एक्स्प्लोर

Beed Crime : खळबळजनक! अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवण्याचा कट? बीडच्या तरुणाला थेट पाकिस्तानातून मेसेज

Beed Crime : अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्याचा मेसेज बीडच्या एका तरुणाला थेट पाकिस्तानातून आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Beed Crime : अयोध्येतील श्रीराम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उडवून देण्याचा मेसेज बीडच्या (Beed News) एका तरुणाला थेट पाकिस्तानातून (Pakistan) आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात शिरूर कासार पोलीस ठाण्यात तरुणाने तक्रार देखील दिली. या तरुणाला मंदिर उडवण्यासाठी 1 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली असून, कटात सहभागी होण्यासाठी आणखी 50 लोकांची आवश्यकता असल्याचेही मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या तरुणाने शिरूर कासार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक मेसेज आला. या मेसेजमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी दिली. आपण पाकिस्तानी आहोत हे पटवून देण्यासाठी संशयीने कराचीतील लोकेशनही तरुणाला पाठवले. शिवाय कटात सहभागी होण्यासाठी एक लाख रुपयांची ऑफर दिली. या कामासाठी 50 जण हवे असून त्यांना प्रत्येकी एक लाख देऊ तर मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्स पुरवू असे संशयिताने मेसेजद्वारे सांगितले आहे.

संशयिताविरोधात गुन्हा दाखल

मेसेज पाठवणाऱ्याने पाकिस्तानातील कराची येथील लोकेशनही शेअर केले आहे. या खळबळजनक घटनेनंतर तरुणाने शिरूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीनुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. हा नेमका काय प्रकार आहे? हे तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता पोलिसांच्या तपासात नेमकी काय माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

याआधीही राम मंदिर उडवण्याच्या धमक्या

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराला धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. सप्टेबर 2024 मध्ये एका तरुणाने सोशल मीडियावर धमकी दिली होती. त्यानंतर त्याला बिहारच्या भागलपूरमधून अटक करण्यात आली होती. जानेवारी 2024 मध्ये प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वीच अनेक धमक्या आल्या होत्या. यानंतर एप्रिल 2025 मध्ये अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई मेल अयोध्या राम मंदिर ट्रस्ट आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांच्या डीएमना आला होता. हा ई मेल तामिळनाडूतून आल्याची माहिती समोर आली होती. तर 'मंदिराची सुरक्षा वाढवा' असं देखील धमकीच्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले होते. आता बीडच्या तरूणाला थेट पाकिस्तानमधून अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्यासाठी मेसेज आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा 

Beed Crime News: बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या कारागृहात आढलेल्या फोनचा पोलिस काढणार सीडीआर; त्यात सीमकार्ड नसताना...

महत्त्वाच्या बातम्या

कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले

Embed widget