एक्स्प्लोर

Drugs Case LIVE Updates: संभाव्य कारवाईपासून संरक्षण देण्याची समीर वानखेडेंची पोलिसांकडे मागणी

Drugs Case Update: सध्या संपूर्ण देशात गाजत असलेल्या क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. यावरुन समीर वानखेडेंवर आरोप केले जात आहेत.

Key Events
Aryan Khan Drugs Case Live Updates Allegation on Sameer Wankhede Shocking assassination of Kiran Gosavi bodyguard Prabhakar sail Drugs Case LIVE Updates: संभाव्य कारवाईपासून संरक्षण देण्याची समीर वानखेडेंची पोलिसांकडे मागणी
live_blog_NCB

Background

Drugs Case Update: सध्या संपूर्ण देशात गाजत असलेल्या क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. आर्यन खान ड्रग्स केसमध्ये मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाली, असा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडिगार्ड प्रभाकर साईल यांनी दिली आहे.  एबीपी माझाशी बोलताना एनसीबी रेडचे पंच क्रमांक 1 असलेले प्रभाकर साईल यांनी सांगितलं की, त्यांची या प्रकरणात पंच म्हणून सही घेतली होती. मात्र तो कागद ब्लँक होता. रेडच्या दिवशी किरण गोसावीने त्यांना येलो गेटला बोलवलं आणि त्यानंतर साईलनं गोसावीला फोनवर बोलताना ऐकलं.  सईलनं सांगितलं की, माझ्या जीवाला धोका होता म्हणून मी माझ्या परिचिताकडे सोलापूरला 10-12 दिवस राहिलो.  

साईल याने गोसावीचे चोरून लपून व्हिडीओ शूट केले. त्यात गोसावी आर्यन खानला मोबाईलवर बोलायला लावलं असं दिसतंय.  याच 25 कोटींची मागणी केली. त्यावर 18 कोटींवर डील झाली आणि मी ऐकलं त्यानुसार वानखेडेंना 8 कोटी द्यायचे आहेत असं बोलणं सुरू होतं, असा दावा देखील साईलनं केला आहे. 

कोण आहे प्रभाकर साईल 
क्रुझ कारवाई प्रकरणातील प्रथम क्रमांकाचे नाव असणारा पंच
हा पंच  किरण होसावी यांचा बॉडीगार्ड  
किरण गोसावींकडेच याची राहण्याची व खाण्याची व्यवस्था 

क्रुझ कारवाईच्या दिवशी काय झालं
प्रभाकर साईल यानं सांगितलं की, क्रुझ कारवाई झाली त्यादिशी मी किरण गोसावींसोबतच होतो. किरण गोसावी एनसीबी ऑफिसला गेले...मी खालीच थांबलो होतो.  गोसावी बरोबर सव्वा बाराला खाली आले. आम्ही तिथून जवळच जाऊ फ्रॅकी, थम्स अप घेतलं. तिथू ग्रीन गेटला गेलो. ग्रीन गेटच्या आत गेलो तिथे समीर वानखेडे,त्यांचे सहकारी बसले होते तिथे त्यांना फ्रॅकी आणि पाणी-थम्सअप वगैरे दिले. नंतर क्रुझच्या बाहेर गेलो. तिथुन मला एकाठिकाणी थांबवून बाहेर जाऊ नको असे सांगितलं.  मला काही फोटो दाखवण्यात आले होते व ते फोटो असलेले लोक आले की त्यांना ओळखायला सांगितलं होतं. फोटोतल्या व्यक्ती आल्या की मला गोसावींना रिपोर्ट करायचं होतं, असं साईलनं सांगितलं.

साईलनं सांगितलं की, क्रुझवर घेऊन जायला एक बस होती. बसमधून कोण  जातं त्याला ओळखायला सांगितलं होतं. 2700 नंबरच्या  बसमध्ये फोटोमधली एक व्यक्ती बसली त्यालाच मी ओळखलं. बाकीच्यांना ओळखलं नाही कारण सर्वांनीच मास्क घातले होते. 4.29 वाजता मला फोटो दिले त्यातील 13 व्यक्ती आल्या आहेत असा मेसेज दिला. आर्यन खान माझ्यासमोरच आले होते. त्यांना घ्यायला बस नाही तर क्रुझवरची व्हिआयपी गाडी आली होती.  कारवाई करतांना मी क्रुझवर नव्हतो. क्रुझच्या गेटवर होतो. क्रुझवर मी साडेअकरा दरम्यान पोहोचलो होतो.

मला ब्लॅंक पेपरवर सह्या करायला लावल्या
मी आणि किरण गोसावी आणि मनिष भानुशाली हे बाहेरचे लोक होतो.  क्रुझवर कारवाई दरम्यान किरण गोसावी, वानखेडे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.11.30 दरम्यान मी बोर्डींग होते तिथे गेलो. तेव्हा मी आर्यन खानला केबिनमध्ये बसलेलं बघितलं.   एनसीबी कार्यालयात जेव्हा पावणेबाराला सगळ्यांना आणलं. तेव्हा पंचाचा साक्षीदार म्हणून मला सही करायला एनसीबी कार्यालयात वर बोलावलं. तिथे साळेकर नावाच्या एनसीबी अधिकाऱ्यानं मला ब्लॅंक पेपरवर सह्या करायला लावल्या. मी याबाबत किरण गोसावींकडे ब्लॅंक पेपरवर कश्या सह्या करु असं विचारलं तेव्हा समीर वानखेडे तिथे आले आणि म्हणाले काय नाही होत तू कर सह्या. मी सह्या केल्या. 9 ते 10 ब्लॅंक पेपरवर मला सह्या करायला लावल्या. माझं आधारकार्ड मी त्यांना व्हॉटसअप केलं. पंच म्हणून जेव्हा माझी सही घेतली तेव्हा पेपर पूर्ण ब्लॅंक होते, असं साईलनं सांगितलं.

त्यानं पुढं सांगितलं की, NCBच्या अधिकाऱ्यांकडे ऑफिसमध्ये -सॅनिटरी पॅड, प्लास्टिकच्या बरण्या असं सामान होते. एनसीबी कार्यालयात तेव्हा एका चेअरवर आर्यन खान आणि शेजारी किरण गोसावी बसले होते तेव्हा मी त्यांचा गपचुप व्हिडीओ शुट केला. व्हिडीओमध्ये किरण गोसावी एका फोनवर आर्यनचं कुणाशी तरी बोलणं करुन देत होता. 

किरण गोसावींचा काय रोल

साईलनं सांगितलं की, किरण गोसावींकडे मी 22 जूलै पासून बॉडीगार्ड म्हणून काम करतो. ठाण्याला काम करायचो. गोसावी कारवाईच्या अगोदर  अहमदाबावरुन निघाले होते. किरण गोसावी पावणेतीनला एनसीबी ऑफीसच्या खाली आले. तेव्हा सॅम नावाचा व्यक्ती गोसावींना भेटायला आला होता..रात्रीतुन दोन वेळा त्यांची मिटींग झाली.  साडेचारला एनसीबीहून लोअर परळला निघालो. तेव्हा त्यांनी सॅमला फोन केला.  फोनवर म्हणाले, 'उनको बोल 25 करोड में डील करने के लिये.  18 करोड में फायनल कर. 8 करोड वानखेडे को देना हैं' सॅम हा शाहरुख खान आणि गोसावी मधला को ऑर्डीनेटर होता, असा दावाही साईलनं केला आहे.

साईलनं सांगितलं की, मला लोअर परळला दोन गाड्या दिसल्या होत्या. त्यापैकी एका गाडीत पुजा ददलानी होती. किरण गोसावी, सॅम आणि पुजा मध्ये 15-20 मिनीट बोलणं झालं. 3 तारखेच्या साडेपाचला सकाळी पुव्हा गोसावींना सॅमचा फोन आला. पुजा तेव्हा फोन उचलत नाही असं सॅम सांगत होता. किरण गोसावींनी व्हॉटसअप कॉल साडेचार दरम्यान केला होता आणि कारवाईनंतरच्या डीलबाबत सांगितलं.  पाचपर्यंत मला पुन्हा किरण गोसावींचा फोन आला. अर्जंट  ताडदेव रोडला इंडीयाना हॉटेल बाहेरुन पैसे कलेक्ट करायचे आहेत.  तिथे 5201 नंबरची गाडी होती. तिथे दोन कागदी पिशव्यांमधून 50 लाख रुपये घेऊन गाडीत बसून मी सांगितल्याप्रमाणे वाशीला आलो. वाशीला येऊन मी पैसे  सरांना दिले. सर आणि त्यांची मिसेस बॅग घेऊन निघण्याच्या तयारीत होते. संध्याकाळी 5 ला वाशी इनॉर्बीट मॉलला बोलावून किरण गोसावींनी मला पुन्हा  पैशाची पिशवी दिली. तिथुन ओलाने मी चर्चगेटला गेलो. ती पिशवी सॅमला दिली. त्या पिशवीत 38 लाख रुपयेच होते.  सॅमने याबाबत किरण गोसावीला फोनवरुन विचारलं.गोसावीने दोन दिवसांत व्यवस्था करतो सांगितलं,असं प्रभाकरनं सांगितलं. 

प्रभाकर साईल इतके दिवस शांत का राहिला?

साईलनं सांगितलं की, मी शांत राहिलो कारण माझा फॅमिली प्रॉब्लेम आहे. मला राहतं घर नाही. मी गोसावींकडे 24 तास ड्युटी करायचो. तिथेच राहायचो, खायचो. मला काही दिवसांनंतर नंतर मिसेसचा फोन आला की त्यांना फोन येतायेत पोलिसांचे. मला भीती वाटली की माझ्या फॅमिलीकडे पोलिस का येतायेत. स्वाभिमान रिपब्लिक पार्टीच्या संस्थापकांकडे मी आलो आणि आता त्यांच्या छत्रछायेखाली आहोत. मला कारवाईनंतर दोन दिवस फोन स्विच ऑफ करायला लावला. माझा पगार त्यांच्याकडे बाकी आहे. इतक्या दिवसांत माझा कुणाशीच संपर्क नाही.  मला भीती वाटतेय की मी पंच म्हणून उभा राहिलोय.  मला समीर वानखेडेंकडून धोका आहे, असंही प्रभाकर साईलनं म्हटलं आहे.

कोण आहे किरण गोसावी?
पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या माहितीनुसार एबीपी माझाने किरण गोसावीचा शोध सुरू केला. यावेळी अत्यंत धक्कादायक माहिती एबीपी माझाच्या हाती लागली. पोलीस दलात नोकरी करून निवृत्त झालेले प्रकाश गोसावी यांचा मुलगा हा किरण गोसावी आहे. सध्या ते सेवानिवृत्त झालेले आहेत. गेली अनेक वर्षे ते ठाण्यातील ढोकळी इथं एका सोसायटीमध्ये राहतात. मात्र किरण आणि आमचा गेल्या 12 वर्षांपासून काहीही संबंध नाही असे त्याच्या कुटुंबीयांनी एबीपी माझाला सांगितले. किरणचे बी कॉम पर्यंत शिक्षण झालेले आहे, मात्र तो व्यवसनाधीन असल्याची माहिती देखील एबीपी माझाला मिळाली आहे. किरण विवाहित असून त्याला 10 वर्षाचा मुलगा आहे. किरणला त्याच्या पत्नीने सहा वर्षांपूर्वीच घटस्फोट दिलेला असलायची माहिती समोर येत आहे. किरणमुळे गेली अनेक त्याच्या कुटुंबियांना त्रास होत असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी एबीपी माझाच्या प्रतिनिधींना दिली.  एकूणच किरण गोसावी हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असल्याचे एबीपी माझाच्या शोधमोहीम येथून समोर आले आहे. असे असताना एन सी बी किरण गोसावीला मुख्य साक्षीदार म्हणून सांगत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेला आणि फरार म्हणून घोषित असलेला एक आरोपी एन सी बी सारख्या केंद्रीय यंत्रणेसाठी मुख्य साक्षीदार बनू शकतो का, एन सी बी च्या अधिकाऱ्यां ऐवजी आर्यन खानला क्रूज वरून एनसीबी कार्यालयात घेऊन येऊ शकतो का, तसेच एनसीबीच्या कस्टडीत असताना त्याच्या सोबत सेल्फी काढू शकतो का असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. 

21:04 PM (IST)  •  24 Oct 2021

संभाव्य कारवाईपासून संरक्षण देण्याची समीर वानखेडेंची पोलिसांकडे मागणी

आपल्याला ड्रग्ज प्रकरणात नाहक अडकवण्यात येत असून संभाव्य पोलीस कारवाईपासून संरक्षण देण्यात यावं अशा आशयाचं पत्र एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी केलं आहे. वानखेडे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना हे पत्र लिहिलं आहे. 

14:17 PM (IST)  •  24 Oct 2021

इतके दिवस प्रभाकर कुठे होता, भाजप आमदार राम कदमांचा सवाल

22 दिवसांनंतर प्रभाकर यांनी ही माहिती दिली आहे. इतके दिवस प्रभाकर कुठे होता, भाजप आमदार राम कदमांचा सवाल,  सीएम उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सरकार एनसीबीचं मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एनसीबीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Embed widget