कर्ज घेण्यात परुषांपेक्षा महिला आघाडीवर, Gold Loan चं प्रमाण अधिक; घर खरेदीतही वाटा वाढला
गेल्या काही वर्षांत, कर्ज (Loan) घेणाऱ्या बँक ग्राहकांमध्ये महिलांची संख्या वाढली आहे. ही वाढ पर्सनल लोनपासून गोल्ड लोनपर्यंत जवळपास सर्वच वर्गात झाली आहे.
Womens Day 2024: अलिकडच्या काळात सर्वच क्षेत्रात महिला (Women) काम करताना दिसतायेत. पुरुषांच्या बरोबरीन काम करत असल्याचं चित्र दिसत आहे. गेल्या काही वर्षांत, कर्ज (Loan) घेणाऱ्या बँक ग्राहकांमध्ये महिलांची संख्या वाढली आहे. ही वाढ पर्सनल लोनपासून गोल्ड लोनपर्यंत जवळपास सर्वच वर्गात झाली आहे.
स्त्रिया या जास्तीत जास्त कर्ज घेत असल्याचं चित्र दिसत आहे. घर खरेदीतही त्यांचा वाटा वाढत आहे. गेल्या काही वर्षांत, कर्ज घेणाऱ्या बँक ग्राहकांमध्ये महिलांची संख्या वाढली आहे. ही वाढ पर्सनल लोनपासून गोल्ड लोनपर्यंत जवळपास सर्वच वर्गात झाली आहे. सोने कर्ज असो की वैयक्तिक कर्ज असो किंवा गृहकर्ज असो, किरकोळ कर्जामध्ये महिलांचा वाटा सातत्याने वाढत आहे. क्रेडिट ब्युरो CIRF हाय मार्कने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये महिला कर्जदारांबद्दल माहिती सांगण्यात आली आहे.
Gold Loan घेण्यात महिला आघाडीवर
CIRF च्या ताज्या अहवालानुसार, महिलांना गोल्ड लोन घेणे सर्वात जास्त आवडते. अहवालात असे म्हटले आहे की, सुवर्ण कर्जाच्या बाबतीत, एकूण कर्जदारांमध्ये महिलांचा वाटा सर्वाधिक 44 टक्के आहे. तर शैक्षणिक कर्ज घेणाऱ्यांमध्ये महिलांचा वाटा 36 टक्के आहे. त्याचप्रमाणे गृहकर्जात महिलांचा वाटा 33 टक्के आणि मालमत्ता कर्जात 30 टक्के आहे. सर्वात कमी 24 टक्के वाटा व्यवसाय कर्जाचा आहे. विविध प्रकारची कर्जे घेण्यामध्ये महिला आता पूर्वीपेक्षा अधिक पुढे येत असल्याचे अहवालात दिसून आले आहे. गृहकर्ज असो की वैयक्तिक कर्ज, सुवर्ण कर्ज असो की शैक्षणिक कर्ज, प्रत्येक श्रेणीतील महिलांचा वाटा पूर्वीपेक्षा वाढला आहे. पूर्वी संपूर्ण कर्ज घेणाऱ्या कर्जदारांमध्ये महिलांचा वाटा 32 टक्के होता. वर्षभरानंतर महिलांचा वाटा आता 33 टक्के झाला आहे.
दरम्यान, घरे खरेदी करणाऱ्या महिलांची संख्येत देखील वाढ होताना दिसत आहे. गृहकर्जाच्या बाबतीत महिला कर्जदारांच्या वाढत्या संख्येचे मुख्य कारण कमी व्याजदर असल्याचे अहवालात म्हटले आहे. बहुतांश बँका महिलांना पुरुषांपेक्षा कमी व्याजदरात गृहकर्ज देतात. CRIF च्या आकडेवारीमध्ये संयुक्त कर्जाचाही समावेश आहे. एक वर्षापूर्वी वैयक्तिक कर्जामध्ये महिलांचा सहभाग 15 टक्के होता, तो आता 16 टक्के झाला आहे. त्याचवेळी, सुवर्ण कर्जामध्ये महिला कर्जदारांचा हिस्सा एक वर्षापूर्वी 41 टक्क्यांवरून 43 टक्क्यांवर पोहोचला आहे. या कालावधीत शैक्षणिक कर्जातील त्यांचा हिस्सा 35 टक्क्यांवरून 36 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मात्र, व्यवसाय कर्जातील कमी वाटा ही चिंतेची बाब आहे.
महत्वाच्या बातम्या:
अदानी समुहावरील कर्जाचा बोजा कमी, कर्ज परतफेडीला वेग; आता 'या' राज्यात करणार मोठी गुंतवणूक