एक्स्प्लोर

जगाची अर्थव्यवस्था कोरोनाच्या कचाट्यात, शेअर बाजारात गुंतवणुकदारांचे 5 लाख कोटी बुडाले

कोरोना व्हायरसमुळं चीनची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाहायला मिळत आहे. कोरोनाचा विळखा कमी झाला नाही तर सोनं 46 हजारांवर जाण्याची शक्यता आहे.

मुंबई : जगभरात मृत्यूतांडवासाठी कारणीभूत ठरलेल्या कोरोना व्हायरसनं आता अर्थव्यवस्था पोखरायला सुरुवात केली आहे. जगभरातल्या शेअर बाजाराप्रमाणे मुंबईचाही शेअर बाजार कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. बंद होताना बाजारात 1 हजार 448 अंकाची घसरण पाहायला मिळाली. अवघ्या काही मिनिटांत गुंतवणुकदारांचे साडेपाच लाख कोटी बुडाले आहेत. जगात दुसऱ्या क्रमांकाची चीनची अर्थव्यवस्था पुरती कोलमडल्यानं गुंतवणुकीसाठी सोन्याला प्राधान्य देण्यात येतं आहे. त्यामुळं सोन्याचे दर 46 हजाराच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. तर तिकडे तीर्थक्षेत्रासाठी इराक इराणमध्ये गेलेले 2 हजार भारतीय अडकून पडलेत. त्यात महाराष्ट्रातील 600 जणांचा समावेश आहे. एकट्या सोलापुरातले 44 भाविक अडकले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच रोखता आला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. कोरोना व्हायरसमुळं चीनची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाहायला मिळत आहे. जगभरातील मार्केटमध्ये अस्थिरता असल्यानं सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक सोनं खरेदीकडे वळले आहेत. त्यामुळं गेल्या तीन महिन्यात सोनं तब्बल सहा हजारांनी वधारलंय. सध्या सोन्याचा भाव प्रति तोळा 43 हजाराच्या आसपास पोहोचला आहे. कोरोनाचा विळखा कमी झाला नाही तर सोनं 46 हजारांवर जाण्याची शक्यता आहे. लग्नघराला मात्र याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे. शेअर बाजारात हलकल्लोळ पाच महिन्यातील सर्वात निचांकी स्तरावर आहे. सेन्सेक्स -1448.37 अंकांनी घसरुन 38,297.29 वर आला आहे. म्हणजे -3.64% घसरण झाली आहे. निफ्टी 414 अंकांनी म्हणजेच 3.56 टक्क्यांनी घसरुन 11219 अंकांवर बंद झाला. मेटल, ऑटो, बँक, आयटी, ऑईल अँड गॅस, इन्फ्रा, पब्लिक सेक्टरमधील शेअर्सला सर्वात मोठा फटका बसणार आहे. जागतिक बाजारातील घसरणीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम होणार आहे. अमेरिकेत डाऊ मार्केटमध्ये दिवसभरातील सर्वात मोठी घसरण आहे. जपानची निक्केई मार्केट 2.5 टक्के घसरण झाली आहे. करोनो मुळे जुलै ऑगस्टमधील ऑलंम्पिक रद्द होईल या भीतीने बाजार घसरला आहे. ऑस्ट्रेलियात तीन टक्के तर दक्षिण कोरियातील शेअर बाजारात दिड टक्के घसरण झाली आहे. वेदांता 12.68 टक्के , टाटा मोटर्स 11.22 टक्के, टेक महिन्द्रा 8 टक्क्यांनी तर टाटा स्टील 7.52 टक्क्यांनी घसरला आहे. यस बँक, एसबीआय, अक्सिस बँकेचे शेअरही साडे पाच ते सहा टक्क्यांनी घसरले. इन्फोसिस, टक्क्यांनी, टीसीएस साडेपाच तर विप्रोचा शेअर साडे चार टक्क्यांनी घसरले. तर भारतीय रुपया 38 पैशांनी (71.93) घसरला. Aditya Thackeray | महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पर्यटनावर बांधू शकू हा विश्वास - पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे | ABP Majha संबंधित बातम्या :  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget