देशात अन्नधान्य, इंधन, वीज महागले, घाऊक महागाई दरात वाढ!
देशात सध्या किरकोळ महागाई दरात काहीशी घट झाली आहे. पण दुसरीकडे घाऊक महागाई दरात गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे.
मुंबई : सोमवारी देशातील एप्रिल महन्यातील किरकोळ महागाई दराचे आकडे सार्वजनिक करण्यात आले. या आकड्यांनुसार सध्या देशात फक्त 0.02 टक्क्यांनी महागाई कमी झाली आहे. घाऊक महागाईचे आकडेदेखील समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सध्या देशातील घाऊक महागाई वाढली आहे. त्यामुळेच स्वयंपाक घरातील वस्तू, खाद्यान्न महागले आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयने प्रदर्शित केलेल्या आकडेवारीनुसार देशात पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकघरातील गॅस तसेच वीज महागली आहे. खाद्यान्नंदेखील, विशेष रुपाने भाज्या महागल्या आहेत. मार्च 2024 मध्ये घाऊक महागाई 0.53 टक्के होता. एप्रिल महिन्यात मात्र घाऊक महागाई दर 1.26 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात घाऊक महागाई दर 0.79 टक्के होता.
...म्हणून घाऊक महागाई दरात वाढ
देशातील घाऊक बाजारातील सामानाच्या किमतींवरून घाऊक महागाई दर काढला जातो. घाऊक बाजारात खाद्यान्न, पेये यांची किंमत वाढल्यामुळे घाऊक महागाई दर वाढल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे. यासह वीज, कच्चे तेल, नैसर्गिक गॅस, पॅक्ड फूड आदी गोष्टींची किंमत वाढल्यामुळेदेखील घाऊक महागाई दर वाढल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
इंधन, वीज महागली
एप्रिल महिन्यात खाद्य महागाई दर वाढून 7.74 टक्के झाला होता. मार्च महिन्यात हा दर 6.88 टक्के होता. भाज्यांचा महागाई दर एप्रिल महिन्यात 23.60 टक्के होता. हाच दर मार्च महिन्यात 19.52 टक्के होता. अशाच पद्धतीने इंधन आणि विजेच्या महागाई दरातही वाढ झालेली आहे. एप्रिलमध्ये विजेचा महागाई दर 1.38 टक्के होता. हाच दर मार्च महिन्यात - 0.77 टक्के होता. एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. मात्र लोकांची अन्नधान्यांच्या महागाईची चिंता अजूनही कायम आहे.
हेही वाचा :
अनेकवेळा अर्ज करूनही बँक क्रेडिट कार्ड का देत नाही? 'ही' आहेत प्रमुख कारणं, जाणून घ्या
26 गाड्यांचा ताफा, 60 अधिकारी, प्राप्तिकर विभागाची नांदेडमध्ये छापेमारी, 170 कोटींची मालमत्ता जप्त!
'या' तीन कंपन्याचे शेअर्स घेतल्यास पडेल पैशांचा पाऊस, जाणून घ्या सविस्तर!