एक्स्प्लोर

Ashok Kharat: अशोक खरातचा पाय आणखी खोलात, मास्टरमाईंडच्या सीडीआरमधून पोलिसांना सापडले 'ते' नंबर; आता भोंदूबाबाची कुंडलीच बाहेर येणार

Ashok Kharat: नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या अशोक खरात प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवे आणि धक्कादायक तपशील समोर येत आहेत.

Ashok Kharat: नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवे आणि धक्कादायक तपशील समोर येत आहेत. विशेष तपास पथकाने (SIT) केलेल्या चौकशीत शनिवारी एक नाट्यमय घडामोड घडली. खरात आणि त्याचा ऑफिसबॉय नीरज जाधव (Neeraj Jadhav) या दोघांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली असता, दोघांमध्ये पोलिसांसमोरच जोरदार शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ऑफिसबॉय नीरज जाधवच्या सीडीआरमध्ये 30 ते 40 महिलांचे संपर्क क्रमांक आढळले आहेत. त्यामुळे आता एसआयटीच्या हाती महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

एसआयटीकडून नीरज जाधवचा कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासण्यात आला असून, सीडीआरमध्ये 30 ते 40 महिलांचे नंबर सापडल्याची माहिती मिळत आहे. नीरज जाधवच महिलांना अशोक खरातचे निरोप देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फोकस प्रॉपर्टी येथे ऑफिसबॉय असताना सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या नीरज जाधव संपर्कात असल्याने त्याचे कारनामे आता उघड होणार आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाईंड नीरज जाधवच्या सीडीआरमधून आता महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आता भोंदूबाबाची संपूर्ण कुंडली उघड होण्याची देखील शक्यता व्यक्त होत आहे. 

Ashok Kharat: खरात, जाधवची एसआयटीकडून समोरासमोर चौकशी

दरम्यान, अशोक खरात आणि नीरज जाधवची एसआयटीकडून समोरासमोर चौकशी करण्यात आली. यावेळी दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. माहिती देण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला आणि परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती. तर, अशोक खरातची शनिवारी एसआयटीकडून तब्बल सात तास चौकशी करण्यात आली. 

Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाची एन्ट्री

आज रविवारी देखील अशोक खरात प्रकरणात एसआयटीचे अधिकारी हिमांशू पोलीस क्लब येथे चौकशीसाठी दाखल झाले आहेत. अशोक खरातची आज पुन्हा एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. तर भोंदू अशोक खरात प्रकरणात आता आयकर विभागाची देखील एन्ट्री झाली आहे. खरातची एसआयटी चौकशी सुरू असतानाच आता आर्थिक चौकशीला देखील वेग येणार आहे. खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची सखोल तपासणी होणार आहे. त्याचे उत्पन्नाचे स्त्रोत आणि आयकर विवरणपत्रांची पडताळणी होणार असून देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे देखील रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अशोक खरातच्या आर्थिक जाळ्याचा मोठा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

आणखी वाचा 

Ashok Kharat Viral Video: अशोक खरातच्या विकृतीचा नवा Video समोर, आईसमोरच मुलीला टी-शर्ट वर करायला सांगितला, नंतर केबल टेस्टर वापरून...

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Crime News: 'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
Pune Crime News: शाळेपासूनचं प्रेम, पण मुलीचा जीव दुसऱ्यावरच जडला; संतापलेल्या एक्स बॉयफ्रेंडने हॉस्टेलमध्ये घुसून तरुणाचा काढला काटा, पुण्यातील शॉकिंग घटना
शाळेपासूनचं प्रेम, पण मुलीचा जीव दुसऱ्यावरच जडला; संतापलेल्या एक्स बॉयफ्रेंडने हॉस्टेलमध्ये घुसून तरुणाचा काढला काटा, पुण्यातील शॉकिंग घटना
Ramesh Mhatre: डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा; कठोर अटी अन् शर्तीसह चारही आरोपींना जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं?
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा; कठोर अटी अन् शर्तीसह चारही आरोपींना जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं?
Influencer Attacked: LIVE स्ट्रिमिंग करताना प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर गोळीबार, वर्दळीच्या ठिकाणी झाला हल्ला; मोटारसायकलवरुन हल्लेखोर पळाले
LIVE स्ट्रिमिंग करताना प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर गोळीबार, वर्दळीच्या ठिकाणी झाला हल्ला; मोटारसायकलवरुन हल्लेखोर पळाले

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Embed widget