एक्स्प्लोर

Akola News : खळबळजनक! अकोल्यात प्रसिद्ध व्यावसायिकाचं अपहरण; गोदामातून बाहेर येताच नेमकं काय घडलं?

Akola Crime News : अकोला (Akola) शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काच बॉटल सप्लायर आणि प्रसिद्ध व्यावसायिक असलेल्या अरुणकुमार वोरा यांचं अपहरण झाल्यानं अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे.

Akola Crime News अकोला : अकोला (Akola) शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काच बॉटल सप्लायर आणि प्रसिद्ध व्यावसायिक अरुणकुमार वोरा (Arunkumar Vora) यांचं अपहरण झाल्यानं(Crime News) अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे. अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीतल्या  (Akola Police) चारजिन कपाउंड परिसरात ही अपहरणाची घटना काल रात्रीच्या सुमारास घडलीय. दरम्यान दगडीपुल भागात वोरा याचं रिकाम्या काच बॉटलचं गोदाम आहे. ते गोदाम बंद करून  बाहेर पडत असतानाच पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन त्यांच्याजवळ आली.

त्यानंतर त्यातील 2 ते 3 जण वाहनातून खाली उतरले आणि धाक दाखवत त्यांचं अपहरण करण्यात आले. यादरम्यान त्यांनी 'बचाव-बचाव' म्हणून आरडाओरड देखील केली. मात्र, तोपर्यत उशीर झाला आणि अपहरणकर्त्यांनी वाहन सुसाट वेगानं पळवलं. अकोला पोलिसांकडून सध्या अरुणकुमार वोरा यांचा शोध सुरू करण्यात आला असून या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय. 

दोन तासाच्या कालावधीत नेमकं काय घडलं?

जिगनेश प्रविणकुमार वोरा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, काल 13 मे च्या रात्री पावणे 10 वाजताच्या सुमारास गोदामावर काम करणाऱ्या मजूर गणेश चंदन याने फोनवर सांगितले की, तुमचे काका अरुणकुमार वोरा यांना एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये 2 ते 3 अनोळखी व्यक्तींनी जबरदस्ती वाहनात टाकून घेऊन गेले आहेत. अशी माहीती देताच लागलीच ते गोदामावर पोचले आणि घडलेल्या प्रकरणाबद्दल रामदास पेठ पोलिसांत तक्रार नोंदवली. 

दरम्यान प्रत्यक्षदर्शी लोकांनी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुणकुमार वोरा हे गोदाम बंद करून ते बाहेर पडत असतानाच पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन त्यांच्याजवळ गेली. 2 ते 3 जण वाहनातून खाली उतरले आणि त्यांच्या सोबत बोलू लागले. त्यानंतर धाक दाखवत त्यांना बळजबरी वाहनात बसून पळू लागले.

यादरम्यान वाहनातून 'बचाव-बचाव' म्हणून अरुणकुमार यांचा आवाज येत होता. काहींनी त्यांचा आवाज ऐकून घराबाहेर धाव घेतली. तर काहींनी वाहनाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यत ते सुसाट वेगात पसार झाले. दरम्यान वोरा यांचा मोबाईल घटनास्थळी पडला असून तो गोदामाजवळ पोलिसांना सापडला आहे. विशेष म्हणजे हे अपहरणकर्ते 2 तासांपासून अरुणकुमार यांच्या प्रतिक्षेत कारमध्ये एकाच ठिकाणी बसलेले होते. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घटनास्थळी भेट

दरम्यान, एका प्रसिद्ध व्यावसायिकाला त्याच्या गोदामासमोरून उचलण्यात आल्याने अकोला शहरात खळबळ उडाली आहे. अपहरण झाल्याचे कळताच स्थानिकांनी पोलिसांना कळवले. एसीपी कुळकर्णीसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळावर पोहचला. पोलिसांकडून तत्काळ पाऊले उचलल्या गेली असून परिसरातील सीसीटीव्ही तपासून अपहरणकर्त्यांचा शोध सुरु आहे.त्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. अरुणकुमार यांचं नेमक्या कोणत्या कारणासाठी अपहरण करण्यात आले? अपहरणकर्ते नेमके कोण आहेत? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

वोरा कुटुंबाला बसला धक्का 

अरुणकुमार यांच्या अपहरणाची बातमी वाऱ्यासारखी अकोला शहरात पसरली. या घटनेनं अकोलेकर चांगलेच हादरून गेले. अकोल्यात एवढी गुन्हेगारी वाढली की, थेट गजबजलेल्या ठिकाणाहून अपहरणकर्ते येऊन अपहरण करत आहे. सध्या अनेकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या घटनेने 'वोरा' कुटुंबालाही धक्का बसला. आज पहाटेपर्यत त्यांचा शोध लागलेला नाही. शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जातेय.

अरुणकुमार वोरा नेमके कोण आहे?

अरुणकुमार वोरा अकोल्यात नामाकिंत व्यवसायकांपैकी एक आहेत. त्याचं अकोल्यात रिकाम्या काच बॉटल सप्लाय करण्याच मोठा व्यवसाय आहे. त्यांच्या कुटुंबात दोन मुली आणि एक मुलगा असून तो परदेशात आहे आणि मुली पुण्याला आहेत. ते एकटेच अकोल्यात वास्तव्यास आहे. त्याचं निवासस्थान हे अकोला जिल्हाधिकारी कार्यलयाजवळील राधे नगरात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Latur : हॉस्टेलच्या वादातून तरुणांमध्ये हाणामारी, लातुरात 21 वर्षीय तरुणाची चाकूने भोकसून हत्या
हॉस्टेलच्या वादातून तरुणांमध्ये हाणामारी, लातुरात 21 वर्षीय तरुणाची चाकूने भोकसून हत्या
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
Thane Crime : जास्त भाड्याचं आमिष दाखवून वाहने घ्यायचा अन् ती पैशासाठी गहाण ठेवायचा, ठाण्यात आरोपीकडून 32 गाड्या ताब्यात
जास्त भाड्याचं आमिष दाखवून वाहने घ्यायचा अन् ती पैशासाठी गहाण ठेवायचा, ठाण्यात आरोपीकडून 32 गाड्या ताब्यात
Nashik Container Loot Case: मी फिर्यादी असूनही मलाच मारहाण, 400 कोटींच्या कंटेनर चोरी प्रकरणातील तक्रारदाराचे पोलिसांवर गंभीर आरोप
मी फिर्यादी असूनही मलाच मारहाण, 400 कोटींच्या कंटेनर चोरी प्रकरणातील तक्रारदाराचे पोलिसांवर गंभीर आरोप

व्हिडीओ

Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report
Abdul Sattar Mahashivratri : देवदर्शनाला आला 'मित्र', भाजपनं शिंपडलं गोमूत्र! Special Report
Tipu Sultan Controversy BJP vs Shiv Sena UBT : टिपूवरून लढाई राजकीय चढाई Special Report
Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada News : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी 17 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी, जाणून घ्या सविस्तर माहिती
म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
Embed widget