एक्स्प्लोर

अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर होण्याआधी तळोजा कारागृहात काय काय घडलं?, वडिलांनी सर्व सांगितलं!

Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरणातील संस्थाचालक आणि इतर आरोपींना वाचविण्यासाठी अक्षयचा एन्काऊंटर केल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या नातेवाईकांनी केला आहे.

Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा सोमवारी संध्याकाळी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा मृत्यू झाला.

अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचे आई-वडील सोमवारी दुपारीच त्याला तळोजा कारागृहात जाऊन भेटून आले होते. ते पावणेचारच्या सुमारास तुरुंगातून बाहेर पडले. त्यानंतर पोलिसांनी एका प्रकरणाच्या चौकशीसाठी अक्षय शिंदे याला बदलापूरला नेले. यानंतर अक्षयच्या एन्काऊंटरची माहिती वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांमधून समजल्याची माहिती अक्षयच्या चुलत्यांनी दिली, असं अण्णा शिंदे (अक्षयचे वडील) यांनी सांगितले. 

वडिलांसह अक्षय शिंदेचे नातेवाईक काय म्हणाले?

बदलापूर अत्याचार प्रकरणातील संस्थाचालक आणि इतर आरोपींना वाचविण्यासाठी अक्षयचा एन्काऊंटर केल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या नातेवाईकांनी केला आहे. अक्षयचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी देखील अण्णा शिंदे (अक्षयचे वडील) यांनी केली. नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आरोपी अक्षयला भेटण्यासाठी त्याचे आई- वडील सोमवारी सकाळी गेले होते. मुलाला भेटण्याचे टोकन मिळाले नव्हते. त्यांना दुपारी 3.30 वाजता येण्यास सांगण्यात आले. साधारण 3.45 वाजता ते गेल्यानंतर अक्षयची आणि आमची 20 मिनिटांसाठी भेट झाल्याची माहिती अण्णा शिंदे यांनी दिली.  माझा मुलगा असे करूच शकत नाही. रस्ता क्रॉस करतानाही तो माझा हात पकडायचा, तो गाड्यांना घाबरायचा. असा मुलगा पोलिसांची बंदूक कशी काय हिसकावून घेऊ शकतो? असा सवाल अक्षयच्या आईने उपस्थित केला. 

त्या पेपरमध्ये काय लिहिलेलं?

अक्षयचे आई-वडील तुरुंगात गेले होते. त्यांची आणि अक्षयची 20 मिनिटांची भेट झाली. तेव्हा अक्षयने आई-वडिलांना पैसे पाठवायला सांगितले. त्यासाठी अक्षयने आई-वडिलांना एक नंबर दिला होता. त्यांचे बोलणे सुरु असताना अक्षयच्या हातात एक मोठा पेपर होता. कोणीतरी आपल्याला हा पेपर लिहून दिल्याचे अक्षयने आईला सांगितले. त्या पेपरमध्ये काय लिहलंय, असं अक्षयने आईला विचारले. आईने अक्षयला विचारले की, हा पेपर तुला कोणी दिला? त्यावर अक्षयला व्यवस्थित उत्तर देता आले नाही. अक्षयच्या आईने तो पेपर बघितला, पण त्यामध्ये काय लिहलंय, ते तिला वाचता आले नाही. तो पेपर पाहून अक्षयच्या आई-वडिलांना शंका आली. तेव्हा आईने म्हटले की, कोणी काय दिलं असेल ते फेकून दे. पण त्या कागदावर काय लिहून दिलं होतं, हे अक्षयच्या आई-वडिलांनाही शेवटपर्यंत समजले नाही, अशी माहिती अक्षयच्या काकांनी दिली. 

संबंधित बातमी:

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेला संपवणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस, प्रकृती प्रचंड खालावली, अंतरवाली सराटीत बायकांची रडारड
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस, प्रकृती प्रचंड खालावली, अंतरवाली सराटीत बायकांची रडारड
इलेक्शनची पेटी समोर येईल तेव्हा माझी लाडकी बहीण कमळाला मत देईल, त्यासाठीच जुगाड केलं, भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट
इलेक्शनची पेटी येईल तेव्हा माझी लाडकी बहीण कमळाला मत देईल, यासाठीच जुगाड केलं, भाजप आमदाराचा व्हिडीओ व्हायरल
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये उंदीर; व्हायरल व्हिडिओवर संस्थानचे स्पष्टीकरण
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये उंदीर; व्हायरल व्हिडिओवर संस्थानचे स्पष्टीकरण
शरद पवारांचा जरांगेंना पूर्ण पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप, आता जयंत पाटलांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
शरद पवारांचा जरांगेंना पूर्ण पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप, आता जयंत पाटलांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

दुपारी 2 च्या हेडलाईन्स:  ABP Majha Marathi News : Headlines 2 PM Headlines : 24 September 2024Akshay Shinde Encounter Van :  अक्षय शिंदेची एन्काऊंटर झालेली व्हॅन, Exclusive VideoAkshay Shinde Encounter : जेजे रुग्णालयात नराधम अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होणारAkshay Shinde Encounter Bullet : एन्काऊंटर झालेल्या व्हॅनमधून 4 बुलेट हस्तगत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस, प्रकृती प्रचंड खालावली, अंतरवाली सराटीत बायकांची रडारड
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस, प्रकृती प्रचंड खालावली, अंतरवाली सराटीत बायकांची रडारड
इलेक्शनची पेटी समोर येईल तेव्हा माझी लाडकी बहीण कमळाला मत देईल, त्यासाठीच जुगाड केलं, भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट
इलेक्शनची पेटी येईल तेव्हा माझी लाडकी बहीण कमळाला मत देईल, यासाठीच जुगाड केलं, भाजप आमदाराचा व्हिडीओ व्हायरल
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये उंदीर; व्हायरल व्हिडिओवर संस्थानचे स्पष्टीकरण
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये उंदीर; व्हायरल व्हिडिओवर संस्थानचे स्पष्टीकरण
शरद पवारांचा जरांगेंना पूर्ण पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप, आता जयंत पाटलांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
शरद पवारांचा जरांगेंना पूर्ण पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप, आता जयंत पाटलांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेला बदलापूरला न्यायचं होतं तर पोलिसांनी गाडी मुंब्य्राच्या दिशेने का वळवली? सुषमा अंधारेंचा सवाल
अक्षय शिंदेला बदलापूरला न्यायचं होतं तर पोलिसांनी गाडी मुंब्य्राच्या दिशेने का वळवली? सुषमा अंधारेंचा सवाल
अनेकवेळा ट्राय करूनही आयपीओ अलॉट होत नाहीये? फक्त 'या' चार ट्रिक वापरा, काम झालंच म्हणून समजा!
अनेकवेळा ट्राय करूनही आयपीओ अलॉट होत नाहीये? फक्त 'या' पाच ट्रिक वापरा, काम झालंच म्हणून समजा!
Akshay Shinde Encounter: बदलापूरच्या शाळेतील ट्र्स्टींवर चाईल्ड पॉर्नोग्राफीचा आरोप, अक्षय शिंदेला IPS मीरा बोरवणकरांना भेटण्याची इच्छा?
बदलापूरच्या शाळेतील ट्र्स्टींवर चाईल्ड पॉर्नोग्राफीचा आरोप, अक्षय शिंदेला IPS मीरा बोरवणकरांना भेटण्याची इच्छा?
Sudhir Mungantiwar: ''थोडंसं बेसावध राहिलो'', फेक नॅरिटीव्हवरुन मुंनगंटीवारांचा विरोधकांवर निशाणा, विधानसभेचं रणशिंग फुंकणार, म्हणाले..
''थोडंसं बेसावध राहिलो'', फेक नॅरिटीव्हवरुन मुंनगंटीवारांचा विरोधकांवर निशाणा, विधानसभेचं रणशिंग फुंकणार, म्हणाले..
Embed widget