34 व्या वर्षी अब्जाधीश झालेले निखील कामथ संपत्ती दान करणार? वाचा मुलासंदर्भात त्यांचे विचार काय?
निखील कामथ हे झिरोधा या ब्रोकरेज कंपनीचे संस्थापक आहेत. ते त्यांच्या संपत्तीचा बहुसंख्य भाग दान करण्याच्या विचारात आहेत.
मुंबई : झिरोधा (Zerodha) या ब्रोकरेज कंपनीचे संस्थापक निखिली कामथ (Nikhil Kamath) हे नेहमीच चर्चेत असतात. आजही ते एका भाड्याच्या घरात राहतात. ते आज अब्जाधीश आहेत. मात्र कुटुंब, परिवार आणि संपत्ती याबाबत त्यांचे फार वेगळे विचार आहेत. मुलासंदर्भात त्यांचे फार वेगळे विचार आहेत. मी मुल जन्माला घातल्यास माझे पुढचे 20 वर्षे खराब होतील, असं ते म्हणतात. विशेष म्हणजे त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा ते दान करणार आहेत.
जीवन आणि मृत्यूसंदर्भात काय विचार?
जीवन आणि मृत्यूसंदर्भात कामथ यांचे विचार फार वेगळे आहेत. मृत्यूनंतर कोणीतरी आपल्याला आठवणीत ठेवावं म्हणून मुल जन्माला घालणं व्यर्थ आहे. मृत्यूनंतर तुम्हाला कोणतीरी स्मरणात ठेवणं हे व्यर्थ आहे. मला वाटतं तुम्ही जन्माला यावं, चांगला राहवं. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या लोकांशी तुम्ही चांगला व्यवहार करावा, असं कामथ म्हणतात.
"एखाद्या संस्थेला पैसे दाण करणं पसंद करेल"
भारतीय लोकांचे सरासरी आयुर्मान हे 72 वर्षे आहे. माझ्याजवळ आणखी 35 वर्षे बाकी आहेत. त्यामुळे बँकेत पैसे ठेवण्याला काहीही अर्थ नाही. याच कारणामुळे 20 वर्षांत मी जे पैसे कमवले आहेत. तसेच आागमी 20 वर्षांत मी जे पैसे कमवणार आहे ते बँकेत ठेवणार नाही. त्याऐवजी मी हे पैसे एखाद्या संस्थेला दान करणं पसंद करेल, अशा शब्दांत निखील कामथ यांनी भावना व्यक्त केल्यात.
निखील कामथ 34 व्या वर्षी अब्जाधीश (Nikhil Kamath Wealth)
दरम्यान निखील कामथ हे अब्जाधीश आहेत. 2010 निखील कामथ यांनी त्यांचे भाऊ नितिन कामथ यांच्यासोबत झिरोधा या ब्रोकरेज कंपनीची स्थापना केली. झिरोधा कंपनीसह Gruhas, हेज फंड True Beacon या कंपन्यांचीही त्यांनी सुरुवात केली. फिनटेक कंपनीसोबतच त्यांनी रेनमॅटर आणि रेनमॅटर फाऊंडेशनची सुरुवात केली. झिरोधामुळे कामथ बंधूंचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. ते वयाच्या 34 व्या वर्षी अब्जाधीश झाले. फोर्जच्या म्हणण्यानुसार नितीन कामथ एकूण 3.45 अब्ज डॉलर (जवळजवळ 28 हजार कोटी) रुपयांचे मालक आहेत. निखील यांनी त्यांची बहुसंख्य कमाई दान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऊर्जा, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रात प्रगती, सुधारणा करण्यासाठी संपत्तीतील बहुसंख्य हिस्सा दान करणार आहेत.
हेही वाचा :
रिलायन्स उद्योग समूहाचा मेगा प्लॅन, वैद्यकीय क्षेत्रात गुंतवणार 1 ते 3 हजार कोटी?
'या' चार लार्ज कॅप फंडाचे लार्ज फायदे! SIP केल्यास मिळतील तब्बल 21 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स
या आठवड्यात येणार 'हे' सहा आयपीओ, कमाईचा सिक्सर मारण्याची नामी संधी!