एक्स्प्लोर

US Share Market Crash : अमेरिकेन शेअर बाजारात हाहाकार, 2 ट्रिलियन डॉलर बुडाले, भारतीय शेअर बाजाराची धाकधूक वाढली, ब्लॅक मंडेची भीती 

US Share Market Crash : टेक कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाल्यानं अमेरिकन शेअर बाजारात काही तासात 190 लाख कोटी रुपये बुडाले. याचा परिणाम भारतीय बाजारावर होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

US Share Market Crash नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारातील (Indian Share Market) गुंतवणूकदारांचं लक्ष आजच्या ट्रेडिंगकडे लागलं आहे. कारण शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली. अमेरिकन गुंतवणकूदारांनी टेक कंपन्यांच्या (tech company shares) शेअरची धडाधड विक्री केल्यानं मोठं नुकसान झालं आहे. यामुळं भारतीय शेअर बाजारात आजचा सोमवार ब्लॅक मंडे ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकन शेअर बाजारातील घडामोडींमुळं मार्च 2020 आणि एप्रिल 2025 च्या घसरणीची आठवण झाली. याशिवाय गिफ्ट निफ्टीमध्ये देखील 350 अंकांची घसरण तो 23091 पर्यंत घसरला, यामुळं भारतीय शेअर बाजारात आज नेमकं काय घडणार याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं आहे. गिफ्ट निफ्टी 7 जूनला बंद असल्यानं आता अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीनंतर आज 8 जूनला गिफ्टी निफ्टीत काय घडतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अमेरिकेत नेमकं काय घडलं?

शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात टेक कंपन्यांच्या शेअरमध्ये धडाधड विक्री झाली. अमेरिकन शेअर बाजार डाओ जोन्स 695.15 अंकांनी घसरुन 50866.78 अंकांवर बंद झाला. नॅस्डॅक 1121 अंकांनी घसरुन 25709.43 वर बंद झाला. एस अँड पी 500 निर्देशांक 200.57 अंकांनी घसरला आणि 7383.74 अंकांवर बंद झाला. सर्वात भीतीदायक बाब म्हणजे नॅस्डॅकमध्ये एप्रिल 2025 नंतर सर्वात मोठी घसरण झाली आहे. 

अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीची कारणं? 

टेक कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण: अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीचं कारण सेमीकंडक्टर म्हणजेच चिप कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. iShares Semiconductor ETF एका दिवसात 10 टक्क्यांनी घसरला.मार्च 2020 नंतरची ही सर्वात मोठी घसरण दिसून आली.

एआयचा फुगा फटतोय?

तज्ज्ञांच्या मते गेल्या दोन महिन्यात एआय आणि सेमीकंडक्टर शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. गुंतवणूदारांच्या पोर्टफोलिओत टेक कंपन्यांच्या शेअरचा वाटा वाढला होता. त्यामुळं नफा वसुली अपेक्षित होती, असं तज्ज्ञांनी म्हटलं. मार्क हॅकेट यांच्या मते गुंतवणूकदार दीर्घकाळापासून विक्रीच्या प्रतीक्षेत होते. 

अमेरिकन नोकऱ्यांची आकडेवारी

शुक्रवारी अमेरिकेत मे महिन्यातील नोकऱ्यांची आकडेवारी समोर आली. मे महिन्यात 1.72 लाख नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या. बाजाराला फक्त 80 हजार नोकऱ्यांची अपेक्षा होती. अमेरिकन अर्थव्यवस्था बाजाराच्या अपेक्षेपेक्षा अधिक मजबूत दिसून आली. यामुळं शेअर बाजाराला फटका बसला. 

नोकऱ्यांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्यानं आणि अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत झाल्यानं फेड रिझर्व्हकडून व्याज दरात कपातीची शक्यता कमी झाल्यानं बाँड यील्ड वाढले आहेत.

पुढील महिन्यात स्पेसेक्सचा आयपीओ येणार आहे.  हा जगातील  सर्वात मोठा आयपीओ मानला जातोय. त्यामुळं गुंतवणूकदार टेक कंपन्यांच्या शेअरची विक्री करुन पैसे जमा करत आहेत. दुसरीकडे बिटकॉईनमध्ये देखील मोठी घसरण झाली असून ते 60 हजार डॉलर्सच्या खाली पोहोचले आहेत. 

भारतात ब्लॅक मंडे?

गिफ्ट निफ्टी  शेवटच्या ट्रेडिंग 350 अंकांनी घसरला होता. बाँड यील्ड वाढले आहेत, बिटकॉईनच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. जागतिक गुंतवणूकदारांची जोखीम स्वीकारण्याची मानसिकता कमी झाली असल्यानं भारतीय शेअर बाजारात काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Advertisement

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Embed widget