धुळवड खेळून घरी आला अन् होत्याचं नव्हतं झालं...!
Badlapur News : धुळवडीचा आनंद साजरा होत असताना बदलापूरमधील एका कुटुंबावर शोककळा पसरली आहे. धुळवडीत मनसोक्त नाचल्यानंतर घरी आलेल्या एका 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Badlapur News : शुक्रवारी धुलीवंदन सणाचा आनंद लुटून घरी आलेल्या एका तरुणाचा अचानक दुर्देवी मृत्यू झाला.आशुतोश संसारे (वय 27) असे या दुर्देवी तरुणाचे नाव आहे. बदलापूरमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. आशुतोषच्या मृत्यूचे कारण समोर आले नाही.
बदलापूरच्या हेंद्रपाडा परिसरात शुभदान ही सोसायटी असून इथे होळी-धुलीवंदनानिमित्त जल्लोष सुरू होता. यावेळी आशुतोष संसारेदेखील आपल्या मित्रांसह संगीताच्या तालावर सगळे नाचत होते. नाचून झाल्यानंतर आशुतोष घरी गेला. त्यावेळी त्याच्या छातीत दुखू लागले. आशुतोषला होणाऱ्या वेदना पाहता, त्याच्या पत्नीने मदतीसाठी शेजाऱ्यांकडे धाव घेतली. शेजाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
एक वर्षापूर्वी आशुतोषचा विवाह झाला होता. आशुतोष च्या मृत्यूचे कारण समजू शकले नसून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे बदलापूर पोलिसांनी सांगितले. सणाच्या दिवशी झालेल्या या दुर्देवी मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
रागाच्या भरात एकाची आत्महत्या
धुलीवंदनाच्या दिवशी बदलापुरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. सणाच्या दिवशी माहेरी गेलेल्या पत्नीने मुलीला घरी न आणल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रागाच्या भरात हे पाऊल उचलल्याने अख्ख कुटूंब उध्वस्त झालं आहे. बदलापूरच्या वडवली परिसरात शंकर जाधव, वडील ,आई, पत्नी, आणि २ महिन्याच्या लहान मुलीसह राहत होता. मात्र पतीने आई वडिलांसोबत न राहता वेगळे राहावे अशी शंकर च्या पत्नीचे म्हणणे होते, आणि त्यावरून त्याच्यात वारंवार वाद होत असे कुटुंबीयांनी सांगितले.
शंकरची पत्नी 2 महिनन्याच्या मुलीला घेऊन माहेरी गेली. होळीच्या सणानिमित्त पत्नी मुलीला घेऊन घरी येईल असे शंकरला वाटले होते, मात्र पत्नी आली नाही. शंकरने पत्नीला फोन करून मुलीला घरी घेऊन ये असे सांगितले. मात्र पत्नीने तुम्ही घ्यायला या म्हणत स्वतः यायला नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात शंकर ने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. बदलापूर येथील वडवली भागात ही घटना घडली.