बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्रींच्या सत्संग कार्यक्रमाच्या आयोजनासाठी साडेतीन कोटींची मागणी?
Madhya Pradesh : बोलणी करून कार्यक्रम न झाल्यामुळे मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीला बागेश्वर धाम संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कडून घरात घुसून बेदम मारहाण केली. अभिजीत करंजुले यांच्यासह एकूण 12 जणांविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
Bageshwar Dham : लोकसभा निवडणुकांपूर्वी हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी देशभरात बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांच्या सत्संग कार्यक्रमाची मोठी मागणी होती. राजस्थान (Rajsathan) येथे लोकसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या अशोक शर्मा या उमेदवाराने देखील मतदारसंघात बागेश्वर धाम (Bageshwar Baba) यांचा सत्संग आयोजित करण्यासाठी आपल्या मित्राच्या माध्यमातून बागेश्वर धाम महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी अभिजीत करंजुले आणि मयुरेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. कार्यक्रमासाठी साडेतीन कोटी रुपयांची मागणी उमेदवाराकडे करण्यात आली होती.
मात्र उमेदवाराने असमर्थता दाखवल्यानंतर त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. यात वर्मा यांच्याकडून महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबतचे फोनवरील संभाषण रेकॉर्ड करून व्हायरल करण्यात आले. यावरून अभिजीत करंजुले आणि मयुरेश कुलकर्णी यांनी दहा ते बारा गुंडांना सोबत घेऊन मध्यस्थी करणाऱ्या मुंबई स्थित नितीन उपाध्याय यांच्या घरात घुसून संपूर्ण कुटुंबीयांना बेदम मारहाण केली.
यासोबत घरातील रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू, दाग-दागिने लंपास केले. या प्रकरणी अभिजीत करंजुले यांच्यासोबत दहा ते बारा जणांविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करूनही अद्याप आरोपींना अटक झाली नाही. परिणामी, राजकीय दबाव असल्यामुळेच आरोपींना अटक केली जात नसल्याचा आरोप उपाध्याय यांनी केला आहे.
तब्बल साडेतीन कोटी रुपयांची मागणी
अनेक कारणांमुळे प्रसिद्धी झोतात राहणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज उर्फ बागेश्वर महाराज यांच्या भागवत कथा सप्ताहाला निवडणूक काळात देखील फार मागणी होती.शिवाय धीरेंद्र शास्त्री महाराजांचे देशभरात अनेक भक्त आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याच अनुषंगाने निवडणूक काळात त्याचा आपल्या फायदा होऊ शकतो, या अनुषंगाने राजस्थान येथे लोकसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या अशोक शर्मा या उमेदवाराने देखील मतदारसंघात बागेश्वर धाम यांचा सत्संग आयोजित करण्याचे योजले होते. मात्र त्यासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपयांची मागणी उमेदवाराकडे करण्यात आली होती.
नेमके प्रकरण काय?
बागेश्वर धाम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अभिजीत करंजुले आणि मयुरेश कुलकर्णी यांनी नितीन उपाध्याय यांना कॉल करून संपर्क केला. यात बागेश्वर महाराज यांना बागेश्वर धाम येथे सामूहिक विवाहाला कन्यादान कारणासाठी 35 दुचाकी गाड्या लागणार असल्याचं त्यात त्यांनी सांगितलं. 35 बाईक डोनेट करणारा कोण व्यक्ती आहे का? असं नितीन उपाध्याय यांच्याशी झालेल्या चर्चेत विचारणा झाली. त्यावरून अभिजीत करंजुले यांनी बोलल्यानंतर नितीन उपाध्याय यांनी राजस्थान येथून अशोक शर्मा हे दहा ते बारा गाड्या डोनेट करू शकतात आणि त्यांच्याशी संपर्क साधून दिला.
या नंतर अभिजीत करंजुले आणि मयुरेश कुलकर्णी यांनी राजस्थान येथे अशोक शर्मा यांच्याशी संवाद साधला. अशोक शर्मा यांनी यावेळी बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या एक दिवस कार्यक्रम देखील आपला मतदारसंघात घेण्यासाठी इच्छा दर्शवली. अभिजीत करंजुले आणि मयुरेश कुलकर्णी यांनी एक दिवसाचा बागेश्वर धाम धिरेंद्र शास्त्री महाराज चा कार्यक्रमासाठी साडेतीन कोटीचा खर्च सांगितला. मात्र हा खर्च जास्त असल्याने असल्याने अशोक शर्मा यांनी त्यास नकार दिला.
एकंदरीत या संवादाचा कॉल रेकॉर्डिंग अशोक शर्मा यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आलाय. परिणामी, मध्यस्ती करणारा नितीन उपाध्याय याच्या घरी जाऊन प्रदेश अध्यक्ष करंजुले आणि मयुरेश कुलकर्णी सोबत दहा ते बारा गुंडाने नितीन उपाध्याय यांच्या कुटुंब्याला बेदम मारहाण केली आणि घरातून दागिने आणि पैसेही चोरले. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी 12 जाण्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र राजकीय दबाव असल्यामुळे यामध्ये आरोपींवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप तक्रारदार नितीन उपाध्याय यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या