एक्स्प्लोर

Share Market : शेअर मार्केटसाठी आजचा दिवस महत्वाचा, मार्केटमध्ये नवा विक्रम होणार?  या शेअर्सला येणार अच्छे दिन

Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी (Share Market) आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज शेअर मार्केटमध्ये नवा विक्रम होण्याची शक्यता आहे.

Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी (Share Market) आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज शेअर मार्केटमध्ये नवा विक्रम होण्याची शक्यता आहे. कारण काल ​​बाजार बंद झाल्यापासून बरंच पाणी वाहून गेलं आहे. जागतिक स्तरावर बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत. त्यामुळं काही शेअर्समध्ये जोरदार तेजी येण्याची शक्यता आहे. अमेरिकेत (America) जवळपास 4 वर्षांनंतर सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने (Central Bank Federal Reserve) आपले व्याजदर 0.50 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. 

या कंपन्यांच्या शेअर्सवर सर्वांच्या नजरा

यूएस फेडरल रिझर्व्हने महागाईविरूद्धची लढाई थांबवली आहे. पुढील महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) धोरणात्मक व्याजदरांबाबत निर्णय घेण्यासाठी बसेल तेव्हा सर्वसामान्यांच्या कर्जाच्या ईएमआयचा बोजा कमी करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर फेडरल रिझर्व्हच्या या निर्णयानंतर अमेरिकन शेअर बाजारांमध्ये पुनरागमन झाले असून जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील बदलांचा संपूर्ण जगावर परिणाम होणार आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगात आघाडीवर आहे. तंत्रज्ञान तज्ञ किंवा कामगार पुरवण्यात भारत आघाडीवर आहे. अशा स्थितीत अमेरिकेत मागणी वाढल्याने टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल आणि टेक महिंद्रा या भारतीय टेक कंपन्यांसाठी अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या समभागांवर आज सर्वांच्या नजर राहणार आहेत.

फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचा परिणाम डॉलर निर्देशांकावरही झाला आहे. अशा स्थितीत बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील शेअर्सवरही या निर्णयाचा परिणाम होणार आहे. SBI ची बजाज फायनान्स, LIC आणि इतर बँकिंग शेअर्समध्ये नेमक्या काय घडामोडी होतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

मंत्रिमंडळाच्या निर्णयांमुळे या समभागांचे भवितव्य बदलणार 

बुधवारी रात्री उशिरा अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीची घोषणा केली आहे. त्याचवेळी बाजार बंद झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आज बाजारात अनेक शेअर्सचे नशीब बदलू शकते. सरकारने IREDA ला 4500 कोटी रुपयांचा निधी उभारण्यास मान्यता दिली आहे. अशा स्थितीत आज त्याच्या शेअर्समध्ये गती पाहायला मिळते. एवढेच नाही तर सरकारने चांद्रयान मिशन-4 लाही मान्यता दिली आहे. या मिशनवर सरकार 2,104 कोटी रुपये खर्च करणार आहे. अशा परिस्थितीत बीईएल, भारत डायनॅमिक्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि डीसीएक्स सिस्टीम्स यांसारख्या अवकाश क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या:

अमेरिकेच्या फेडरल बँकेचा महत्त्वाचा निर्णय, व्याजदरात मोठी कपात; भारतातही कर्ज स्वस्त होणार का?

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणीRavikant Tupkar Meet CM, DCM : रविकांत तुपकरांनी घेतली फडणवीस, अजित पवारांची भेट,काय आश्वासन दिलं?ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines at 2PM 29 January 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्सDhananjay Munde : धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर, प्रल्हाद जोशींच्या निवासस्थानी दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Supriya Sule on Santosh Deshmukh : संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार
भाजप लवकरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करणार? सबळ पुराव्याचा आधार घेण्याची शक्यता
Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
Embed widget