Sana Khan : सना खान प्रकरणातील आरोपीला अटक, अमित साहूनं दिली हत्येची कबुली
Nagpur News : नागपूरमधील सना खान प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी अमित साहूला पोलिसांनी अटक केली आहे.
![Sana Khan : सना खान प्रकरणातील आरोपीला अटक, अमित साहूनं दिली हत्येची कबुली Accused Amit Sahu arrested in Jabalpur Sana Khan case confesses to murder nagpur police marathi news update Sana Khan : सना खान प्रकरणातील आरोपीला अटक, अमित साहूनं दिली हत्येची कबुली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/11/01e08ac52904ca8eb414fe5ea5b02c011691759918760322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : नागपूरमधील (Nagpur News) सना खान प्रकरणात (Sana Khan Case Update) मोठी अपडेट समोर आली आहे. प्रमुख संशयित आरोपी अमित साहू (Amit Sahu) याला पोलिसांनी अटक केली आहे. जबलपूरमध्ये त्याला अटक करण्यात आली असून लवकरच त्याला नागपूर पोलीस ताब्यात घेणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे अमित साहू याने सना खान यांची हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे.
सना खान प्रकरणातील आरोपीला अटक
सना खान प्रकरणात आता अमित साहूला अटक करण्यात आली आहे. सना खान प्रकरण नागपूर पोलिसांनी आधीच संशयित आरोपी अमित शाहूच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून नागपूर पोलिसांचे एक प्रकरण तपासासाठी परत जबलपूरला गेलं आहे.
अमित साहूनं दिली हत्येची कबुली
भारतीय जनता युवा मोर्च्याची कार्यकर्ता सना खान 1 आगस्टला अमित शाहूला भेटायला जबलपूर येथे गेल्या तेव्हापासून ती बेपत्ता आहे. अमित शाहूचा नोकर जितेंद्र गौड याने दिलेल्या जबाबावरून सना खान हीचा घातपात झाल्याचा संशय नागपूर पोलिसांना आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मागील दहा दिवसांपासून भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्त्या सना खान (Sana Khan) या बेपत्ता असून अद्याप तिच्याविषयी काही ठोस माहिती मिळाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्ट रोजी अमित साहूसोबत व्हिडीओ कॉलवर भांडण झालं. त्यानंतर सना त्याच रात्री तातडीने अखेरच्या बसने जबलपूरला गेली, मात्र ती पुन्हा परतलीच नाही. अमित साहू आणि सना खान यांची मैत्री होती. अमित साहू (Amit Sahu) हा जबलपूरमधील एक हॉटेल व्यावसायिक आहे. सना खान आणि अमित साहून या दोघांनी लग्न केलं असल्याचा दावा काही जणांनी केला आहे, पण यामधील सत्यता अद्याप पोलीस तपासात समोर आलेली नाही.
सना खान 2 ऑगस्टपासून बेपत्ता
सना खान हिने जबलपूरला पोहचल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता नागपुरातील आपल्या कुटुंबीयांना फोन केला होता. यावेळी तिने तिच्या घरच्यांना ती सुखरुप पोहचली असल्याचं कळवलं होतं. 1 ऑगस्ट रोजी सना आणि अमितमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. सना हिने दिलेली सोन्याची चैन अमितच्या गळ्यात दिसली नसल्यामुळे रागावलेल्या सना खान हिने थेट जबलपूरचा मार्ग धरला होता, असं सांगण्यात येत आहे. पण, सनाने तिच्या घरच्यांना फोन करुन कळवल्यानंतर तिचा फोन बंद झाला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)