujarat) ताब्यात घेत अटक केली आहे. ऑनलाईन ॲपवरून (Online App) मागवलेला ड्रेस परत करण्यासाठी या व्यापाऱ्याला एक अज्ञात नंबरवरून फोन आला होता. तसेच, त्याने एका लिंकवर माहिती भरून ओटीपी (OTP) देखील भरला होता. ज्यामुळे खात्यावरून 99 हजार 999 रुपय गायब झाले होते. पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत आरोपींना गुजरातमधील अटक केली असून, आरोपींचे वडील गुजरातमध्ये शासकीय सवेत नोकरी करतात.
बीड शहरातील एका किराणा दुकानदाराला फसवून त्याची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना बीडच्या सायबर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. बीडमधील प्रसाद देवळे यांची शाहूनगर भागामध्ये एक किराणा दुकान असून, त्यांनी ऑनलाईन ॲपवरून एक ड्रेस मागवला होता. मात्र, ड्रेस न आवडल्याने त्यांनी तो रद्द केला. दरम्यान, दोन दिवसांनी एक अनोळखी मोबाईल नंबरवरून त्यांना फोन आला आणि ड्रेस रद्द करायचा असेल तर एका लिंकवर जाऊन माहिती भरावी लागेल असे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी अनोळखी व्यक्तीने पाठवलेली लिंक ओपनकरून त्यामध्ये सर्व माहिती भरली. माहिती भरत असताना त्यांनी एक ओटीपी ही त्यामध्ये टाकला आणि समोरच्या व्यक्तीने त्यांना ऑनलाईन पाच रुपये पाठवण्यास सांगितलं. त्यानंतर दोन दिवसांनी प्रसाद देवळे हे बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता, त्यांच्या खात्यावरून 99 हजार 999 रुपय ऑनलाइन पद्धतीने काढून घेतले असल्याची माहिती त्यांना मिळाली.
पोलिसांनी थेट गुजरात गाठलं...
आपली फसवणूक झाल्याचा देवळे यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला. सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक तपासाला सुरुवात केली. देवळे यांच्या अकाउंटवरून काढण्यात आलेले पैसे कोणत्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले याची माहिती पोलिसांनी गोळा केली. तसेच, त्यांना ज्या अज्ञात व्यक्तीने फोन केला होता त्याच्या लोकेशनवरून पोलीस थेट गुजरातमध्ये पोहोचले. तसेच, गुजरातमधून जयेश आणि निखिल या दोन आरोपींना प्रसाद देवळे यांची एक लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
वडील शासकीय सवेत, मुलं ऑनलाइन फसवणूक करण्यात तरबेज
या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी जयेश आणि निखिल हे दोघेही उच्चभ्रू घरातील असून, दोघांचेही वडील गुजरात सरकारच्या शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत. परंतु, पैशांसाठी त्यांच्याकडून अशाप्रकारे लोकांची फसवणूक केली जात होती. तर वडील शासकीय नोकरी करत असतांना मुलं ऑनलाइन फसवणूक करण्यात तरबेज असल्याचे पाहून बीड पोलिसांना देखील धक्का बसला.
इतर महत्वाच्या बातम्या:
Cyber Fraud : परदेशातून चालणाऱ्या 100 वेबसाईट्स सरकारकडून बंद; कारण आलं समोर