एक्स्प्लोर

Ashok Kharat Nashik Crime News: मोठी बातमी : भोंदूबाबा अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat Nashik Crime News: नाशिकमधील गाजत असलेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: नाशिकमधील गाजत असलेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे सांगत कोठडी वाढवण्याची मागणी केली होती.

Ashok Kharat Nashik Crime News: न्यायालयात मोठी गर्दी, कडेकोट बंदोबस्त

खरातला कोर्टात आणण्यापूर्वी त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे कोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांची तैनाती करण्यात आली होती. सुनावणी पाहण्यासाठी वकिलांचीही मोठी गर्दी झाली होती.

Ashok Kharat Nashik Crime News: SIT कडून गंभीर आरोप

सुनावणीदरम्यान SIT अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयात तपासाची माहिती मांडताना अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या. आरोपी महिलांना खडे, पेढे देऊन आणि पाण्यात काही पदार्थ मिसळून देत असे, ज्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत असे आणि त्यानंतर त्यांचे शोषण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला.

तर सरकारी वकिलांनी 6 लाख 53 हजार रोकड, लॅपटॉप मिळाले. काळा रंगाचे रिव्हॉल्व्हर, त्यावर राजमुद्रा आहे. 31 काडतुसे त्यात 5 फायर झाले ते कुठे फायर झाले? नरबळी दिल्याचा संशय आहे. हा 67 वर्षाचा आहे, तो 30 वर्षाच्या मुलीशी लैगिक शोषण करत होता. यावरून त्याची मानसिकता काय लक्षात येते, असे म्हटले. 

Ashok Kharat Nashik Crime News: ‘सिद्ध पुरुष’ असल्याचा दावा, फसवणुकीचे जाळे

अशोक खरात स्वतःला ‘सिद्ध पुरुष’ सांगत लोकांची फसवणूक करत होता, असा आरोपही करण्यात आला. साप, वाघ यांचा वापर करून भीती निर्माण केली जात होती. तसेच कस्तुरीसारख्या वस्तूंचा वापर करून वन्यजीव कायद्याचे उल्लंघन झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला.

Ashok Kharat Nashik Crime News: बचाव पक्षाचा युक्तिवाद

बचाव पक्षाने मात्र सात दिवसांत पुरेसा तपास झाल्याचा दावा करत पुढील पोलीस कोठडीची गरज नसल्याचे सांगितले. आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असून, पुढील तपास न्यायालयीन कोठडीतही होऊ शकतो, असा युक्तिवाद करण्यात आला.

Ashok Kharat Nashik Crime News: सरकारी पक्षाची ठाम भूमिका

सरकारी वकिलांनी प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे सांगत पुढील तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. इशान्येश्वर मंदिरातील विधी, आर्थिक व्यवहार आणि इतर गंभीर बाबींचा तपास अजून बाकी असल्याचे त्यांनी नमूद केले. एकूणच, गंभीर आरोप आणि तपासातील नव्या बाबी लक्षात घेता न्यायालयाने अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: कोर्टात काय म्हणाला अशोक खरात?

दरम्यान, पोलीस कोठडी सुनावण्याआधी न्यायाधीशांनी खरातला काही बोलायचं आहे का? असे विचारले. यावर अशोक खरात म्हणाला की, मला साप, वाघ या विषयी काही माहिती नाही. मी हे पहिल्यांदाच ऐकतो आहे. मंदिरामध्ये कधीतरी जायचो, त्यावेळी 100 च्या आसपास लोक असायचे. शिवरात्र, श्रावणी सोमवारी अशा वेळी मी जात होतो. 5 दिवसांच्या कोठडीत जे प्रश्न विचारले त्या सर्वांची मी उत्तरे दिली आहेत. मला साप, वाघ याबद्दल काही माहिती नाही, असे त्याने म्हटले.

अशोक खरातला कोठडी, कोर्टात काय काय घडलं?

1. पोलिसांच्या गराड्यात 3.50 वाजता अशोक खरातला तोंडावर काळा कपडा बांधून नाशिक सत्र न्यायालयात आणले.
2. न्यायालयाने पुकरल्यानंतर 17 मिनिटांनी आरोपी अशोक खरात न्यायालयात हजर झाला. 
3. SIT अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी गुन्ह्याची माहिती दिली.
4. आरोपी खडे द्यायचा, पेढा खाऊ घालायचा पाणी प्यायला घ्यायाचा. त्यानंतर मळमळ व्हायची, अशी माहिती दिली.
5. पेढा कुठून, पाणी कुठून आणायचा, त्याचा शोध घ्यायचा आहे. 
6. आरोपीच्या फार्म हाऊसमध्ये पिस्तुलच्या 5 रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत. ते कुठे फायर केले ते बघायचे आहे.
7. आरोपी  स्वतःला सिद्ध पुरूष सांगत तो फसवणूक करायचा. 
8. आता अशोक खरातने किती महिलांची फसवणूक केली हे तपासायचे आहे. 

सरकारी वकील काय म्हणाले?

1. कॉस्मोलॉजीचा मला अभ्यास होता असे अशोक खरात सांगत होता. त्याच्याकडे काही सर्टिफिकेट सापडले आहेत.
2. 6 लाख 53 हजार रोकड, लॅपटॉप मिळाले. काळ्या रंगाचे रिव्हॉल्व्हर, त्यावर राजमुद्रा आहे.
3. 31 काडतुसे त्यात 5 फायर झाले ते कुठे फायर झाले? नरबळी दिलाचा संशय आहे.
4. अशोक खरात हा 67 वर्षाचा आहे. तो 30 वर्षांच्या मुलींसोबत लैंगिक शोषण करत होता. यावरून त्याची मानसिकता काय लक्षात येते.
5. फायर झाल्याने नरबळी दिल्याचा संशय आहे.
6. वाघ, साप, नाग दाखवत होता ते कुठून आणले? जिवंत होते की नकली? त्याचा शोध घ्यायचा आहे. 
7. हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी दिली, त्याची हत्या केल्याचा संशय आहे, त्याचा शोध घ्यायचा आहे. 
8. फॉरेस्ट अॅक्ट लागू शकतो. 7 दिवस पोलीस कोठडी द्यावी, व्याप्ती मोठी आहे. 
9. सात दिवसांचा pcr या आधी दिला आहे.
10. सेक्स, फ्रॉड आणि प्रॉपर्टी असा हा गुन्हा आहे.
11. त्यामुळे 7 दिवसाची कोठडी मिळावी ही मागणी आहे.
12. कारण यातून समाजाला संदेश जाणार आहे.

अशोक खरातचे वकील काय म्हणाले?

1. सात दिवसापासून तपास सुरू आहे. त्यामुळे रिमांड ची गरज नाही2.  काही व्हिडीओ जमा केले आहे. जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
3. Dvr, लॅपटॉप मिळाले आहेत, पैसे मिळाले, रिव्हॉल्वर मिळाले असे म्हणतात.  पण पेन ड्राईव्ह कुठे उल्लेख आला नाही
5. कोणते शोध आता बाकी नाहीत
6. जे द्रव्य पाजले गेले त्यासाठी pc वाढवून मागत आहेत
7. 7 दिवस रिमांड दिली आहे त्यामुळे पुन्हा रिमांड ची गरज नाही
8. अजून कोणते डॉक्युमेंट घ्याचे नाहीत,रजिस्टर ऑफिस मधून कागदपत्रे मिळू शकतात त्यामुळे रिमांड ची गरज नाही

अशोक खरातने कोर्टात काय केलं?

1. युक्तिवाद सुरू असताना खरात मान खाली घालून उभा होता. आपले बोट बघत होता.
2. कोठडी सुनवण्याआधी न्यायाधीश यांनी खरातला काssहो बोलायचं आहे का विचारले. यावर मला साप, वाघ, या विषयी काही माहिती नाही, असं खरात म्हणाला. 
3. न्यायालायने 5 दिवसांची कोठडी सुनावली.
4. 29 मार्चपर्यत अशोक खरातला पोलीस कोठडी.

आणखी वाचा 

Ashok Kharat Case Nashik Sessions Court: पेढा, नरबळी, रिव्हॉल्व्हरवर राजमुद्रा; अशोक खरातबाबत वकिलांची कोर्टात हादरवणारी माहिती, नाशिक सत्र न्यायालयात आज काय काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget