निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी SBI ला मुदतवाढ मिळणार का? पुढच्या आठवड्यात होणार निर्णय
निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाला (State Bank of India) मुदतवाढ मिळणार का? याचा फैसला पुढल्या आठवड्यात होणार आहे.
SBI News : निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाला (State Bank of India) मुदतवाढ मिळणार का? याचा फैसला पुढल्या आठवड्यात होणार आहे. SBI ने 30 जूनपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडे याबाबत मुदतवाढ मागितली आहे. ADR (असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स) ने इलेक्टोरल बाँड्स प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. यापूर्वी दिलेल्या निकालात SBI 6 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाकडे तपशील सादर करण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान, SBI ने पुढील आठवड्यात सुनावणी होणाऱ्या तारखेपर्यंत मुदतवाढ मागणारा अर्ज दाखल केला असला तरी प्रशांत भूषण यांनी ADR ने दाखल केलेल्या अवमान याचिका mention केली आहे. SBI ने दाखल केलेल्या मुदतवाढीच्या अर्जासोबत सोमवारी 11 मार्च रोजी त्यावर सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. त्यावर विचार करणार असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
SBI देशातील 5वी सर्वात मोठी फर्म, 'या' दिग्गज कंपनीला टाकलं मागे