Home Loan : तुम्हीही खरेदी करु शकता 1 कोटीचं घर, फक्त 'ही' ट्रिक वापरुन प्लॅन करा!
Home Loan : एक कोटीचे घर घेण्यासाठी तुम्ही योग्य उपाययोजना केल्या तर तुम्ही स्वत:चे घर नक्की घेऊ शकाल.
मुंबई : आयुष्यात स्वत:चं घर (Home) घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण सध्या घराच्या वाढत्या किंमती आणि कर्जाचे हफ्ते यामुळे घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न अपूर्णच राहतं. पण आता तुम्ही तुमच्या हक्काचं घर घेऊ शकता. जर तुम्ही योग्य नियोजन केलत तर तुम्ही अगदी 1 कोटी रुपयांचे देखील घर घेऊ शकता. आजकाल बाजारात आलिशान घरांची मागणी वाढत चालली आहे. मुंबई, दिल्ली बंगळूरु यांसारख्या शहरांमध्ये स्वत:चं घर घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे.
अगदी परवडणाऱ्या घरांची किंमत ही 50 लाखांपर्यंत असू शकते. पण जर तुम्हाला अलिशान आणि मोठं घर हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम मोजावी लागते. त्याचं नियोजन तुम्ही कसं कराल याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तुमच्या कर्जाच्या हफ्त्यांचं नियोजन देखील तुम्हाला करण्यात मदत होऊ शकते.
1 कोटी कर्जाचा हफ्ता
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर तुम्हाला 1 कोटी रुपयांचे घर घ्यायचे असेल तर तुम्ही 75% म्हणजेच 75 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. सध्या, गृहकर्जावरील व्याजदर 8.5 टक्के मानला, तर 20 वर्षांच्या कालावधीसाठी तुमचा हप्ता सुमारे 65,000 रुपये प्रति महिना असेल. अशा प्रकारे तुम्हाला 75 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. तसेच जर तुम्ही फ्लोटिंग रेटवर गृहकर्ज घेतले, तर कर्जाचा व्याजदर आणि हफ्ता देखील कमी होऊ शकतो. कारण आरबीआयचा रेपो दर अजूनही खूप जास्त आहे, ज्यामुळे गृहकर्जावरील व्याजदर खूप जास्त आहेत.
कर्जाचं ओझं होऊ शकतं कमी
जर तुम्हाला कमी कर्जाच्या हफ्त्यावर 1 कोटी रुपयांचे घर घ्यायचे असेल तर तुम्ही 50 लाख रुपयांपर्यंत डाउन पेमेंटची व्यवस्था करू शकता. यामुळे तुमच्या व्याजाचा बोजा 80 लाख रुपयांवरून 54-55 लाख रुपयांपर्यंत कमी होईल. म्हणजेच तुम्हाला व्याजात 25-26 लाख रुपयांची थेट बचत होईल. त्याच वेळी, व्याजदर कमी झाल्यास, तुमच्या कर्जाचा हफ्ता देखील वेळेनुसार कमी होईल. त्यामुळे तुमचा कर्जाचा हफ्ता हा 43,500 रुपयांपर्यंत येईल. यामुळे तुमच्या हातात खर्च करण्यासाठी अतिरिक्त पैसे असतील.
( कर्जासंबंधित अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा. वरील दिलेली माहिती केवळ माहिती म्हणून पुरवत असून एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :