महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्भया पथकावर महिलांकडूनच हल्ला, मुंबईत दोघींविरोधात गुन्हा
Mumbai Police Updates : महाराष्ट्र पोलिसांकडून राज्यभरात महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकांची (Nirbhaya Pathak) नेमणूक केलेली असते. मुंबईत दोन महिलांनी निर्भया पथकावर हल्ला केल्याचं समोर आलं आहे.
Mumbai Police Updates : महाराष्ट्र पोलिसांकडून राज्यभरात महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकांची (Nirbhaya Pathak) नेमणूक केलेली असते. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) देखील महिलांच्या सुरक्षेसाठी विविध भागांमध्ये निर्भया पथक नेमण्यात आली आहेत. मात्र महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्भया पथकावरच हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे दोन महिलांनीच हा हल्ला केल्याचं समोर आलं आहे.
कारवाईच्या वेळी 2 महिलांनी महिला ट्राफिक पोलीस कर्मचाऱ्यांवर गाडी चढवली. ट्रॅफिक पोलीस आणि कंट्रोलला कॉल केल्यानंतर मालाड पोलिस स्टेशनचे निर्भया पथक त्या ठिकाणी पोहोचले. मात्र त्यावेळी त्या दोन महिलांनी निर्भया पथकाच्या गाडीत असलेल्या महिला अधिकारी यांच्यासोबतच शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली.
या दोन महिलांची नावं शिवानी केडिया आणि लक्ष्मी केडिया असं असून दोघीही मालाडच्या पोद्दार पार्क मध्ये राहणाऱ्या आहेत. या दोघींच्या विरोधात सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करणं अशा विविध कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकीनाका प्रकरणानंतर मुंबईतील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 'निर्भया पथक' स्थापन करण्याचे पोलिस आयुक्तांचे आदेश
- मुंबईच्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये 'महिला सुरक्षा कक्ष' स्थापन करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
- मुंबईच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात तैनात मोबाईल व्हॅनपैकी निर्भया पथकासाठी एक मोबाईल व्हॅन कार तैनात केली जाईल.
- एक महिला एसीपी किंवा महिला पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला मुंबईच्या प्रत्येक विभागात निर्भया पथकाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले जाईल (मुंबई पोलीस विभागात 5 क्षेत्र आहेत).
- एका निर्भया पथकाअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची महिला अधिकारी आणि पुरुष कॉन्स्टेबल आणि चालक यांची एक टीम तयार केली जाईल.
- निर्भय पथकासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक विशेष डायरी केली जाईल, ज्यामध्ये प्रत्येक तपशील स्वतंत्रपणे उपस्थित असेल. जे वेळोवेळी नोडल अधिकारी तपासतील.