एक्स्प्लोर

IPO येण्याआधीच आमिर खान, रणबीर कपूरने केली कोट्यवधीची गुंतवणूक, 'ही' कंपनी पाडणार पैशांचा पाऊस, पैसे ठेवा तयार!

बॉलिवूडचे दिग्गज कलाकार वेगवेगळ्या कंपन्यांत पैसे गुंतवतात. अलिकडेच आमिर खान आणि रणबीर कपूर यांनी एका दिग्गज कंपनीत गुंतवणूक केली आहे.

Xolopak India Funded by Bollywood Stars: चित्रपटसृष्टीत काम करणारे सिनेस्टार आपलं मनोरंजन करतात. अभिनयाच्या जोरावर आज अनेक सिनेस्टार कोट्यवधीचे मालक आहेत. चित्रपटसृष्टी हाच अनेक अभिनेता-अभिनेत्रींचा मुख्य उत्पादन स्त्रोत आहे. मात्र काही स्टार्स आहे आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. आयपीओ, शेअर्स खरेदी करून या स्टार्सने कोट्यवधी रुपये कमवलेले आहेत. सध्या आमिर खान, रणबीर कपूर यांनी केलेल्या अशाच गुंतवणुकीची चर्चा होत आहे. लवकरच एका कंपनीचा आयपीओ येणार आहे. पण हा आयपीओ येण्याआधीच आमीर आणि रणबीर यांनी या कंपनीत कोट्यवधी रुपये गुंतवलेले आहेत.

आमिर खान, रणबीर कपूरने केली गुंतवणूक

बॉलिवूडचे अभिनेते, अभिनेत्र्या वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करून चांगले पैसे कमवत आहेत. आमिर आणि रणबीर यांनी नुकतेच Xolopak India नावाच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. ही कंपनी लवकरच आपला आयपीओ घेऊन येणार आहे. त्याआधीच आमिर आमि रणबीर यांनी ही गुंतवणूक केली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी (Akash Ambani) यांचे सासरे रसेल मेहता (Russell Mehta) यांच्या मालकीची ही कंपनी आहे. या कंपनीत आमिर खान (Amir Khan), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि करण जोहर (Karan Johar) यासारख्या दिग्गजांनी गुंतवणूक केली आहे. 

गुरुवारी (5 सप्टेंबर) या कंपनीने एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी कंपनीही ही माहिती दिली. बॉलिवूडच्या स्टार्ससह Riverstone Capital चे देवानाथन, रविनाथन अय्यर, ज्योती केतन ककारिया आणि जयरमण विश्वनाथन यासाख्या दिग्गजांनी या कंपनीच्या प्री-आईपीओमध्ये फेरीत गुंतवणूक केली आहे. 

Xolopak India कंपनी नेमकं काय करते? 

Xolopak India  या कंपनीचा लवकरच आयपीओ येणार आहे. त्यासाठी या कंपनीने Beeline Capital Advisors Pvt ही संस्था लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केली आहे. Xolopak India ही कंपनी टिकाऊ डिस्पोझेबल पॅकेजिंग प्रोडक्ट्स तयार करते. या कंपनीने नुकतेच एनएसई इमर्जला आयपीओचा ड्राफ्ट सादर केला आहे. ही कंपनी लाकडापासूनची कटलरी, चम्मच, चॉप स्टिक आदी वस्तू तयार करते. या कंपनीची उत्पादने अमूल, मदर डेअरी तसेच अनेक SME कंपन्यांना विकले जातात. एनएसईकडे दाखल केलेल्या ड्राफ्टनुसार ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 52,86,000 फ्रेश शेअर जारी करणार आहे. या प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये असणार आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे?

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या कंपनीने 31.47 कोटी रुपयांची कमाई केलेली आहे. एका वर्षात या कंपनीच्या कमाईत तीन पटीने वाढ झालेली आहे. गेल्या आर्थिक वर्षात या कंपनीने एकूण 6.36 कोटी रुपयांची कमाई केली होती.  

हेही वाचा :

Tech Sector Layoff : मोठी बातमी! IT कंपन्यांमध्ये मोठी उलथापालथ, तबब्ल 1 लाख 36000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ 

Ladki Bahin Yojana : आता नवीन फॉर्म भरा, लगेच 4500 रुपये मिळवा? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget