Year Ender 2021 : या वर्षातला सेन्सेक्सचा 47 हजार ते 61 हजारांचा अभूतपूर्व प्रवास
देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने यंदा 47 हजार ते 61 हजारांचा प्रवास पूर्ण केला. पण सेन्सेक्सला 40 हजार ते 50 हजाराच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 21 महिने लागले होते.
Year Ender 2021: गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. 24 मार्च 2020 रोजी शेअर बाजार 25 हजार 638.90 या नीचांकी पातळीवर होता पण त्यानंतर अर्थचक्राचा गाडा सुरु झाला आणि शेअर बाजाराचा निर्देशांक शिखरावर पोहोचला.
25 जुलै 1990 रोजी सेन्सेक्सने पहिल्यांदा एक हजाराची पातळी ओलांडली होती आणि त्यानंतर 15 जानेवारीला दीड वर्षांनी पुढची एक हजार म्हणजेच दोन हजारांची पातळी ओलांडली होती. पण 2021 हे वर्ष सेन्सेक्ससाठी महत्त्वाचे होते कारण या वर्षात सेन्सेक्सने अनेक हजारांचा प्रवास पार केला.
देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने यंदा 47 हजार ते 61 हजारांचा प्रवास पूर्ण केला. पण सेन्सेक्सला 40 हजार ते 50 हजाराच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 21 महिने लागले होते, मात्र या वर्षात इतकी गुंतवणूक झाली की सेन्सेक्सने अवघ्या 8 महिन्यांत 50 हजार ते 60 हजारांचा टप्पा पार केला.
सेन्सेक्सचा 61 हजारांपर्यंतचा प्रवास
48 हजार : गेल्या वर्षीच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला बाजार 47 हजार 751.33 वर बंद झाला होता. यानंतर 4 जानेवारीला 48 हजारांची पातळी ओलांडून 48 हजार 176.80 च्या पातळीवर बंद झाला.
49 हजार : या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सेन्सेक्सने आठवडाभरात आणखी एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला. सेन्सेक्सने 11 जानेवारीला 49 हजारांची पातळी ओलांडली आणि 49 हजार 269.32 वर स्थिरावला.
50 हजार : 49 हजारांची पातळी ओलांडल्यानंतर सेन्सेक्सने फेब्रुवारीत पुन्हा एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला. अर्थसंकल्प अर्थात बजेट पास झाल्यानंतर हा देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक 3 फेब्रुवारीला प्रथमच 50 हजारांच्या पुढे गेला होता आणि 50 हजार 255.75 वर बंद झाला होता.
51 हजार : यानंतर आठवडाभरात सेन्सेक्स एक हजार अंकांनी मजबूत झाला आणि 51 हजाराचा टप्पा पार करून 51,348.77 वर बंद झाला.
52 हजार : 51 हजारांचा महत्त्वाचा टप्पा पार केल्यानंतर सेन्सेक्सने आठवडाभरात पुन्हा एकदा हजार अंकांची मजल मारली आणि तो 52 हजारांवर पोहोचल्यानंतर बंद झाला. 15 फेब्रुवारीला सेन्सेक्स 52 हजार 154.13 वर त्याने उसळी घेतली
53 हजार : या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत सेन्सेक्सने 48 हजार ते 52 हजारांचा टप्पा ओलांडला होता, मात्र त्यानंतर सेन्सेक्सला पुढचा महत्त्वाचा टप्पा ओलांडायला पाच महिने लागले. 7 जुलै रोजी सेन्सेक्सने 53 हजारांची पातळी ओलांडली होती आणि 53 हजार 054.76 वर बंद झाला होता.
54 हजार : सेन्सेक्सने 53 हजारांची पातळी ओलांडल्यानंतर पुढच्याच महिन्यात 54 हजारांची पातळी पार केली. 4 ऑगस्ट 2021 रोजी सेन्सेक्स 54 हजारांवर पोहोचल्यानंतर प्रथमच 54 हजार 369.77 वर बंद झाला.
55 हजार : 54 हजारांची पातळी ओलांडून दोन आठवड्यांत सेन्सेक्स एक हजार अंकांनी मजबूत झाला आणि 13 ऑगस्ट रोजी तो 55 हजारांची पातळी ओलांडून 55,437.29 वर बंद झाला.
56 हजार : सेन्सेक्सचा पुढचा महत्त्वाचा थांबा ५६ हजार होता, जो ऑगस्टमध्येच पार झाला. 54 हजारांची पातळी ओलांडल्यानंतर 14 दिवसांनी 27 ऑगस्ट रोजी सेन्सेक्सने 56 हजारांची पातळी ओलांडली आणि 56,124.72 वर बंद झाला होता.
57 हजार : सेन्सेक्ससाठी ऑगस्ट महिना उत्तम ठरला. ऑगस्टच्या सुरुवातीला बाजार 54 हजारांच्या खाली होता आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्याने 57 हजारांचा स्तर ओलांडला. 31 ऑगस्ट रोजी तो 57,552.39 वर बंद झाला.
58 हजार : सेन्सेक्ससाठी ऑगस्ट हा एक उत्तम महिना होता आणि त्याने अनेक महत्त्वाचे टप्पे पार केले. पुढच्याच महिन्यात सप्टेंबर मध्ये त्यात तेजी कायम राहिली आणि 3 सप्टेंबरला तो 58 हजारांची पातळी ओलांडून 58129.95 वर बंद झाला.
59 हजार : देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांकात 58 हजारांची पातळी ओलांडल्यानंतर दोन आठवड्यांत त्याने 59 हजारांची पातळीही ओलांडली आणि 16 सप्टेंबर रोजी तो 59,141.16 वर जोरदार बंद झाला.
60 हजार : सेन्सेक्स 40 हजारांवर पोहोचल्यानंतर 3 जून 2019 रोजी पहिल्यांदा बंद झाला आणि त्यानंतर 50 हजारांवर पोहोचण्यासाठी सुमारे 21 महिने लागले. 3 फेब्रुवारी 2021 रोजी सेन्सेक्स प्रथमच 50 हजार पार केल्यानंतर बंद झाला. त्यानंतर पुढील 10 हजार गुणांची भर घालण्यासाठी केवळ आठ महिने लागले आणि यावर्षी सप्टेंबरमध्ये 60 हजारांचा टप्पा पार केला. 24 सप्टेंबर रोजी सेन्सेक्सने 60 हजारांचा टप्पा ओलांडून 60,048.47 वर बंद केला होता. जलद लसीकरण आणि आर्थिक घडामोडींमध्ये सुधारणा यामुळे सेन्सेक्स या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचू शकल्याचा दावा तज्ज्ञाचा आहे.
61 हजार : 60 हजारांची महत्त्वाची पातळी ओलांडल्यानंतर पुढच्याच महिन्यात ऑक्टोबरमध्ये सेन्सेक्सने पुढचं शिखर गाठलं आणि 14 ऑक्टोबरला 61 हजारांची पातळी ओलांडली. 14 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा सेन्सेक्स 61,305.95 वर बंद झाला.
कोरोना महामारीमुळे झालेली घसरण आणि त्यानंतर सुरू झालेले आर्थिक विकासाचं चक्र यामुळे शेअर बाजारातली वाढलेली गुंतवणूक यामुळे अनेक अर्थांनी 2021 वर्ष शेअर बाजारासाठी महत्त्वाची ठरलं
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha