Beed Crime : अल्पवयीन मुलीचे अत्याचार प्रकरण; मुलीला जेवण्याचं अमीष दाखवून अत्याचार करणारा नराधम गजाआड
या अल्पवयीन मुलीच्या बाल विवाह संदर्भात आणि पोक्सो कायदा अंतर्गत आतापर्यंत 15 जणांची चौकशी पोलिसांनी केली आहे. त्यापैकी आठ जणांना आतापर्यंत ताब्यात घेतल आहे.
बीड : बीडच्या अंबाजोगाईमध्ये एका अल्पवयीन मुलीवर गेले सहा महिन्यात अनेकांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन विवाहीत मुलीला नवऱ्याने घराबाहेर हाकलून दिल्याने आणि वडीलांनी आश्रय न दिल्याने ती भीक मागून खात होती. तीच्या असहायतेचा गैरफायदा घेत तीला जेवण देण्याचे अमिष दाखवून सोबत नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने पोलीसांनी एका आरोपी ला ताब्यात घेतले असून अत्याचार करणारा दुसरा आरोपी गुन्हा दाखल झाल्या पासून फरार होता. त्यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
सावरगाव मधील दोघांनी पीडीत मुलीला जेवण देण्याचे आमिष दाखवून सोबत नेत आडस रोडवर पंधरा दिवसांपूर्वी अत्याचार केला होता. मुलीच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासी अधीकारी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी एका आरोपीला अटक केले होते, मात्र दुसरा आरोपी फरार होता. पोलिसांनी त्यास धारूर तालुक्यातून अटक करून त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या अल्पवयीन मुलीच्या बाल विवाह संदर्भात आणि पोक्सो कायदा अंतर्गत आतापर्यंत 15 जणांची चौकशी पोलिसांनी केली आहे. त्यापैकी आठ जणांना आतापर्यंत ताब्यात घेतल आहे. अंबाजोगाई शहरातील आंटी आणि निलंबित मुख्याध्यापकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या दोघांच्या विरोधात यापूर्वीसुद्धा स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या.
काय आहे प्रकरण?
पीडीत मुलीचं न कळत्या वयात लग्न झालं होतं मात्र सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून या मुलीनं घर सोडलं. मात्र तिचे हाल तिथे संपले नाहीत. बेघर असलेल्या या मुलीवर गेल्या सहा महिन्यांपासून अत्याचार सुरू होते. अंबाजोगाई हे शिक्षणाचे माहेरघर आणि मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. या शहरामध्ये मागच्या सहा महिन्यापासून एका बेघर झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार चालू होता. अखेर एका महिलेने रस्त्यावर फिरणाऱ्या या मुलीला जवळ बोलावले आणि हे दाहक वास्तव समोर आलं.
घरातून बाहेर पडल्यानंतर ही पीडित मुलगी अंबाजोगाईच्या रस्त्यावर भीक मागत फिरू लागली. तिचा फायदा घेऊन अनेकांनी तिच्यावर वारंवार अत्याचार करायला सुरुवात केली. एवढेच नाही तर चक्क दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी देखील तिच्यावर अत्याचार केल्याचं तिने आपल्या जबाबात सांगितल आहे. या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतल
पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल झाला असला तरी मागच्या सहा महिन्यात चारशे पेक्षा जास्त वेळा या मुलीवर अत्याचार केला असल्याची माहिती बालकल्याण समितीने दिली आहे. ही पीडित मुलगी आता बालकल्याण समितीच्या स्वाधीन करण्यात आला आहे. ही मुलगी काही महिन्याची गर्भवती असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिचा गर्भपात करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :