एक्स्प्लोर

Tesla in India: भारतासाठी टेस्लाचा 30 अब्ज डॉलर्सचा प्लान; प्लांट, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरही निर्मिती करणार

Elon Musk's Tesla in India: टेस्ला भारतात येण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. त्यांनी भारतासाठी 5 वर्षांची गुंतवणूक योजनाही तयार केली आहे. आता टेस्ला फक्त केंद्र सरकारच्या नव्या ईव्ही धोरणाची वाट पाहत आहे.

New EV Policy: जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार (Electric Vehicle) निर्माती कंपनी टेस्लानं (Tesla) भारतात गुंतवणुकीसाठी सुमारे 30 अब्ज डॉलर्स योजना तयार केली आहे. यासंदर्भात कंपनीची चर्चा सकारात्मक दिशेनं सुरू आहे. टेस्लानं भारतासाठी 5 वर्षांची गुंतवणूक योजना तयार केली आहे. केंद्र सरकारचं नवं ईव्ही धोरण लवकरच येणार असल्याची चर्चा आहे. टेस्ला सध्या नवं धोरण जाहीर होण्याची वाट पाहत आहे.

टेस्ला करणार देशातील सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक 

हिंदुस्तान टाईम्सनं सूत्रांचा हवाला देत वृत्त दिलं आहे की, जर टेस्लानं भारतात येण्याचा निर्णय घेतला, तर ती देशातील सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक असेल. टेस्लाच्या प्रकल्पाशी संबंधित चर्चेत सहभागी असलेल्या सूत्रांनी सांगितलं की, टेस्ला आपल्या प्लांटमध्ये सुमारे 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. याशिवाय त्याच्या संलग्न कंपन्या भारतात सुमारे 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. याशिवाय, बॅटरी विभागात सुमारे 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार आहे, जी कालांतरानं सुमारे 15 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढेल. ते म्हणाले की आम्हाला पूर्ण आशा आहे की टेस्ला सुमारे 30 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल.

केंद्र सरकारच्या ईव्ही धोरणाची प्रतीक्षा 

केंद्रातील मोदी सरकार ईव्ही धोरणाला अंतिम स्वरूप देण्यात व्यस्त आहे. हे धोरण टेस्लाला भारतात आणण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावेल. अहवालानुसार, नव्या धोरणात परदेशात बनवलेल्या ईव्हीवरील आयात शुल्क कमी केल्यास टेस्ला भारतात येण्याच्या आपल्या योजनांना गती देईल.

टेस्ला आपली उत्पादनं सर्वात आधी भारतात लॉन्च करणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेस्ला आपली उत्पादित उत्पादनं आधी भारतात लाँच करू इच्छितं. तसेच, ते चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरवर देखील काम सुरू करणार आहे. त्यांना मेड इन इंडिया कार बनवायची आहे. यासाठी कारखाना उभारण्यासाठी सुमारे 3 वर्ष लागतील. कंपनी भारतातून ईव्ही कार निर्यात करण्यावरही भर देणार आहे.

एलॉन मस्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेस्लाचे मालक एलॉन मस्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते आहेत. देशाला पुढे नेण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या प्रयत्नांचे मस्क भरभरुन कौतुक करतात. एलॉन मस्क आणि पंतप्रधान मोदी यांची गेल्या वर्षी जूनमध्ये न्यूयॉर्कमध्ये भेट झाली होती. त्यावेळी मस्क म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींनी मला भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. याचा मी गांभीर्यानं विचार करत आहे. मात्र, भारत सरकार देशात ईव्हीला प्रोत्साहन देत आहे. परंतु, कंपनीनुसार कोणतीही सवलत देण्यास तयार नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
Heena Gavit : मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 05 November 2024भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीचTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
Heena Gavit : मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Embed widget