एक्स्प्लोर

Badlapur Crime News: धक्कादायक! गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; बदलापुरात मोठे रॅकेट उघड

Badlapur Crime News: बदलापूर परिसरात घरातूनच बेकायदेशीर पद्धतीने महिलांचे स्त्रीबीज काढून त्यांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Badlapur Crime News: बदलापूर (Badlapur) परिसरात घरातूनच बेकायदेशीर पद्धतीने महिलांचे स्त्रीबीज काढून त्यांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Badlapur Crime News: घरातूनच सुरू होता बेकायदेशीर प्रकार

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुलक्षणा जयवंत गाडेकर या महिलेने तिच्या घरातच स्त्रीबीज वाढीसाठी वापरली जाणारी इंजेक्शन्स बेकायदेशीररीत्या साठवून ठेवली होती. आर्थिक गरज असलेल्या महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना या प्रक्रियेसाठी तयार केले जात होते. डॉक्टरांचा योग्य सल्ला न घेता महिलांची सोनोग्राफी करून त्यांना संबंधित इंजेक्शन्स देण्यात येत असल्याचे तपासात समोर आले आहे. या इंजेक्शन्समुळे गर्भाशयातील स्त्रीबीजांची वाढ झाल्यानंतर त्या महिलांना IVF किंवा ART सेंटरमध्ये पाठवले जात होते.

Badlapur Crime News: IVF सेंटरमध्ये काढले जात होते स्त्रीबीज

संबंधित सेंटरमधील डॉक्टरांकडून ऑपरेशन थिएटरमध्ये महिलांचे स्त्रीबीज काढले जात होते. त्यानंतर या स्त्रीबीजांची बेकायदेशीर विक्री केल्याचा आरोप आहे. या प्रक्रियेत महिलांचे शारीरिक आणि आर्थिक शोषण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Badlapur Crime News: आरोग्य विभागाकडून प्रकरणाचा पर्दाफाश 

या प्रकरणाचा पर्दाफाश बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकाने केला. त्यांच्या पथकाने सुलक्षणा गाडेकर यांच्या घरी छापा टाकल्यानंतर या रॅकेटचा भंडाफोड झाला. यानंतर त्यांच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Badlapur Crime News: मोबाईलमध्ये आढळले धक्कादायक पुरावे

प्राथमिक तपासात आरोपी महिलेच्या मोबाईलमध्ये गर्भधारणेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शन्सचे फोटो, सोनोग्राफीचे छायाचित्र, काही महिलांच्या बनावट नावाने तयार केलेली कागदपत्रे, सत्यप्रतिज्ञापत्रे तसेच आर्थिक व्यवहारांशी संबंधित माहिती आढळून आली आहे. यावरून या रॅकेटचा विस्तार मोठा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Badlapur Crime News: तीन महिलांना अटक

या प्रकरणी सुलक्षणा जयवंत गाडेकरसह अश्विनी चाबुकस्वा (रा. उल्हासनगर), मंजुषा वानखडे (रा. उल्हासनगर या तिघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघींनाही पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे बदलापूर परिसरात सुरू असलेल्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता असून बदलापूर पूर्व पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

आणखी वाचा 

Nashik Crime: निर्जन रानात 25 वर्षीय तरुणीची बॉडी आढळली, अंगावर काळे कपडे, मृतदेहाजवळ पिझ्झा अन्...; नाशिकमध्ये खळबळ

महत्त्वाच्या बातम्या

चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Embed widget