एक्स्प्लोर

अमेरिकेच्या फेडरल बँकेचा महत्त्वाचा निर्णय, व्याजदरात मोठी कपात; भारतातही कर्ज स्वस्त होणार का?

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने मोठा निर्णय घेतला आहे. या बँकेने तब्बल चार वर्षांनंतर व्याजदरात कपात केली आहे.

US Federal Reserve : अमेरिका हा देश जगातली महासत्ता आहे. या देशाने राबवलेल्या निर्णयाचा परिणाम भारतासह संपूर्ण जगावर पडतो. असे असताना आता अमेरिकेने व्याजदराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील मध्यवर्ती बँफ फेडरवल रिझर्व्हने तब्बल चार वर्षांनंतर व्याजदरात कपात करण्याचे जाहीर केले आहे.  फेडवरल रिझर्व्हने व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने घट केली आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँक नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवारी (18 ऑक्टोबर) फेडरल रिझर्व्हने हा निर्णय घेतला. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

अमेरिकेच्या फेडवरल रिझर्व्ह बँकेने याआधी 2020 साली व्याजदरात कपात केली होती. त्यानंतर आता चार वर्षांनी या बँकेने व्याजदरा 50 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. अमेरिकेत येत्या नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर तेथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असतानाच आता फेडवरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 

अमेरिकेत आता व्याजदर किती होणार? 

फेडवरल रिझर्व्हने व्याजदरात कपात करण्यासाठी एक बैठक घेतली होती. या बैठकीत व्याजदर कपातीच्या बाजूने 11 सदस्यांनी मत दिले. तर एका सदस्याने व्याजदर कपातीस विरोध केला. त्यामुळे बहुमताचा सन्मान करत फेडवरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर आता अमेरिकेत व्याजदर 4.75 ते 5.00 टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे. फेडवरल रिझर्व्ह बँकेने या वर्षाच्या शेवटपर्यंत व्याजदरात आणखी कपात केली जाईल असे संकेत दिले आहेत. बँकेच्या या निर्णयानंतर आता लोकांना कर्ज घेणे सोपे होणार आहे. अमेरिकेतील वेगवेगळ्या बँखादेखील आपला व्याजदार कमी करणार आहेत. 

व्याजदरात आणखी कपात होणार? 

या श्रेत्रातील तज्ज्ञांच्या मते फेडवरल रिझर्व्ह ही बँक भविष्यातही व्याजदरात कपात करू शकते. या वर्षांच्या शेवटपर्यंत अर्ध्या टक्क्याने तर 2025 साली एक टक्क्याने आणि 2026 साली पुन्हा अर्ध्या टक्क्याने व्याजदरात कपात होऊ शकते. ही कपात झाली तर अमेरिकेत व्याजदर 2.75 ते 3.0 टक्क्यांच्या आसपास असू शकतो.

अमेरिकेत महागाई दर किती?

फेडवरल रिझर्व्ह बँकेच्या मतानुसार अमेरिकेत महागाई दर 2 टक्क्याच्या दिशेने जात आहे. तसेच अमेरिकेत नोकऱ्यांची स्थिती चांगली आहे. चौथ्या तिमाहीत बेरोजगारी दर (Unemployment Rate) साधारण 4.4 टक्के राहू शकतो. तर महागाई दर 2.3 टक्के राहण्याची शक्यता आहे. दरम्यान अमेरिकन बँकेच्या या निर्णयानंतर भारताची रिझर्व्ह बँक व्याजदराबाबत नेमका काय निर्णय घेणार? भविष्यात भारतात कर्ज स्वस्त होणार का? असे विचारले जात आहे.

हेही वाचा :

पाच शेअर करणार धमाका! पैसे गुंतवल्यास देणार दमदार रिटर्न्स; जाणून घ्या स्टॉप लॉस, टार्गेट किती?

पर्सनल लोन घेताना 'या' तीन चुका कधीच करू नका, अन्यथा मोठ्या अडचणीत सापडाल?

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget