Rahul Gandhi Portfolio : राहुल गांधींचा तगडा पोर्टफोलिओ! 'या' 10 कंपन्यांत कोट्यवधींची गुंतवणूक, 5 म्युच्युअल फंडमध्येही लाखो गुंतवले!
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेअर मार्केटमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केलेली आहे.
मुंबई : शेअर मार्केट (Share Market) हे असे क्षेत्र आहे, ज्यात तुम्ही एका जागेवर बसून पैसे कमवू शकता. एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी करून अमूक व्यक्तीने पैसे कमावल्याचेही तुम्ही अनेकवेळा ऐकले असेल. शेअर मार्केट तुम्हाला पैसे देऊ शकते, हे खरे असले तरी येथे पैशांची गुंतवणूक करताना तुम्हाला य क्षेत्राचे ज्ञान असणे गरजेचे आहे. जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करतात. यात खेळाडू, अभिनेते, अभिनेत्री तसेच राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi Share Market) यांनी शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीचीही चांगलीच चर्चा होत आहे.
4.3 कोटींचे खरेदी केले शेअर्स
राहुल गांधी (Rahul Gandhi Portfolio) यंदाची लोकसभा निवडणूक लढवत असून त्यांनी केरळमधील वायनाड येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी कोणकोणत्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी केलेले आहेत तसेच कोणकोणत्या म्युच्युअल फंडांमध्ये पैसे गुंतवलेले आहेत, याची सविस्तर माहिती दिलेली आहे. राहुल गांधींनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार त्यांनी एकूण 4.3 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केलेले आहेत. तर म्युच्युअल फंडामध्ये त्यांनी 3.81 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. राहुल गांधी यांच्या बँक खात्यात 26.25 लाख रुपये आहेत.
राहुल गांधींची गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक
राहुल गांधींनी sovereign gold bonds च्या रुपात 15.21 लाख रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. त्यांची एकूण संपत्ती 20.4 कोटी रुपये आहे. यात 9.2 कोटी रुपयांची जंगम तर 11.5 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
राहुल गांधींनी कोणत्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले?
- पिडिलाईट इंडस्ट्रिज लिमिटेड- 1474 शेअर्स- मुल्य 42.27 लाख रुपये
- बजाज फायनान्स- 551 शेअर्स- मुल्य 35 लाख 89 हजार रुपये
- नेस्ले इंडिया लिमिटेड- 1370 शेअर्स- मुल्य- 35 लाख 67 हजार रुपये
- एशियन पेंट्स लिमिटेड- 1231 शेअर्स- मुल्य- 35 लाख 29 हजार रुपये
- टायटन कंपनी लिमिटेड- 897 शेअर्स- मुल्य- 32 लाख 59 हजार रुपये
- हिंदुस्तान युनिलव्हर लिमिटेड- 1161 शेअर्स- मुल्य- 27 लाख रुपये
- आयसीआयसीआय बँक लिमिटेड- 2299 शेअर्स- मुल्य- 24 लाख 83 हजार रुपये
- दिविज लॅबोरेटरी लिमिटेड- 567 शेअर्स-मुल्य- 19 लाख 7 हजार रुपये
- सुपरजित इंजिनिअरिंग लिमिटेड- 4068 शेअर्स- मुल्य- 16 लाख 65 हजार रुपये
- गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेड-508 शेअर्स- मुल्य- 16 लाख 43 हजार रुपये
राहुल गांधी यांनी म्युच्युअल फंडमध्येदेखील कोट्यवधींची गुंतवणूक केलेली आहे. यातील पाच म्युच्युअल फंड खालीलप्रमाणे आहेत.
- एचडीएफसी स्मॉल कॅप रेज-जी
- आयसीआयसीआय प्रुडेंशियल सेव्हिंग जी
- PPFAS FCF D Growth
- एचडीएफसी MCOP DP GR
- आयसीआयसीआय EQ&DF F
(टीप- आम्ही कोणत्याही कंपनीत पैसे गुंतवण्याचा सल्ला देत नाही किंवा शिफारस करत नाही. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)
संबंधित बातम्या :
आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेट 'जैसे थे', कर्जधारकांना दिलासा!