Veg And Non Veg Thalli Price : काय सांगता! शाहाकारी थाळी वर्षभरात 7 टक्क्यांनी महागली, नॉनव्हेज मात्र स्वस्त!
शाहाकारी जेवणाची थाळी महागली आहे. तर मांसाहारी जेवण स्वस्त झाले आहे.
मुंबई : जगभरात घडणाऱ्या घडामोडींचा परिणाम आपल्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पडत असतो. गेल्या काही दिवसांत कांदा, टोमॅटो, बटाटा यासारख्या फळभाज्यांच्या किमतीमध्ये झालेल्या बदलामुळे शाहाकारी जेवण महागले आहे. याबाबत क्रिसिल मार्केट इंटेलिजेंस अँड अॅनॅलिटिक्स या संस्थेने 'रोटी राईस रेट इंडेक्स' (Roti Rice Index) नावाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार शाहाकारी जेवणाची थाळी (Veg Food Thali) ही गेल्या वर्षाच्या तुलनेत सात टक्क्यांनी महागली आहे. विशेष म्हणजे एकीकडे शाहाकारी जेवणाच्या थाळीची किंमत 7 टक्क्यांनी वाढलेली असताना दुसरीकडे मांसाहारी जेवणाच्या थाळीच्या (Non Veg Thali) किमतीत मात्र घट झाली आहे.
शाहाकारी थाळी 7 टक्के महागली
गेल्या वर्षी म्हणजेच मार्च 2023 मध्ये शाहाकारी जेवणाच्या थाळीची किंमत ही साधारण 25.5 रुपये होती. आता हीच किंमत मार्च 2024 मध्ये 27.3 टक्क्यांपर्यंत महागली आहे. जेवणाच्या व्हेज थाळीमध्ये साधारणपणे भाकरी, भाजी, भात, डाळ, दही, सलाद अशा प्रकारचे अन्नपदार्थ असतात. गेल्या काही दिवसांत टोमॅटो, कांदा, बटाटा यासारख्या फळभाज्या महागल्या आहेत. त्यांचे भाव अस्थिर होते. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत शाहाकारी जेवणाची एक थाळी महागल्याचे म्हटले जात आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये याच जेवणाच्या थाळीसाठी 27.4 रुपये लागायचे.
मांसाहारी थाळी 7 टक्क्यांनी स्वस्त
व्हेज थाळी गेल्या वर्षाच्या तुलनेत महागली आहे. पण नॉन व्हेज थाळीची किंमत मात्र 7 टक्क्यांनी कमी झाली आहे. मांसासाठी लागणाऱ्या कोंबड्यांची मागणी घटल्यामुळे सध्या ही किंमत कमी आहे, असे क्रिसिल संस्थेचे म्हणणे आहे. नॉन व्हेजच्या थाळीची किंमत मार्च 2023 मध्ये 59.2 रुपये होती. मार्च 2024 मध्ये ही किंमत 54.9 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात या नॉन व्हेज थाळीची किंमत ही 54 रुपये होती.
टोमॅटो 36 टक्के महागले?
कांदा आणि बटाट्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे सध्या व्हेज थाळी महागली आहे. क्रिसिल संस्थेच्या म्हणण्यानुसार कांद्याचा दर 40, टोमॅटोचा दर 36 तर बटाट्याचा दर साधारण 22 टक्क्यांनी वधारलेला असल्यामुळे शाहाकारी थाळी महागली आहे. पुरेशा प्रमाणात पुरवठा नसल्यामुळे तांदुळ 14 तर डाळीचा दर 22 टक्क्यांनी वाढला आहे. दुसरीकडे ब्रॉयलर कोंबडीच्या मांसाचा दर 16 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळेच नॉन व्हेज थाळीच्या दरात घट झाली आहे. मार्च हा रमजानचा पवित्र महिना होता. या महिन्यात मात्र ब्रॉयरल कोंबडीच्या मांसात 5 टक्क्यांनी वाढ झाली होती.
हेही वाचा :
आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेट 'जैसे थे', कर्जधारकांना दिलासा!