महिलांना श्रीमंत बनवणाऱ्या योजना कोणत्या? 2025 मध्ये कशी कराल मोठी कमाई?
अलिकडच्या काळात गुंतवणुकीचं (Investment) महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक करणं महत्वाचं आहे.
Women Investment Plan : अलिकडच्या काळात गुंतवणुकीचं (Investment) महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक करणं महत्वाचं आहे. दरम्यान, महिलांना गुंतवणूक करण्यासाठी विविध योजना आहेत. यामध्ये गुंतवणूक करुन महिला मोठा नफा कमावू शकतात. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीमुळे जलद नफा मिळतो, परंतु काहीवेळा त्यामुळे खूप मोठे नुकसानही होते. जर तुम्हाला शेअर मार्केटचे चांगले ज्ञान नसेल आणि तुम्हाला चांगला परतावा हवा असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करु शकता. स्त्रिया नोकरी करत असतील तेव्हाही आणि गृहिणी असतील तरीही बचत करतात. .
सोन्यात गुंतवणूक करणं फायद्याचं
नवीन वर्षात सोनं 900 रुपयांनी महाग झालं आहे, आज म्हणजेच 3 जानेवारी 2025 रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 81,518 रुपयांवर पोहोचला आहे. वर्षअखेरीस सोने करोडपतीच्या आसपास पोहोचू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. सर्वात वाईट परिस्थितीत सोन्याच्या किमतीत जरी घसरण झाली तरी फारशी घसरण होणार नाही. त्यामुळं सोन्यात गुंतवणूक करणे हा महिलांसाठी चांगला पर्याय ठरेल आणि त्यांना चांगला परतावाही मिळेल.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणेही फायद्याचे
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीमुळे जलद नफा मिळतो, परंतु काहीवेळा त्यामुळे खूप मोठे नुकसानही होते. त्यामुळे महिलांना चांगला परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर त्यांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी, कारण म्युच्युअल फंड कंपनीचे तज्ज्ञ अनेक संशोधन अहवालांच्या आधारे तुमची गुंतवणूक वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवतात. 2024 मध्ये अनेक म्युच्युअल फंडांनी 40 ते 50 टक्के परतावा दिला आहे.
महिला सन्मान बचत योजना
ज्या ग्रामीण महिलांना सोने आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येत नाही, त्या सरकारी महिला बचत सन्मान योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन गुंतवणूक करता येते आणि यामध्ये मॅच्युरिटी कालावधी 2 वर्षांचा आहे. तसेच, महिला सन्मान बचत योजनेत 7.5 टक्के व्याज उपलब्ध आहे.
वाढत्या महागाईच्या तुलनेत आर्थिक नियोजन करणं गरजेचं
दिवसेंदिवस महागाई (Inflation) वाढत आहे. त्यामुळं पैशाचे मूल्य देखील कमी होत आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे आज 1 कोटी रुपये असतील तर पुढच्या 30 वर्षात त्याची किंमत 23 लाख रुपयेच असणार आहे. त्यामुळं महागाईच्या तुलनेत तुमची कमाई देखील वाढणं गरजेचं आहे. कमाई वाढवण्यासाठी तुम्ही आत्तापासूनचं नियोजन करणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला अडचणी येऊ शकतात.