दोनच दिवसांपूर्वी पोलीस भरतीची परीक्षा दिली; प्रेमप्रकरणातून युवकाने उचललं टोकाचं पाऊल
अमरावती (Amravati) जिल्ह्याच्या दर्यापूर शहरातील सिव्हिल लाईन परिसरामध्ये एका 27 वर्षीय युवकाने आपल्या राहता घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघड झाली.
अमरावती : प्रेमसंबंधातून अनेकदा तरुणाई टोकाचं पाऊल उचलते. मात्र, त्यांच्या एका चुकीच्या निर्णयाचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत असतो. प्रेमसंबंधातून अनेकदा गुन्हेगारी, हिंसाचार व आत्महत्यासारख्या गंभीर घटना घडल्या आहेत. आता, अमरावतीमध्येही प्रेमसंबंधातून युवकाने टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याचीह ह्रदयद्रावक घटना घडली आहे. विशेष म्हणजे 27 वर्षीय या युवकाने काही दिवसांपूर्वीच पोलीस भरतीची परीक्षाही दिली होती. आपल्या प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून या प्रियकराने आत्महत्या केल्या आरोप त्याच्या कुटुंबीयांना केला आहे. तसेच, प्रेयसी आणि तिच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही मृत मुलाच्या नातेवाईकांनी केली असून पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.
अमरावती (Amravati) जिल्ह्याच्या दर्यापूर शहरातील सिव्हिल लाईन परिसरामध्ये एका 27 वर्षीय युवकाने आपल्या राहता घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघड झाली. या घटनेतील मृत युवक निलेश प्रकाशराव गुजर हा आपल्या मावशीच्या घरी दर्यापूर येथे सिविल लाईन परिसरात मागील पंधरा वर्षापासून राहत होता, येथेच त्याने आपले महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केले. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी त्याने पोलीस (Police) भरतीची परीक्षा सुद्धा दिली होती. मात्र, अचानक काल शुक्रवार रोजी घरातील सर्व सदस्य शेगावला दर्शनासाठी गेल्यानंतर निलेशने आपल्या प्रेयसीला व्हिडिओ कॉल करुन संवाद साधला. या दोघांमधील संभाषणानंतर निलेशने स्वत:चे जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. निलेश आणि त्याच्या प्रेयसीमध्ये यावेळी नेमकं काय बोलणं झालं, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रेयसीसोबत संपर्क झाल्यानंतरच निलेशने गळफास घेऊन आत्महत्या (Crime News) केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
नातेवाईकांची पोलिसात धाव
निलेशची प्रेयसी ही त्याला वारंवार पैशांची मागणी करत होती, तसेच मानसिक त्रास देत होती. प्रेयसीच्या याच त्रासातून निलेशला आत्महत्या करण्यास त्याच्या प्रेयसीने प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप निलेशच्या नातेवाईकांनी केलेला आहे. या संदर्भात निलेशच्या प्रेयसीवर आणि तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत निलेशच्या नातेवाईकांनी दर्यापूर पोलीस स्टेशन येथे आज सकाळपासून धाव घेतली आहे.
हेही वाचा
ॲपलचा iphone 16 लवकरच बाजारात, लाँचिंग किंमत लीक; AI फिचर्सचं अपडेट व्हर्जन