एक्स्प्लोर

Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणी ट्विस्ट, आरोपीचे वय 17 असल्याचा युक्तिवाद, तर आधारकार्डवर वय 19 असल्याचा पोलिसांचा दावा

Baba Siddique Shot Dead : आरोपीचे नेमके वय किती हे पाहण्यासाठी न्यायाधीशांनी त्याचे आधारकार्ड मागवलं. पण आरोपी स्वतःच्या बचावासाठी बनावट आधारकार्ड तयार करतात असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. 

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. आरोपीचे वय हे 17 असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला आहे. तर आधारकार्डनुसार त्याचं वय हे 19 असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे आरोपीचे नेमकं वय किती हे तपासण्यासाठी त्याचं आधारकार्ड न्यायमूर्तींकडून मागवण्यात आलं. 

बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणातील आरोपी धर्मराज कश्यप याला न्यायमूर्तींनी वय विचारलं असता त्याने स्वत:चं वय 17 असं सांगितलं. अल्पवयीन आरोपी म्हणून ट्रिमेंट मिळावी यासाठी आरोपींच्या वकिलांकडून मागणी करण्यात आली. आरोपीच्या वकिलांकडून त्याचे वय 17 असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तर आधारकार्डनुसार आरोपीचं वय 19 असल्याचा पोलिसांचा दावा आहे.  

बनावट आधारकार्ड तयार केल्याचा दावा

आधारकार्डनुसार त्याचं वय 19 आहे, मात्र आरोपीच्या म्हणण्यानुसार त्याचं वय 17 आहे. आरोपीच्या वकिलांकडे वयाबाबत पुरावे नाहीत असा दावा सरकारी वकिलांनी केला. आरोपी अशा गुन्ह्यात अनेकदा स्वत:च्या बचावासाठी बनावट आधारकार्डही बनवतात असा दावा सरकारी वकिलांनी केला. 

आरोपी वयाचा खुलासा करण्यासाठी वैद्यकीय चाचणी करण्यास तयार आहे. सरकारी वकिलांकडून आरोपीच्या 14 दिवसांची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. 

सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय? 

यातील आरोपीने पुणे आणि मुंबईत राहून बाबा सिद्धीकी यांची रेकी केली होती. या आरोपींना हत्यार कोणी दिलं, वाहन कोणी दिलं याचा तपास होणं महत्वाचं आहे. या आरोपींकडून 28 जिवंत काडतूस सापडली आहेत. मग फक्त बाबा सिद्धीकी यांनाच मारायचा हेतू होता की आणखी कोणाला मारण्याचा हेतू होता याचा तपास झाला पाहिजे. 

यातील अन्य दोन आरोपी फरार आहेत. हे कुठल्या गॅगशी जोडलेले आहेत का? निवडणुका तोडांवर आहेत, यांच्या निशाणा कोणावर होता हेही कळेल. त्यामुळे आम्हाला 14 दिवसाची कोठडी मिळायला हवी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. 

आधी गुन्ह्यातील तपास पहावा, त्यात काही मिळतयं का त्या आधारावर पुढील कस्टडी द्यावी. पुण्यात हे आरोपी काय करत होते, कोणाकडे राहात होते याचा तपास दहा दहा टीम करत आहेत.  तरीही त्याची माहिती मिळत नाही. एखाद्या पिच्चर मधील स्टोरी प्रमाणे हा कट रचलेला आहे. 

आरोपी आपली नावंही तपासात वेगवेगळी सांगत आहेत. पोलिसांकडील आधारकार्ड दाखवले असता त्यावरील तारखेनुसार जन्मतारीख 21 होत आहे. आरोपीनी ज्यांना मारलं आहे ते राज्याचे माजी राज्यमंत्री आहेत. हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSaif Ali Khan Attack Case: सैफचा चिमुकला जेहला ओलीस ठेवण्याचा आरोपीचा होता कट, पण...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
Jalgaon Crime : लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
नव्या 'उदय'चं भाकित, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, संजय राऊत म्हणाले शिंदे वेळीच सावध झाले अन् झाकली मूठ....
विजय वडेट्टीवारांचं नव्या 'उदय'चं भाकित, संजय राऊतांनी उदय सामंतांचं नाव घेत आमदारांचा आकडा सांगितला
Embed widget