Badalapur Crime : तुमची मुलगी माझ्या घरी दारू पिऊन पडलीये, मैत्रिणीचा घरच्यांना फोन; बदलापूरच्या पार्टीत नेमकं काय घडलं?
Badalapur Crime : अत्याचाराच्या घटनेनं बदलापूर पुन्हा हादरलंय. एका मैत्रिणीनं गुंगीचं औषध दिलं, त्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना घडली.
![Badalapur Crime : तुमची मुलगी माझ्या घरी दारू पिऊन पडलीये, मैत्रिणीचा घरच्यांना फोन; बदलापूरच्या पार्टीत नेमकं काय घडलं? Badlapur Crime News unconscious victim assaulted by close friends in birthday party What happened in police investigation Know All Details Badalapur Crime : तुमची मुलगी माझ्या घरी दारू पिऊन पडलीये, मैत्रिणीचा घरच्यांना फोन; बदलापूरच्या पार्टीत नेमकं काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/09/d4983a9dedb1cfd94fbc9611eb2a1681172587394107188_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Badalapur Crime : बदलापूर : बदलापुरात वाढदिवसाच्या पार्टीत एका 22 वर्षीय तरूणीवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी बर्थडे गर्लसह दोघांना अटक करण्यात आली आहे. तरूणीला गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. जिचा वाढदिवस होता, तिनेच या तरूणीला गुंगीचं औषध पाजल्याचं उघड झालं आहे. रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू होती. पीडित तरूणी घरी जाण्यास निघाली असता तिला मळमळ आणि उलट्या होत असल्यानं लिंबू पाणी देण्यात आलं. याच लिंबू पाण्यात गुंगीचं औषध देऊन पीडितेवर एकानं बाथरूममध्ये अत्याचार करुन तिला तिथेच अर्धनग्न अवस्थेत सोडून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणतः दोघींची 15 दिवसांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर मैत्रिणीनं पीडितेला आपल्या घरी वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावलं. पीडितेसोबतच मैत्रिणीनं आणखी एका तरुणाला पार्टीसाठी बोलावलं होतं. पीडिता त्याला फारशी ओळखत नव्हती. हा तरुण बदलापुरातील स्थानिक होता. त्याच्यासोबतच आणखी एक तरुणदेखील पार्टीत सहभागी झालेला. दोन मैत्रिणी आणि दोन मित्र असे, चौघे पार्टीसाठी उपस्थित होते. सर्वात आधी चौघांनी केक कापला, त्यानंतर खूप ड्रिंक्स केले, त्यानंतर जेवण केलं. त्यानंतर फिर्यादिनं सांगितल्यानुसार, त्या दोन तरुणांपैकी एकानं तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. गुंगीचं औषध दिल्याचा दावा फिर्यादिकडून केला जात आहे. त्यामुळे मला माझ्यासोबत काय झालं? नेमकं दोघांपैकी कुणी अत्याचार केला हे मला सांगता येणार नाही, असं देखील फिर्यादिनं सांगितलं आहे.
ज्या मैत्रिणीनं पार्टीसाठी बोलावलं होतं, त्याच मैत्रिणीनं पीडितेच्या आई-वडिलांना फोन केला आणि तुमची माझ्या घरी दारू पिऊन पडली आहे, असं सांगितलं. मैत्रिणीनं फोन केल्यानंतर पीडितेचे आई-वडील आले आणि तिला तिथून घेऊन गेले. त्यानंतर पीडितेनं तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन तिन आरोपींना अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
बदलापूरच्या पूर्व भागात राहणाऱ्या पीडित तरुणीची तिच्याच आसपास राहणाऱ्या एका तरुणीसोबत ओळख झाली. त्यानंतर मैत्रिणीनं पीडितेला आपल्या वाढदिवसासाठी बोलावलं. त्यासोबत तिचे दोन मित्रही तिच्या घरी येणार असल्याचं सांगितलं. ठरल्याप्रमाणे पीडित तरुणी बर्थडे पार्टीसाठी मैत्रिणीच्या घरी गेली. पार्टी चांगली रंगात आली होती. रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू होती. चौघांनी केक कापला, खूप ड्रिंक केली, जेवणंदेखील झाली. पार्टी आटोपल्यावर पीडित तरुणी घरी जायला निघाली. मात्र, त्यावेळी तिला चक्कर आली. उलट्या झाल्यानंतर मैत्रिणीनं तिला पुन्हा घरी नेलं आणि लिंबू पाणी प्यायला दिलं. पीडितेला दिलेल्या लिंबू पाण्यात मैत्रिणीनं गुंगीचं औषध मिसळलं होतं.
मैत्रिणीनं पीडितेला लिंबू पाण्यातून गुंगीचं औषध दिल्यानतर ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला बाथरुममध्ये नेत तिच्यावर अत्याचार केला. तसेच, तिला अर्ध्या रस्त्यात सोडून तिथून पळ काढला. पीडित तरुणी दारू पिऊन बेशुद्ध झाल्याचं मैत्रिणीनं तिच्या वडिलांना फोन करून सांगितलं. पीडितेचे वडिल पहाटे मैत्रिणीच्या घरी पोहोचले, तिला घेऊन घरी परतले, त्यानंतर पीडितेनं घडला प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)