एक्स्प्लोर

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरात शेकडो खात्यांचा नॉमिनी? अनेकांचे आधार, पॅनकार्ड घेतले अन्...; भोंदूबाबाचा आणखी एक हादरवणारा कारनामा समोर

Ashok Kharat Case Nashik Crime News: महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या पापाचा घडा आता आर्थिक व्यवहारांच्या बाबतीतही भरू लागला आहे.

Ashok Kharat Case Nashik Crime News: महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याच्या पापाचा घडा आता आर्थिक व्यवहारांच्या बाबतीतही भरू लागला आहे. अनेक नागरिकांची आधार कार्ड आणि पॅन कार्डची माहिती वापरून खरातने मोठ्या आर्थिक व्यवहारांचे जाळे उभे केल्याचा संशय एसआयटी (SIT) ला आहे.

तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, खरातने विविध पतसंस्थांमध्ये शेकडो खात्यांवर स्वतःला ‘नॉमिनी’ म्हणून नोंदवले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशय असून, हे व्यवहार स्वतः खरातनेच हाताळले असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, काही खात्यांना एकाच मोबाईल नंबरची लिंक असल्याचेही उघड होत आहे. हा नंबर स्वतः अशोक खरात वापरत असल्याचा संशय असून, यामुळे संपूर्ण आर्थिक व्यवहारांवर त्याचे नियंत्रण असल्याचे तपासात समोर येत आहे.

Ashok Kharat Case Nashik Crime News: रुपाली चाकणकरांच्या संपर्कातील व्यक्तीच्या नावानेही खाते? 

तपासात आणखी एक महत्त्वाचा धागा समोर आला आहे. रुपाली चाकणकर यांच्या संपर्कातील व्यक्तीच्या नावानेही खाते उघडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, खरातशी संबंधित असलेल्या विविध पतसंस्थांची एसआयटीकडून सखोल चौकशी सुरू आहे. या संस्थांमधील व्यवहार, खातेधारकांची माहिती आणि निधीचा प्रवाह याचा तपशील तपासला जात आहे. आता या प्रकरणात नेमकी काय माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरातचा आणखी एक गोरखधंदा

दरम्यान, भोंदूगिरी प्रकरणात अडकलेल्या अशोक खरात याच्याविरोधात आता आणखी एक गंभीर गोरखधंदा उघडकीस येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. बनावट ‘फार्मर प्रोड्यूसर कंपन्या’ स्थापन करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या NAFED (नाफेड) मार्फत शेतमाल खरेदी प्रक्रियेचा गैरफायदा घेत, खरातने बनावट कंपन्यांच्या माध्यमातून व्यवहार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अधिकाऱ्यांशी असलेल्या कथित संबंधांचा वापर करून या कंपन्या उभ्या केल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

या प्रकरणात ‘व्यंकटेश फार्मर प्रोड्यूसर कंपनी’ विशेष चर्चेत आली आहे. या कंपनीमध्ये अशोक खरात आणि त्याची पत्नी संचालक असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय आणखी 15 ते 16 कंपन्यांमध्ये खरातची भागीदारी असण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांकडून कांदा, मका यांसारख्या पिकांची खरेदी करण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप असून, या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता आहे.

या संदर्भात निलेश शेडगे (श्रीरामपूर, स्वतंत्र भारत पक्ष) यांनी पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केला आहे. तसेच, या प्रकरणात खरातसह संबंधित अधिकाऱ्यांची ईडीमार्फत चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. एकूणच, आधीच गंभीर असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता शेतकरी फसवणुकीचा नवा कोन समोर आल्याने तपास अधिकच गडद होत असून, पुढील काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा 

Ashok Kharat Case Nashik Crime News: पिंक टी-शर्ट, वाढलेली दाढी अन् स्क्रीनवर 'भोंदू' खरात; VC सुनावणीत सरकारी वकिलांनी मांडला क्रूरतेचा पाढा, कोर्टात नेमकं काय-काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget