एक्स्प्लोर

Ashok Kharat Case Nashik Crime News: पिंक टी-शर्ट, वाढलेली दाढी अन् स्क्रीनवर 'भोंदू' खरात; VC सुनावणीत सरकारी वकिलांनी मांडला क्रूरतेचा पाढा, कोर्टात नेमकं काय-काय घडलं?

Ashok Kharat Case Nashik Crime News: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याला गुरुवारी पुन्हा एकदा न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते.

Ashok Kharat Case Nashik Crime News: शेकडो महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणुकीचा आरोप असलेला नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला गुरुवारी पुन्हा एकदा न्यायालयासमोर उभे करण्यात आले. मात्र, यावेळी दृश्य काही वेगळे होते. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला प्रत्यक्ष कोर्टात न आणता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे हजर करण्यात आले. स्क्रीनवर दिसणारा खरात आणि सरकारी वकिलांनी मांडलेला त्याच्या क्रूरतेचा पाढा, यामुळे कोर्टातील वातावरण चांगलेच तापले होते.

न्यायालयाच्या आदेशानुसार दुपारी सुनावणी सुरू झाली. कोर्ट रूममध्ये लावलेल्या चार मोठ्या स्क्रीनवर अशोक खरात अवतरला. गुलाबी (Pink) रंगाचा टी-शर्ट, वाढलेली दाढी आणि दोन्ही हात एकमेकांवर धरून निपचित उभा असलेला खरात यावेळी उपस्थितांना पाहायला मिळाला. न्या. बी. एन. ईचपुरानी यांनी त्याचे नाव विचारले असता, त्याने अत्यंत धीम्या आवाजात उत्तर दिल्याचे दिसून आले.

Ashok Kharat Case Nashik Crime News: सरकारी वकिलांचा खळबळजनक युक्तिवाद

सुनावणीदरम्यान सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे आणि तपास अधिकाऱ्यांनी खरातच्या कृत्यांचा पाढा वाचला. खरातने आमिष दाखवून पिडितेवर अत्याचार केला, ज्यामुळे ती गर्भवती राहिली. त्यानंतर त्याने तिला काही गोळ्या आणि जडीबुटीचे औषध देऊन तिचा गर्भपात घडवून आणला. या गोळ्या कुठून आणल्या आणि त्या औषधात काय होते, याचा तपास करणे बाकी आहे. खरात पिडितेला "तू अप्सरा आहेस" असे सांगून भुरळ घालत असे आणि तिचे शोषण करत असे. खरात पिडितेच्या नातेवाईकांकडून आधार कार्ड आणि पॅन कार्डची मागणी करत होता. तपासासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद करण्यात आला. 

Ashok Kharat Case Nashik Crime News: बचाव पक्षाचा पवित्रा 

तर खरातच्या वकिलांनी 7 दिवसांच्या वाढीव कोठडीला जोरदार विरोध केला. हा दुसरा गुन्हा आहे. एक प्रकारचा गुन्हा आहे. याआधी 14 दिवस पोलीस कोठडी झाली आहे. माझ्याकडे अद्याप या प्रकरणाची फिर्याद आली नाही. गर्भपात झाले असे म्हणतात, त्याचा कालावधी काय होता? काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर गुन्हा दाखल झाला आहे. काळी जादूचे आरोप करण्यात आले. आधारकार्ड पॅन कार्ड मागण्यात आले. पण, आरोपीने कोणते पाणी दिले हे तपासायचे आहे, असे कारण सांगतात. ही 2022 ची घटना आहे. याआधी 14 दिवस पोलीस कोठडी दिली आहे. आता पुन्हा 7 दिवस कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. 

Ashok Kharat Case Nashik Crime News: 8 एप्रिलपर्यंत कोठडीत वाढ

यानंतर सरकारी पक्षाने खरात हा 'मास्टरमाईंड' असून तो तपासात सहकार्य करत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता अशोक खरातला 8 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता 8 एप्रिलपर्यंतच्या कोठडीत SIT खरातच्या कोणत्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

Ashok Kharat Wife: अशोक खरातची पत्नी कल्पना खरात दोन दिवसांपासून फरार, पोलिसांना थांगपत्ता लागेना, SIT ची नजर चुकवून कशी झाली गायब?

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Buldhana Crime News: 'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा
'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Embed widget