Akif Nachan : ठाण्यातील पडघ्यात 9 कोटींचा बंगला असलेला अकिफ नाचन कोण? ज्याला गुजरात एटीएसनं घेतलंय ताब्यात
Akif Nachan : अकिफ हा गेल्या काही दिवसांपासून गुजरात एटीएसने अटक केल्यामुळे चर्चेत आला आहे. हा अकिफ नक्की कोण आहे आणि गुजरात एटीएसने त्याला का ताब्यात घेतले, हे जाणून घेऊयात...
Akif Nachan : ठाण्यातील पडघा येथील बोरिवली गावात राहणारा अकिफ नाचन. अकिफ ठाणे जिल्ह्यात त्याच्या आलिशान बंगल्यासाठी प्रसिद्ध. अकिफने आठ ते नऊ कोटी रुपये खर्चून बोरिवली गावात बंगलामुळे तो चर्चेत होता. मात्र आता अकिफ हा गेल्या काही दिवसांपासून गुजरात एटीएसने त्याला अटक केल्यामुळे चर्चेत आला आहे. हा अकिफ नक्की कोण आहे आणि गुजरात एटीएसने त्याला का ताब्यात घेतले, हे जाणून घेऊयात...
कोण आहे अकिफ नाचन?
अकिफ नाचन हा मूळचा ठाणे जिल्ह्यातील पडघा येथील बोरिवली गावातील रहिवासी आहे. नाचन याचा मूळ व्यवसाय बांधकाम. अकिफच्या घरी त्याची पत्नी आणि एक लहान मूल. महत्त्वाचे म्हणजे तो साकीफ नाचन या ट्रेन बॉम्बस्फोटातील आरोपीचा निकटवर्तीय मानला जातो. मात्र 15 मे रोजी नाशिक हायवे जवळील एका धाब्यावर जेवत असताना त्याला गुजरात एटीएसने ताब्यात घेतलं होत. यानंतर पुढील तपासासाठी दिल्ली एनआयएने आता ताब्यात घेतलंय. गरीब परिस्थितीतून आलेला अकिफ एवढा श्रीमंत कसा झाला याचा तपास सुरु आहे.
महाराष्ट्र एटीएस नाराज?
ठाणे जिल्ह्यातील पडघा येथून अकिफ नाचनला अटक करणाऱ्या एटीएस गुजरातच्या कारवाईवर महाराष्ट्र पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक नाराज झालं आहे. महाराष्ट्र एटीएसच्या सूत्रांनी सांगितले की गुजरात पोलिसांनी त्यांना छाप्याबद्दल माहिती दिली नाही. जी सामान्यतः प्रोटोकॉल आहे. तसेच नाचनच्या कुटुंबियांना दुसऱ्या दिवशी अटक झाल्याची माहिती मिळाली. तथापि, गुजरात एटीएसच्या पोलिस सूत्रांनी सांगितले की, नाचन पळून जाईल याची त्यांना भीती वाटत होती म्हणून त्यांनी कोणालाही न सांगता शांतपणे ऑपरेशन केले.
अकिफवर आरोप काय ?
एनआयएच्या तपासानुसार आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2022 मध्ये मध्यप्रदेशातील रतलाम येथील आरोपी सहकारी अमीन फावडा याच्या घरी अकिफ गेला होता. यानंतर ते दोघे इम्रान खान याच्या रतनामच्या पोल्ट्री फार्मला गेले. इम्रान खान हा कट रचणारा गुन्हेगार समजला जातो. अकिफ, अमीन आणि इम्रान यांनी रतनाममध्ये दोन दिवसीय बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे देखील समोर आले आहे.
तपासाची सुरुवात कुठून झाली ?
दिल्ली एनआयए पोलीस तपासणी करत असताना, सैफुल्ला, अल्तमास आणि जुबेर नावाच्या तीन व्यक्तींकडे राजस्थानमधील चित्तोडगड जिल्ह्यातील निंबाहेरा परिसरातून स्फोटके, बॅटरी, घड्याळ, वायर सापडले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. तिघेही मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची प्राथमिक चौकशी केली असता आमिन फावडा, आमीन पटेल आणि इम्रान खान यांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांनाही मध्य प्रदेशातील रतलाम येथून अटक करण्यात आली .
या घटनेसंदर्भात सुरुवातीला निंबाहेरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर गुन्ह्याची तीव्रता आणि प्रमाण लक्षात घेता, एनआयए दिल्ली येथे स्फोटक पदार्थ कायद्याच्या अन्वये गुन्हा पुन्हा नोंदवण्यात आला. त्यामध्ये आणखी तपास केला असता महाराष्ट्रातील ठाण्यात राहणाऱ्या अकिफचं नाव समोर आलं त्याला देखील अटक करण्यात आली. आता पुढे तपास करत असताना आणखी यामध्ये काय निष्पन्न होतं आणखी कुणाला अटक होते हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.