एक्स्प्लोर

Ambernath Murder: 12 वर्षानंतरही मूलबाळ नाही... पतीने उचललं टोकाचं पाऊल, डोक्यात अवजड वस्तू घालून पत्नीला संपवलं

Ambernath News: लग्नाला 12 वर्ष झाली, तरी त्यांना मूलबाळ होत नसल्यानं नीतू कुमारीची आयव्हीएफ ट्रीटमेंटही सुरू होती. मात्र रोनीतराज हा याच कारणावरून तिच्या चारित्र्यावर संशय घेत नेहमी तिच्याशी वाद घालत होता.

अंबरनाथ : लग्नाला 12 वर्ष होऊनही मूलबाळ होत नसल्यानं पतीनं पत्नीची डोक्यात वार करून हत्या केली. अंबरनाथच्या (Ambernath Murder)  ऑर्डनन्स इस्टेटमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. आहे.  रोनीतराज मंडल असं या आरोपीचं नाव आहे. हत्या केल्यानंतर त्याने  बनाव रचला. पोलिसांच्या तपासात मात्र त्याचा बनाव उघडा पडला आणि त्याला तात्काळ बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

चारित्र्यावर संशय घेत पत्नीशी नेहमी वाद

अंबरनाथच्या ऑर्डनन्स इस्टेटमधील एमपीएफ मैदानासमोर रोनीतराज मंडल (37) हा पत्नी नीतू कुमारी मंडल (30) सोबत वास्तव्याला होता. मूळच्या बिहारमधील असलेल्या या दोघांचं 2011 साली लग्न झालं होतं, तर 2016 साली रोनीतराज हा ऑर्डनन्स फॅक्टरीच्या अंबरनाथमधील मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत फिटर म्हणून कामाला लागला. ऑर्डनन्स इस्टेटमधील एच 38 या स्टाफ क्वार्टरमध्ये हे दाम्पत्य राहायला होतं. त्यांच्या लग्नाला 12 वर्ष झाली, तरी त्यांना मूलबाळ होत नसल्यानं नीतू कुमारीची आयव्हीएफ ट्रीटमेंटही सुरू होती. मात्र रोनीतराज हा याच कारणावरून तिच्या चारित्र्यावर संशय घेत नेहमी तिच्याशी वाद घालत होता. अखेर संशयाने नीतू कुमारीचा जीव गेला.  

हत्येचा बनाव रचला

रविवारी दुपारी रोनीतराज याने मद्यपान केल्यानंतर तो जेवत असताना त्याचे पत्नीसोबत पुन्हा वाद झाले. या वादातून त्याने पत्नीच्या डोक्यात अवजड वस्तू मारून तिची हत्या केली. यानंतर संध्याकाळच्या सुमारास त्याने शेजाऱ्यांना बोलावत आपल्या पत्नीची कुणीतरी हत्या केल्याचे सांगितले. आपल्याला काहीच माहिती नसल्याचा बनाव देखील रचला. या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. 

आरोपी केंद्र सरकारच्या सेवेत

मात्र रोनीतराज सांगत असलेल्या गोष्टीवर संशय आल्यानं पोलिसांनी त्यालाच ताब्यात घेत चौकशी सुरू केली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून मृत नीतू कुमारी हिचा पती रोनीतराज यालाच संशयित म्हणून ताब्यात घेतल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दिली आहे. मात्र केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या व्यक्तीनं केलेल्या या गुन्ह्यामुळे शहरात मोठी खळबळ माजली आहे. मात्र या घटनेने परिसर हादरला असून अशा पद्धतीने पत्नीचा जीव घेणाऱ्या पतीला कठोर शासन करावे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

हे ही वाचा :

पत्नी आवडत नाही, म्हणून... रेल्वे कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, पत्नीसह आईलाही संपवलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
तर काकाने मनाचा मोठेपणा दाखवून योजनेचे स्वागत करावं, लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून आशिष देशमुख यांचे अनिल देशमुखांना आवाहन
तर काकाने मनाचा मोठेपणा दाखवून लाडकी बहीण योजनेचे स्वागत करावं, आशिष देशमुख यांचे अनिल देशमुखांना आवाहन
हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज? पुढील 2 दिवसात ठोस निर्णय घेणार
हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज? पुढील 2 दिवसात ठोस निर्णय घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaSharad Pawar PC : 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या, शरद पवारांचं मोठं वक्तव्यABP Majha Headlines : 9 AM : 4 OCT 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 8 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
तर काकाने मनाचा मोठेपणा दाखवून योजनेचे स्वागत करावं, लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून आशिष देशमुख यांचे अनिल देशमुखांना आवाहन
तर काकाने मनाचा मोठेपणा दाखवून लाडकी बहीण योजनेचे स्वागत करावं, आशिष देशमुख यांचे अनिल देशमुखांना आवाहन
हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज? पुढील 2 दिवसात ठोस निर्णय घेणार
हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज? पुढील 2 दिवसात ठोस निर्णय घेणार
Sharad Pawar: शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
Supriya Sule: अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय; मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट
अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय; मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट
Ratnagiri Crime News : 'दोन दिवस राहिलेत, जगून घे...', एक-दोन नाही तर 30 दुकानांसमोर आढळल्या धमकीच्या चिठ्ठ्या, रत्नागिरीतील घटनेने खळबळ
'दोन दिवस राहिलेत, जगून घे...', एक-दोन नाही तर 30 दुकानांसमोर आढळल्या धमकीच्या चिठ्ठ्या, रत्नागिरीतील घटनेने खळबळ
Bopdev Ghat Incident: तरुणाला बांधून ठेवलं, 21 वर्षीय तरुणीवर तिघांकडून अत्याचार, बोपदेव घाटातील हादरवणारा घटनाक्रम पोलिसांनी सांगितला!
तरुणाला बांधून ठेवलं, 21 वर्षीय तरुणीवर तिघांकडून अत्याचार, बोपदेव घाटातील हादरवणारा घटनाक्रम पोलिसांनी सांगितला!
Embed widget