एक्स्प्लोर

Ashok Kharat Case Nashik Sessions Court: पेढा, नरबळी, रिव्हॉल्व्हरवर राजमुद्रा; अशोक खरातबाबत वकिलांची कोर्टात हादरवणारी माहिती, नाशिक सत्र न्यायालयात आज काय काय घडलं?

Ashok Kharat Case Nashik Sessions Court: अशोक खरातची आज पोलीस कोठडीची मुदत संपली होती. त्यामुळे आज दुपारी 3.50 वाजता अशोक खरातला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

Ashok Kharat Case Nashik Sessions Court: महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याला आज नाशिक सत्र  न्यायालयात (Nashik Sessions Court) हजर करण्यात आले. अशोक खरातची आज पोलीस कोठडीची मुदत (Police Custody) संपली होती. त्यामुळे आज दुपारी 3.50 वाजता अशोक खरातला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. आतापर्यंत तपासात काय निष्पन्न झाले, याबाबतीत पोलिसांकडून न्यायालयात माहिती दिली. तसेच पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. यावेळी न्यायालाने अशोक खरातला 5 दिवसांची म्हणजेच 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

नाशिक सत्र न्यायालयात आज काय काय घडलं? (Ashok Kharat Nashik Sessions Court)

  1. अशोक खरात येण्याआधीच कोर्टरूममध्ये वकिलांची गर्दी (सुनावणी ऐकण्यासाठी)
  2. एसआयटीआधी किरणकुमार सुर्यवंशी सरकारी वकिल अजय मिसर कोर्टात दाखल
  3. कोर्टात आरोपींचा पुकारा झाला.
  4. अशोक खरात चा पुकारा करून 10 मिनिटे झाले तरीही अजून कोर्टात हजर नाही.
  5. पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. न्यायाधीशांनी दरवाजा जवळ उभ्या असणाऱ्या दुसऱ्या बाजूला यायला सांगितले. आरोपीच्या सुरक्षेच्या प्रश्नमुळे बाजूला केले.
  6. अशोक खरात कोर्टात येण्याआधी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई नाशिक कोर्टात दाखल झाल्या आहे. मला संधी मिळाली तर मी खरातच्या कानाखाली मारेल....तृप्ती देसाई यांचा इशारा.
  7. पोलिसांच्या गराड्यात 3.50 वाजता अशोक खरातला तोंडावर काळा कपडा बांधून नाशिक सत्र न्यायालयात आणण्यात आले.
  8. न्यायालयाने पुकरल्यानंतर 17 मिनिटांनी आरोपी अशोक खरात न्यायालयात हजर झाला. 
  9. अधिकारी सुर्यवंशी गुन्ह्याची माहिती दिली.
  10. आरोपी खडे द्यायचा, पेढा खाऊ घालायचा पाणी प्यायला घ्यायाचा. त्यानंतर मळमळ व्हायची.
  11. पेढा कुठून, पाणी कुठून आणायचा, त्याचा शोध घ्यायचा आहे.
  12. आरोपीच्या फार्म हाऊसमध्ये पिस्तुलच्या 5 रिकाम्या पुनगळ्या सापडल्या आहेत.ते कुठे फायर केले ते बघायचे आहे.
  13. आरोपी  स्वतःला सिद्ध पुरूष सांगताच तो फसवणूक करायचा.
  14. आता अशोक खरातने किती महिलांची फसवणूक केली हे सांगायचे.

सरकारी वकील काय म्हणाले? (Ashok Kharat Nashik Sessions Court)

  1. कॉस्मोलॉजीचा मला अभ्यास होता असे अशोक खरात सांगत होता. त्याच्याकडे काही सर्टिफिकेट सापडले आहेत.
  2. 6 लाख 53 हजार रोकड, लॅपटॉप मिळाले. काळ्या रंगाचे रिव्हॉल्व्हर, त्यावर राजमुद्रा आहे.
  3. 31 काडतुसे त्यात 5 फायर झाले ते कुठे फायर झाले? नरबळी दिलाचा संशय आहे.
  4. अशोक खरात हा 67 वर्षाचा आहे. तो 30 वर्षांच्या मुलींसोबत लैंगिक शोषण करत होता. यावरून त्याची मानसिकता काय लक्षात येते.
  5. फायर झाल्याने नरबळी दिल्याचा संशय आहे.
  6. वाघ, साप, नाग दाखवत होता ते कुठून आणले? जिवंत होते की नकली? त्याचा शोध घ्यायचा आहे.
  7. हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी दिली, त्याची हत्या केल्याचा संशय आहे, त्याचा शोध घ्यायचा आहे.
  8. फॉरेस्ट अॅक्ट लागू शकतो. 7 दिवस पोलीस कोठडी द्यावी, व्याप्ती मोठी आहे.

अशोक खरातचे वकील काय म्हणाले? (Ashok Kharat Nashik Sessions Court)

  1. 7 दिवसापासून तपास सुरू आहे.
  2. मोडस आणि काही व्हिडीओ जमा केले आहे. जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
  3. Dvr, लॅपटॉप मिळाले आहेत पैसे मिळाले रिव्हॉल्वर मिळाले असे म्हणतात.
  4. पण पेन ड्राईव्ह कुठे उल्लेख आला नाही.
  5. कोणते शोध आता बाकी नाही.
  6. जे द्रव्य पाजले गेले त्यासाठी pc वाढवून मागत आहेत.
  7. 7 दिवस रिमांड दिली आहे त्यामुळे पुन्हा रिमांड ची गरज नाही.
  8. अजून कोणते डॉक्युमेंट घ्याचे नाहीत,रजिस्टर ऑफिस मधून कागदपत्रे मिळू शकतात त्यामुळे रिमांडची गरज नाही.

अशोक खरातने कोर्टात काय केलं? (Ashok Kharat Nashik Sessions Court)

  1. युक्तिवाद सुरू असताना खरात मान खाली घालून उभा होता. आपले बोट बघत होता.
  2. कोठडी सुनवण्याआधी न्यायाधीश यांनी खरताल काहो बोलायचं आहे का विचारले. यावर मला साप वाघ या विषयी काही माहिती नाही, असं खरात म्हणाला. 
  3. न्यायालायने 5 दिवसांची कोठडी सुनावली.
  4. 29 मार्चपर्यत अशोक खरातला पोलीस कोठडी.

अशोक खरातच्या विरोधात एकूण 6 फौजदारी गुन्हे दाखल- (Ashok Kharat Case)

महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरात याच्या विरोधात एकूण 6 फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून 3 महिलांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती एसआयटीने दिली आहे. तक्रार करणाऱ्या तिन्ही महिला असून अशोक खरातने त्यांच्यावरही अत्याचार केल्याची महिलांची तक्रार आहे. इतर तक्रारी प्रमाणेच पँटर्न राबवित कुटूंबियांना केबिनच्या बाहेर काढून महिलांचे शोषण करत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत 6 तक्रारी दाखल असून यात 5 महिलांनी आणि एका पुरुषाने फिर्याद दिली आहे.

अशोक खरातची शिर्डीतही कोट्यावधींची मालमत्ता- (Ashok kharat Case)

भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याची शिर्डीत कोट्यावधींची मालमत्ता असल्याचं समोर आल्यानंतर आता त्याची काही उद्योग व्यवसायातही भागीदारी असल्याचं आता समोर आलं आहे. शिर्डीतील वॉटरपार्क शेजारी निमगाव शिवारात असणाऱ्या कोट्यावधीच्या मालमत्तेत हा भोंदूबाबा भागीदार आहे. 48 गुंठे परीसरात असणाऱ्या सिल्वर ओक या लॉन्समध्ये तो भागीदार आहे. शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचे बंधू महेंद्र शेळके यांच्या लॉन्समध्ये गुंतवणूक या भोंदूबाबाने केली आहे. शिर्डीत अनेक मालमत्ता असल्याची चर्चा असून या मालमत्ता त्याने कशा मिळवल्या याचीही चौकशी होणं गरजेचं आहे.

नेमकं प्रकरण काय? (Nashik Ashok Kharat Case)

अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape news) केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

कोण आहे अशोक खरात? (Who Is Ashok Kharat)

नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. 'शिवनिका ट्रस्ट'च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात असतात.

संबंधित बातमी:

Ashok Kharat Case Nashik Crime News: लैंगिक संबंधांसाठी अशोक खरात जोड्या जुळवायचा; स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर काय काय करायचा?, हादरवणारी माहिती

Ashok Kharat Case: पीडित दोन आमदारांना भेटली, व्हिडीओही दाखवले; पण पुढे भयानक घडलं, खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं?

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना
मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना
नवरीचा अनोखा प्रताप, पैसे आणि दागिने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न, सासू सासऱ्यासोबत केलं धक्कादायक कृत्य
नवरीचा अनोखा प्रताप, पैसे आणि दागिने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न, सासू सासऱ्यासोबत केलं धक्कादायक कृत्य
Kolhapur Crime News: सियापेक्षा डेंजर निघाला 'तो', शेवटी प्रेमालाही संपवलं, पोलिसांना सांगितली चक्रावून टाकणारी स्टोरी, एका चुकीने गेम ओव्हर, चॅटमधून धक्कादायक माहिती समोर
सियापेक्षा डेंजर निघाला 'तो', शेवटी प्रेमालाही संपवलं, पोलिसांना सांगितली चक्रावून टाकणारी स्टोरी, एका चुकीने गेम ओव्हर, चॅटमधून धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe On MPSC Protest Pune: MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
India Alliance Petition Against ECI: नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
Akola: दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? अकोल्यात कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...
दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
Rohit Pawar and Sushma Andhare: सुषमा अंधारेंचं 'ते' वाक्य झोंबलं, रोहित पवारांनी प्रचंड सुनावलं, म्हणाले, 'तुम्ही आक्रमक बोलून निघून गेलात....'
सुषमा अंधारेंचं 'ते' वाक्य झोंबलं, रोहित पवारांनी प्रचंड सुनावलं, म्हणाले, 'तुम्ही आक्रमक बोलून निघून गेलात....'
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
Embed widget