एक्स्प्लोर

TATA Technologies IPO : 20 वर्षांची प्रतीक्षा संपणार! 'टाटा'चा आयपीओ लवकरच बाजारात येणार

TATA Group IPO : 20 वर्षांनंतर पहिल्यांदाचा टाटा समुहाच्या कंपनीचा आयपीओ बाजारात येणार आहे. टाटा टेक्नोलॉजी (TATA Technologies) चा आयपीओ लवकरच सुरु होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

TATA Technologies IPO Details : टाटा समूह (TATA Group) देशातील आघाडीच्या विश्वासू उद्योजकांपैकी एक आहे. तुम्ही टाटा समूहाचा आयपीओ (IPO) विकत घेण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यााठी आनंदाची बातमी आहे. लवकरच बाजारात टाटा समुहाच्या कंपनीचा आयपीओ येणार आहे. तब्बल दोन दशकानंतर म्हणजे सुमारे 20 वर्षानंतर टाटा समुहाच्या कंपनीचा आयपीओ सुरु होणार आहे. टाटा टेक्नोलॉजी (TATA Technologies) च्या आयपीओबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. हा आयपीओ लवकरच सुरु होण्याचे संकेत देण्यात मिळत आहेत.

लवकरच 'टाटा'चा आयपीओ बाजारात येणार

टाटा मोटर्सची सब्सिडिअरी कंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीचा (Tata Technologies) आयपीओ लवकरच बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. टाटा टेक्नॉलॉजी ही कंपनी प्रोडक्ट इंजिनिअरिंग आणि डिजीटल सर्व्हिस याच्याशी निगडीत आहे. आता या कंपनीचा आयपीओ आणण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.  टाटा मोटर्सकडून जर हा आयपीओ आला तर,  टाटा समूहाकडून 2004 नंतर येणारा पहिलाच आयपीओ असणार आहे. (TATA Technologies IPO)

20 वर्षांची प्रतीक्षा संपणार

टाटा टेक्नॉलॉजीज (TATA Technologies) च्या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी टाटा समूह मॉर्गन स्टॅनले इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, ब्लॅकरॉक आणि काही अमेरिकन हेज फंडांशी बोलणी करत असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे. ब्लॅकरॉक आणि मॉर्गन स्टॅनली यांच्यासोबतच टाटा टेक आपल्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अमेरिकन मालमत्ता व्यवस्थापक घिसल्लो कॅपिटल, ओकट्री कॅपिटल आणि की स्क्वेअर कॅपिटल यांच्याही संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे.

टाटा टेक्नॉलॉजीज (TATA Technologies) चा आयपीओ (IPO) 21 नोव्हेंबरच्या आसपास सबस्क्रिप्शनसाठी उघडू शकतो. म्हणजेच नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात टाटा टेक्नॉलॉजीज (TATA Technologies) चा आयपीओ (IPO) उघडू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सवर ग्रे मार्केट तेजीत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विदेशी फंड कंपनीमध्ये 2.5 अब्ज डॉलरच्या मुल्यांकनाने गुंतवणूक करू शकतात. गेल्या महिन्यात, TPG ने IPO पूर्व निधी उभारणीत कंपनीतील 9.9 टक्के हिस्सा घेतला. या IPO चा आकार 35 ते 375 दशलक्ष डॉलर्स असू शकतो. दरम्यान, टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सवर ग्रे मार्केट तेजीत आहे. ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स 275 रुपयांच्या प्रीमियमवर आहेत. तर, आतापर्यंत प्राइस बँकेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या  :

MSSC Saving Scheme : खास महिलांसाठी दमदार योजना! 7.50 टक्के व्याज, फक्त 1000 रुपयांपासून सुरुवात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Embed widget