टोयोटाची सर्वात लहान इलेक्ट्रिक कार C +Pod सज्ज; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स?
टोयोटा कंपनीचा दावा आहे की, सी+POD रस्त्यांवर 150 किलोमीटरपर्यंत धावेल. म्हणजेच एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ती 150 किलोमीटर न थांबता धावेल.
Auto News : जपानी कार कंपनी टोयोटा मोटर कॉर्पोरेशन सर्वात लहान इलेक्ट्रिक कार सी+पॉड (C+Pod) ही कार बाजारात आणली आहे. जी अतिशय आकर्षक लूक आणि शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटारपासून बनली आहे. विशेष म्हणजे तुम्हाला जर ही गाडी घ्यायची असेल तर लवकर बुकिंग करावं लागणार आहे. कारण कंपनी मर्यादित मॉडेल्सच बाजारात आणणार आहे. नवीन C+पॉड इलेक्ट्रिक टू-सीटर BEV आहे. जे टोयोटाने मोबिलिटी ऑप्शन म्हणून लॉन्च केलं आहे.
या गाडीची वैशिष्ट्ये काय?
गर्दीच्या ठिकाणी पादचारी आणि त्याचप्रमाणे दुचाकी वाहनांना धडकू नये म्हणून या कारला एक विशेष फीचर देण्यात आले आहे. शिवाय ही कार कमी अंतरावर जाण्यासाठी म्हणून डिझाइन केली गेलीय. पॉवरसाठी 9.06 kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे, जी कारच्या फ्लोअरला लावण्यात आलीय. कारची मोटर जास्तीत जास्त 12 hp ची पॉवर आणि 56 Nm ची पीक टॉर्क जनरेट करते.
एकाच चार्जवर 150 किमी धावते
टोयोटा कंपनीचा दावा आहे की, सी+POD रस्त्यांवर 150 किलोमीटरपर्यंत धावेल. म्हणजेच एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ती 150 किलोमीटर न थांबता धावेल. 200V/16A वीज पुरवठ्याच्या मदतीने ही कार केवळ 5 तासात पूर्ण चार्ज होऊ शकते. त्याच वेळी, 100V/6A मानक वीज पुरवठ्याच्या मदतीने ही कार पूर्णपणे चार्ज होण्यास 16 तास लागतील.
दोन लोकांसाठी आरामदायी कार
ही कार आकाराने खूप लहान आहे. या कारचे एकूण वजन फक्त 690 किलो आहे. त्याची लांबी 2,490 मिमी, रुंदी 1290 मिमी आणि उंची 1,550 मिमी आहे. या कारमध्ये फक्त दोन लोकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. या कारचं एक्सटीरियर पॅनल प्लास्टिकचे बनवलेले आहे, जेणेकरून कारचं वजन किमान ठेवता येईल.
या कारची किंमत किती आहे?
टोयोटाने C + Pod दोन प्रकारांमध्ये लॉन्च केले आहे. त्याची एक्स ट्रिम आणि जी ट्रिम अशी दोन व्हेरिएट आहेत. त्याच्या एक्स व्हेरियंटची किंमत 1.65 दशलक्ष येन आहे, जे भारतीय चलनानुसार 11.75 लाख रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्या जी व्हेरिएंटची किंमत 1.71 दशलक्ष येन आहे, जे भारतीय चलनानुसार 12.15 लाख रुपये आहे.
इतर बातम्या