एक्स्प्लोर

Majha Katta : 2014 मध्ये होणार होता मविआचा प्रयोग, भाजपने शरद पवारांना ऑफर का दिली? पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट

Prithviraj Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माझा कट्टावर संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर भाष्य करताना गौप्यस्फोट केले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट अजित पवारांसोबत गेल्यानंतरही भाजपने शरद पवार यांना ऑफर दिली असल्याची माहिती असल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. अजित पवार यांना सोबत घेतलं असले तरी शरद पवार हे राज्यात फिरले तरी आपले मनसुबे पूर्ण होऊ शकत नाही, असा भाजप नेतृत्त्वाला अंदाज आला. त्यातून त्यांनी शरद पवार यांना सत्तेच्या बाजूने आल्यास सन्मानजनक पद देण्याची ऑफर अजित पवारांच्या माध्यमातून दिली असल्याचा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. भाजपने कडू औषध समजून अजित पवारांना सोबत घेतले असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले. इंडिया आघाडीने एकजुटीने प्रयत्न केल्यास भाजपचा पराभव निश्चित असल्याचेही त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी 2014 मध्येच मविआचा प्रयोग होणार होता, असेही म्हटले. 

राज्याचे माजी मुख्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्ट्या'वर इंडिया आघाडी, राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. पृथ्वाीराज चव्हाण यांनी म्हटले की, भाजपने पक्ष फोडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल लोकांमध्ये प्रचंड सहानुभूती आहे. मात्र, गुप्त बैठकींमुळे लोकांमध्ये संभ्रम होतो. भाजपकडून येत्या काळात विविध पक्ष फोडण्यासाठी प्रयत्न होतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.  शरद पवार जर राज्यात फिरू लागले तर अजित पवारांना मिळणाऱ्या यशात आडकाठी होईल. अशी भीती भाजप नेतृत्वाला आहे. त्यामुळेच पुण्यातील गुप्त बैठक ही पवारांना ऑफर देण्यासाठी होती, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.  

अजित पवारांना भाजपने सोबत का घेतले?

महाविकास आघाडीमुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळणे अशक्य दिसत होते. त्यानंतर मविआ फोडण्यात आली. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांना फोडण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडण्यासाठी घेतलेली जोखीम आणि मराठा चेहरा म्हणून भाजपने त्यांना मुख्यमंत्री म्हणून संधी दिली. मात्र, त्यांचा प्रभाव राज्यात पडत नसल्याने भाजपच्या नेतृत्वाने अजित पवार यांना सोबत घेतले. निवडणुकीतील यशासाठी कडू औषध घ्यावे लागेल असे सांगत भाजप नेतृत्वाने अजित पवार यांना सोबत घेतले असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. 

2014 मध्येच मविआचा प्रयोग?

2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचा राजकीय प्रयोग झाला. मात्र, 2014 मध्ये, त्यावेळीदेखील अशी चर्चा झाली होती. माझ्यापर्यंत चर्चा आली होती. त्यावेळी मागील सरकारचा मुख्यमंत्री होतो. त्यावेळी ही चर्चा पुढे नेली नाही. दिल्लीतून पक्ष नेतृत्वातून आक्षेप घेतला जाईल, असे वाटले. असा गौप्यस्फोटही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 2014 मध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतची चाचपणी झाली होती. ही चर्चा माझ्याकडे आल्यानंतर हे अशक्य असून आघाडी कशी होईल, असं म्हणत नकार दिला होता, असेही चव्हाण यांनी म्हटले. मात्र, पुढे भाजपचा कारभार पाहता त्यांना सत्तेवरून हटवण्यासाठी ही व्यापक आघाडी झाली असल्याचे त्यांनी म्हटले. 

इंडिया आघाडी एकजूट राहिल्यास विजय निश्चित

इंडिया आघाडीच्या प्रयत्नाबद्दल ही पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले. भाजपकडे नरेंद्र मोदी, हिंदुत्वाच्या नावावर सध्या 35 टक्के मतदान आहे हे मान्य करावे लागेल. तर, त्यांच्याविरोधात 60 ते 65 टक्के मतदान आहे.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विरोधात, भाजपच्या विरोधात मतदान झाले. मात्र ते विभागले गेले. सध्या लोकसभेत विविध 38 पक्षाचे खासदार आहेत. काँग्रेस स्वबळावर लढली तर 2014, 2019 सारखी स्थिती होऊ शकते...आम्हाला ती स्थिती पुन्हा आणायची नाही असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. भाजपला सत्तेतून बाहेर काढायचे आहे. पुन्हा सत्तेवर आल्यास देशाचे भवितव्य धोक्यात असेल. त्यांना एकपक्षीय हुकूमशाही आणायची असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. 

इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये काही राज्यात जागा वाटपाचा तिढा आहे.. तो चर्चेने सोडवला जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले. काही राज्यांमध्ये इंडिया आघाडीमधील पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत. मात्र, त्या ठिकाणी सामंजस्याने निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप आणि एनडीएला कोणत्याही स्थितीत फायदा होऊ द्यायचा नाही असे ठरलं असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashid Khan : वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
Mumbai Rains : मुंबईत जोरदार पावसाचं कमबॅक कधी?  समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
मुंबईत पाऊस कधी वेग पकडणार? समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune NCP Protest : ड्रग्ज प्रकरणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमकTOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 10 AM :  ABP MajhaABP Majha Headlines :  10:00AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashid Khan : वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
Mumbai Rains : मुंबईत जोरदार पावसाचं कमबॅक कधी?  समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
मुंबईत पाऊस कधी वेग पकडणार? समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
Marathi Serial Updates Tu Bhetashi Navyane : छोट्या पडद्यावर  नव्वदीचा नॉस्टेल्जीया, सुबोध भावे-शिवानीचा मालिकेत हटके लूक
छोट्या पडद्यावर नव्वदीचा नॉस्टेल्जीया, सुबोध भावे-शिवानीचा मालिकेत हटके लूक
NEET Paper Leak Case : मोठी बातमी! नीट पेपर फुटी प्रकरणात दुसरी अटक; फरार जिल्हा परिषद शिक्षकाला बेड्या, इतर दोघांचा शोध सुरू
नीट पेपर फुटी प्रकरणात दुसरी अटक; फरार जिल्हा परिषद शिक्षकाला बेड्या, इतर दोघांचा शोध सुरू
MLC Election : काँग्रेस नेते विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत, विधानपरिषदेवर कुणाला संधी,  कोणत्या नेत्यांची नावं चर्चेत?
महाराष्ट्रातील काँग्रेस नेते विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत, विधानपरिषदेचा फैसला होणार? कुणाला संधी
Munjya Box Office Collection Day 18 :  बॉक्स ऑफिसवरून 'मुंज्या'चं भूत उतरेना,  18 व्या दिवशी किती केली कमाई?
बॉक्स ऑफिसवरून 'मुंज्या'चं भूत उतरेना, 18 व्या दिवशी किती केली कमाई?
Embed widget