एक्स्प्लोर

US China Slash Tariffs : अमेरिका अन् चीननं एकमेकांवरील टॅरिफ केलं कमी, व्यापार युद्ध थांबणार? जाणून घ्या सविस्तर

US China Slash Tariffs: टॅरिफमध्ये झालेली कपात दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

US China Slash Tariffs: जगातील दोन आर्थिक महासत्तांमध्ये झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर अमेरिका आणि चीनने आपापसातील संघर्षावर बुधवारी थोडक्यात विराम दिला. दोन्ही देशांनी एकमेकांवर लावलेल्या टॅरिफमध्ये 90 दिवसांसाठी सुमारे 115 टक्क्यांपर्यंत मोठी कपात करण्याची घोषणा केली. वॉशिंग्टन आणि बीजिंग दोघेही व्यापार युद्धाला तात्पुरती स्थगिती देण्यास तयार झाले. ज्यामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ माजली होती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वस्तूंच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला होता.

जेनिव्हामध्ये दोन दिवस चाललेल्या सखोल चर्चेनंतर अमेरिका चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील टॅरिफ 145 टक्क्यांवरून कमी करून 30 टक्के करण्यास तयार झाला आहे. दुसरीकडे, चीनने देखील टॅरिफचा दर 125 टक्क्यांवरून कमी करून 10 टक्के करण्याची घोषणा केली आहे. टॅरिफमध्ये झालेल्या या कपातीनंतर हे नवीन दर वॉशिंग्टनमध्ये बुधवारच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. टॅरिफमध्ये झालेली ही कपात दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

चर्चेतून काय निष्पन्न झालं?

अमेरिका आणि चीन यांच्यात टॅरिफ दरांबाबतच्या घोषणेपूर्वी मंगळवारी एका मुलाखतीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की, चीनसोबत एक अत्यंत मजबूत व्यापार करार करण्यासाठी वॉशिंग्टनने संपूर्ण ब्लूप्रिंट तयार केले आहे. विशेष म्हणजे, या करारानंतर अमेरिकन व्यवसायांसाठी चीनची अर्थव्यवस्था खुले होणार आहे. ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, यासोबतच आपणही चीनच्या व्यवसायासाठी आपल्या अर्थव्यवस्थेला उघडण्याचा प्रयत्न करत आहोत.

यापूर्वी ट्रम्प यांच्या कठोर टॅरिफ धोरणाचा सर्वात मोठा परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर झाला. मात्र, बीजिंगने देखील वॉशिंग्टनला जोरदार प्रत्युत्तर देत शुल्क शंभर टक्क्यांपर्यंत वाढवले होते. ट्रम्प यांच्या या टॅरिफमुळे चीनमध्ये उत्पादन करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांची अडचण वाढली होती. 

ट्रेड वॉर संपलं का?

अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता, ते आता पूर्णपणे संपलं आहे का? याचे उत्तर आहे – नाही. अमेरिका आणि चीन यांच्यात तणाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी वादग्रस्त मुद्दे अजूनही कायम आहेत. अमेरिकेने लावलेले टॅरिफचे दर चीनपेक्षा अधिक आहेत. वॉशिंग्टनने 20 टक्के अतिरिक्त शुल्क यासाठी लावले आहे. कारण ट्रम्प यांनी तक्रार केली होती की, चीनमधून आयात होणाऱ्या रसायनांचा (केमिकल्सचा) वापर औषधे तयार करण्यासाठी केला जातो.

वॉशिंग्टनकडून बीजिंगवर दीर्घकाळापासून फेंटानिल व्यापाराचा आरोप केला जात आहे, ज्याला बीजिंगने नेहमीच नाकारले आहे. एकीकडे अमेरिका या मुद्द्यावर पुढे चर्चा करण्याचे संकेत देत आहे, तर दुसरीकडे बीजिंगने वॉशिंग्टनला इशारा देत स्पष्ट सांगितले आहे की, त्यांनी आरोप करणे थांबवावे. अशा परिस्थितीत जाणकारांचे मत आहे की, बीजिंगच्या या इशाऱ्यानंतर टॅरिफवरील 90 दिवसांचा जो तात्पुरता ब्रेक लावण्यात आला आहे, तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

आणखी वाचा 

BSF Jawan Return: पाकिस्तानच्या कैदेतून परतलेल्या बीएसएफ जवानाची नोकरी जाणार? काय आहेत प्रोटोकॉल?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Pune navale bridge: पुण्यातील नवले ब्रीजवरच वारंवार अपघात का? पुणे वाहतूक CP मनोज पाटलांनी सांगितलं कारण
पुण्यातील नवले ब्रीजवरच वारंवार अपघात का? पुणे वाहतूक CP मनोज पाटलांनी सांगितलं कारण
पुण्यात भीषण अपघात, मुख्यमंत्री अन् पालकमंत्र्यांकडून शोक; रोहित पवार म्हणाले, ब्लॅक स्पॉट
पुण्यात भीषण अपघात, मुख्यमंत्री अन् पालकमंत्र्यांकडून शोक; रोहित पवार म्हणाले, ब्लॅक स्पॉट
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Congress Denies Alliance With MNS - MIM : काँग्रेसची भूमिका पक्की,मनसे,एमआयएमला सोबत न घेण्यावर  ठाम
Zero Hour Full : 'ठाकरेंचा सेवक' बॅनरमुळे नाराजी ते काँग्रेसचं नो मनसे... नो एमआयएम; सविस्तर चर्चा
Pune Navle Bridge Accident Fire : पुण्यातील नवले पुलावर 3-4 गाड्यांचा अपघात, वाहनांना भीषण आग
Pune Navale Bridge Accident : पुणे नवले पुलावरचा अपघात नेमका कसा घडला? पोलीस अधिकारी म्हणाले...
Pune Navale Bridge Accident Detail Report : पुणे नवले ब्रीज अपघाताची A to Z कहाणी : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Pune navale bridge: पुण्यातील नवले ब्रीजवरच वारंवार अपघात का? पुणे वाहतूक CP मनोज पाटलांनी सांगितलं कारण
पुण्यातील नवले ब्रीजवरच वारंवार अपघात का? पुणे वाहतूक CP मनोज पाटलांनी सांगितलं कारण
पुण्यात भीषण अपघात, मुख्यमंत्री अन् पालकमंत्र्यांकडून शोक; रोहित पवार म्हणाले, ब्लॅक स्पॉट
पुण्यात भीषण अपघात, मुख्यमंत्री अन् पालकमंत्र्यांकडून शोक; रोहित पवार म्हणाले, ब्लॅक स्पॉट
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
कोल्हापुरात शिंदेंच्या गळाला मोठा नेता; ठाकरेंचे माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेत, हाती भगवा
कोल्हापुरात शिंदेंच्या गळाला मोठा नेता; ठाकरेंचे माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेत, हाती भगवा
Pune Accident : साडे पाचची वेळ, भरधाव ट्रकची धडक मोठा आवाज, कारमधून मदतीसाठी हाक अन् आगीचे लोट, प्रत्यक्षदर्शीनं काय म्हटलं?
साडे पाचची वेळ, भरधाव ट्रकची धडक मोठा आवाज, कारमधून मदतीसाठी हाक अन् आगीचे लोट, प्रत्यक्षदर्शीनं काय म्हटलं?
Shardul Thakur : पालघर एक्स्प्रेस आता मुंबईच्या ताफ्यात, शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत मैदानावर उतरणार, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल
Finance: जुन्या गुंतवणुकीत अडकला आहात? ‘ही’ स्मार्ट ट्रिक तुमचं फिनान्शियल गेम बदलू शकते!
जुन्या गुंतवणुकीत अडकला आहात? ‘ही’ स्मार्ट ट्रिक तुमचं फिनान्शियल गेम बदलू शकते!
Embed widget