Lawrence Bishnoi gang: अस्खलित इंग्रजीत बोलणाऱ्या बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या खोलीत सापडल्या दारुच्या 40 बाटल्या
Mumbai Crime news: दररोज रात्री बाईकवरुन ट्रिपल सीट फिरायचे, अस्खलित इंग्रजीत संभाषण अन् फक्त सिगरेट ओढायला बाहेर पडायचे; बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांबद्दल कुर्ल्याच्या पटेल चाळीतील रहिवाशांच्या प्रतिक्रिया
मुंबई: अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची दसऱ्याच्या दिवशी मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. वांद्रे येथील खेरवाडी जंक्शनच्या परिसरात मारेकऱ्यांनी बाबा सिद्दीकी (Baba Siddique Murder) यांच्यावर छातीवर तीन गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला होता. यापैकी दोन मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. हे मारेकरी लॉरेन्स बिश्नोई टोळीचे (Lawrence Bishnoi Gang) सदस्य असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात हे मारेकरी काही दिवस कुर्ला येथील पटेल चाळीत वास्तव्याला असल्याचे
मिड-डे या इंग्रजी दैनिकाच्या माहितीनुसार, शिवकुमार,धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंह हे तीन मारेकरी सप्टेंबर महिन्यापासून कुर्ला येथील पटेल चाळीत वास्तव्याला होते. बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर चाळीतील एका रहिवाशाने टीव्हीवर या तिघांचे फोटो बघितले आणि पोलिसांशी संपर्क साधला. या चाळीतील रहिवाशांनी शिवकुमार,धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंह हे तिघेही सगळ्यांशी आदरपूर्वक वागायचे असे सांगितले. हे तिघेही अस्खलित इंग्रजीत बोलायचे. त्यांनी बाबा सिद्दीकींना मारण्यापूर्वी पुण्यावरुन एक सेकंडहँड बाईक कुर्ल्यातील घराजवळ आणून ठेवली होती, अशी माहिती पटेल चाळीतील रहिवाशांनी दिली होती.
घरमालकाला दुप्पट भाडं दिलं
कुर्ला येथील पटेल चाळीत सध्या 7 ते 8 हजार रुपये भाडे देऊन खोली मिळते. मात्र, शिवकुमार याने एका एजंटमार्फत घरमालकाला तब्बल 14 हजार रुपये भाडे देऊन ही खोली घेतली होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पोलिसांनी या तिघांच्या खोलीची झडती घेतली. त्यावेळी खोलीत अस्ताव्यस्त पडलेले कपडे आणि पाण्याच्या बाटल्या सापडल्या. याशिवाय, खोलीत साधारण 30 ते 40 दारुच्या बाटल्या सापडल्याची माहिती समोर आली आहे. सप्टेंबर महिन्यात सर्वप्रथम शिवकुमार पटेल चाळीत राहायला आला. त्यानंतर धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंह हे दोघे याठिकाणी राहायला आले.
चाळीतील 10 बाय 10 च्या खोलीत बाथरुम होते. शिवकुमार,धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंह हे तिघेही खोलीतून फारवेळा बाहेर यायचे नाहीत. फक्त सिगरेट ओढायची असेल तेव्हा ते खोलीबाहेर पडायचे. ते बहुतेकदा रात्री उशीरा घराबाहेर पडायचे, दिवसा खोलीतच बसून असायचे. ते ट्रिपल सीट बाईकवरुन फिरायचे. त्यांचे कपडे आणि एकंदरीत वागणूक पाहून हे तिघेही चांगल्या घरातील असावेत, असे चाळीतील लोकांना वाटायचे. ते कॉल सेंटर किंवा एखाद्या चांगल्या कंपनीत कामाला असतील, असे आम्हाला वाटायचे. मात्र, टेलिव्हिजनवर त्यांचे फोटो पाहिल्यानंतर चाळीतील सर्वांना धक्का बसल्याचे असे एका रहिवाशाने सांगितले.
आणखी वाचा