(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zomato Acquiring Blinkit : झोमॅटोनं खरेदी केली ब्लिंकिट कंपनी, 4447 कोटींचा करार
Zomato Acquiring Blinkit : झोमॅटो ब्लिंकिटचे ब्लिंक कॉमर्स म्हणजेच आधीचे ग्रोफर्स इंडिया खरेदी करणार आहे. 4 हजार 447 कोटींमध्ये हा करार पार पडणार आहे.
Zomato Acquiring Grofers India : ऑनलाइन फूड डिलिव्हरी (Food Delievery) प्लॅटफॉर्म झोमॅटो (Zomato) आता ब्लिंक कॉमर्स (Blinkit's Blink Commerce) म्हणजे पूर्वी ग्रोफर्स इंडिया (Grofers India) म्हणून ओळखले जाणारे प्लॅटफॉर्म खरेदी करणार आहे. ब्लिंकिट (Blinkit) ऑनलाईन शॉपिंग कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये 4447.48 कोटी रुपयांचा करार झाला. झोमॅटो कंपनीच्या बोर्डाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत ब्लिंक कॉमर्सचे 33,018 इक्विटी शेअर्स त्यांच्या गुतवणूकदारांकडून खरेदी करण्यास एकमतानं मान्यता दिली. यानुसार, झोमॅटोने ब्लिंक कॉमर्सचे शेअर्स 13.45 लाख रुपये प्रति इक्विटी शेअर या किमतीने खरेदी केले. झोमॅटोनं ही माहिती दिली आहे.
झोमॅटो क्विक कॉमर्स कंपनी (Quick Commerce Company) ब्लिंकिट 4 हजार 447 कोटी रुपयांना विकत घेणार आहे. फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो लिमिटेडच्या संचालक मंडळाने शुक्रवारी अडचणीत असलेली क्विक कॉमर्स कंपनी ब्लिंकिट 4,447 कोटी रुपयांना खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामध्ये कंपनीचे सर्व शेअर्स विकत घेतले जातील. झोमॅटोनं शुक्रवारी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.
स्टॉक एक्स्चेंजला नियामक फाइलिंगमध्ये माहिती देताना झोमॅटोनं सांगितले की, त्यांच्या संचालक मंडळाने ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडचे 33,018 इक्विटी शेअर्स खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. ही कंपनी आधी ग्रोफर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जात होती. झोमॅटोनं या कंपनीसोबत 4447 कोटी रुपयांचा करार करणार आहे. 4447,47,84,078 रुपयांच्या या करारामध्ये प्रति इक्विटी शेअरची किंमत 13,46,986.01 रुपये आहे.
गेल्या वर्षी झोमॅटोने ग्रोफर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला 150 दशलक्ष डॉलरचे कर्ज दिले होते, ज्याचे आता ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड असं नामकरण करण्यात आलं आहे. झोमॅटो (Zomato Limited) च्या शेअरची किंमत 1.15 टक्क्यांनी वाढून 70.35 रुपये झाली. शुक्रवारी ट्रेडिंग सत्र बंद झाल्यानंतर कंपनीने ही घोषणा केली.
Zomato to acquire quick commerce company Blinkit for Rs 4,447 crore
— ANI Digital (@ani_digital) June 24, 2022
Read @ANI Story | https://t.co/bpjaY5nINA#Zomato #Blinkit #Commerce pic.twitter.com/dxkvwbxnRH