आता दसऱ्याआधीच दिवाळी! ऑक्टोबरमध्ये सिडको 25 हजार घरं विकणार, जाणून घ्या सविस्तर!
सिडको नवी मुंबई भागात हजारो घरे विक्रीसाठी काढणार आहे. ही घरे विकण्यासाठी सिडकोडून अभिनव संकल्पना राबवली जाणार आहे. दसऱ्याच्या अगोदर ही घरे खरेदीसाठी उपलब्द्ध होणार आहेत.
मुंबई : सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी 2030 घरांची सोडत प्रक्रिया राबवली जात आहे. या सोडत प्रक्रियेत अर्ज करण्याची मुदत संपली आहे. आता या सोडत प्रक्रियेत आपल्याला घर मिळणार का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, एकीकडे म्हाडाच्या सोडत प्रक्रियेची चर्चा होत असताना आता दुसरीकडे सिडकोनेही आपली घरे विक्रीसाठी काढली आहेत. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ही घरे तब्बल 25 हजार घरं विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजेच दसऱ्याआधी सिडकोकडून एकूण 25 हजार घरे विक्रीसाठी काढली जाणार आहेत. त्यासाठी सिडकोकडून निवडा तुमच्या आवडीचे घर ही संकल्पना राबवली जात आहे. या संकल्पनेअंतर्गत जो प्रथम येईल, त्याला प्राधान्य या तत्त्वारी सिडको 25 हजार घरांची विक्री करणार आहे. बाजारभावापेक्षा ही घरे स्वस्त असतील, असे सिडकोने सांगितले आहे.
नेमकी कोणाला घरे मिळणार?
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिडको एकूण 25 हजार घरे विक्रीसाठी काढणार आहे. यातील बहुसंख्य घरे ही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत विकली जाणार आहे. म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी यातील बहुसंख्या घरे असणार आहेत. नवी मुंबईत वेगवेगळ्या 27 ठिकाणी सिडकोकडून एकूण 67 हजार घरे बांधली जाणार आहेत. त्याच्या पहिल्या टप्प्यात एकूण 43 हजार घरे बांधण्याची परवानगी महारेनाने दिली आहे. या घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
नेमकी कुठे घरे असणार?
आगामी दोन-तीन दिवसांत निवडा तुमच्या आवडीचे घर या संकल्पनेचा अंतिम आराखडा तयार केला जाईल. या योजनेअंतर्त जुईनगर, खारघर, वाशी, द्रोणगिरी, तळोजा, कळंबोली, करंजाडे, मानसरोवर या भागातील घरे असणार आहेत. या घरांसाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे.
हेही वाचा :