एक्स्प्लोर

अदानी समुहावरील कर्जाचा बोजा कमी, कर्ज परतफेडीला वेग; आता 'या' राज्यात करणार मोठी गुंतवणूक

कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी अदानी ग्रुपने गेल्या काही महिन्यांत परतफेडीला वेग दिला आहे. सध्या अदानी समुहाची आर्थिक स्थिती सुधारल्याचे चित्र दिसत आहे.

Adani Group : गौतम अदानी (Gautam Adani) हे देशातील एक बडे उद्योगपती आहेत. सध्या त्यांच्या अदानी समुहाची (Adani Group) हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांची कामं सुरु आहेत. दरम्यान, कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी अदानी ग्रुपने गेल्या काही महिन्यांत परतफेडीला वेग दिला आहे. सध्या अदानी समुहाची आर्थिक स्थिती सुधारल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं त्यांनी झपाट्यानं कर्जफेड करण्यास सुरुवात केलीय. 

कर्जाची पातळी पाच वर्षांतील सर्वात कमी

अदानी समूहाची आर्थिक स्थिती सुधारली आहे. त्यांच्या कर्जाच्या परतफेडीत वाढ झाली आहे. त्यामुळं आता समूहावरील कर्जाची पातळी पाच वर्षांतील सर्वात कमी झाली आहे. दरम्यान, अशातच अदानी समूहाने आता मध्य प्रदेशात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. NDTV प्रॉफिटच्या अहवालानुसार, क्रेडिट प्रोफाइलच्या बाबतीत अदानी समूहाची आर्थिक स्थिती गेल्या पाच वर्षांतील सर्वोत्तम आहे. नजीकच्या भविष्यात पुनर्वित्त संदर्भात समूहासाठी कोणताही धोका नाही. 31 डिसेंबर रोजी संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत समूहाचा EBITDA (earnings before interest, taxes, depreciation, and amortization) 60 टक्क्यांनी वाढून 19,475 कोटी रुपये झाला आहे.

अदानी समुहावर आता कर्ज किती?

NDTV हा अदानी समूहाचा एक भाग आहे. अहवालात कर्जाच्या आकड्यांबाबत त्यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यांत अदानी समूहाचे निव्वळ कर्ज 3.5 टक्क्यांनी कमी झाले आहे. आता अदानी समूहाच्या निव्वळ कर्जाचा आकडा 1,78,350 कोटींवर आला आहे. गेल्या 5 वर्षांतील हा नीचांक आहे. त्याच वेळी, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत रोख शिल्लक सुमारे 9 टक्क्यांनी वाढून 43,952 कोटी रुपये झाली आहे.

मध्य प्रदेशमध्ये 75 हजार कोटींची गुंतवणूक 

दरम्यान, अदानी समूहाने मध्य प्रदेशमध्ये 75 हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. अदानी समूहाने शुक्रवारी उज्जैनमध्ये प्रादेशिक उद्योग परिषदेदरम्यान ही घोषणा केली. आपली गुंतवणूक विविध क्षेत्रांमध्ये होणार असून, या गुंतवणुकीमुळे राज्यात 15 हजारांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे समूहाने सांगितले.

मध्य प्रदेशमध्ये आतापर्यंत 18 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे संचालक प्रणव अदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या समूहाला मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात वाढीची क्षमता दिसत आहे. ज्याचा फायदा घेण्यासाठी समूह मोठी गुंतवणूक करणार आहे.अदानी समूहाने मध्य प्रदेशमध्ये आतापर्यंत 18 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळं 11 हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

अदानी समूहानं एक मोठा निर्णय, संरक्षण क्षेत्रात करणार 3000 कोटींची गुंतवणूक

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
JIO IPO: जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी

व्हिडीओ

Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण; पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी तुडवलं, पार्श्वभागात पेट्रोल टाकून..; लातूर हादरलं
संतापजनक! तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण; पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी तुडवलं, पार्श्वभागात पेट्रोल टाकून..; लातूर हादरलं
Gokul Election Result LIVE: गोकुळमध्ये अभूतपूर्व उलथापालथ होण्याची शक्यता; सतेज पाटलांच्या आघाडीचे 14 उमेदवार आघाडीवर, आघाडी अशीच राहिल्यास एकहाती सत्ता
गोकुळमध्ये अभूतपूर्व उलथापालथ होण्याची शक्यता; सतेज पाटलांच्या आघाडीचे 14 उमेदवार आघाडीवर, आघाडी अशीच राहिल्यास एकहाती सत्ता
Kolhapur Firing News : कोल्हापूर हादरलं! जयसिंगपूरच्या दानोळीत दिवसाढवळ्या गोळीबार; सराईत गुन्हेगार महेश दळवी जागीच गतप्राण
कोल्हापूर हादरलं! जयसिंगपूरच्या दानोळीत दिवसाढवळ्या गोळीबार; सराईत गुन्हेगार महेश दळवी जागीच गतप्राण
तुझं काम करुन देतो, मी मंत्र्यांचा पीए आहे; आर्थिक लूट करणाऱ्या आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
तुझं काम करुन देतो, मी मंत्र्यांचा पीए आहे; आर्थिक लूट करणाऱ्या आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
Kolhapur Gokul Election Result: महायुती विरोधात समविचारी आघाडीमध्ये कांटे की टक्कर; हसन मुश्रीफांच्या मुलासह, माजी अध्यक्ष डोंगळे पिछाडीवर; गोकुळमध्ये उलथापालथ
महायुती विरोधात समविचारी आघाडीमध्ये कांटे की टक्कर; हसन मुश्रीफांच्या मुलासह, माजी अध्यक्ष डोंगळे पिछाडीवर; गोकुळमध्ये उलथापालथ
Tiger Shroff Car Firing Marathi News: अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला; आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला; आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
Rain in Konkan: दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी भातशेती कापली अन् आता धो-धो पाऊस आला, सिंधुदुर्गात पावसाचा यलो अलर्ट
दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी भातशेती कापली अन् आता धो-धो पाऊस आला, सिंधुदुर्गात पावसाचा यलो अलर्ट
Embed widget