टाटा समुहाचा हा स्टॉक 3-5 महिन्यांसाठी खरेदी करा, होईल भरपूर नफा; टार्गेट-स्टॉपलॉससह संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या!
Tata Group Stocks to BUY: पोजिशनल गुंतवणूकदारांनी पुढील 3-5 महिन्यांसाठी टाटा ग्रुप कंपनी इंडियन हॉटेल्सची निवड करण्याचा सल्ला ब्रोकरेजनं दिला आहे. यासाठी टार्गेट प्राईज आणि स्टॉपलॉस काय आहे याचीही सविस्तर माहिती दिली आहे.
Tata Group Stocks to BUY: शेअर बाजाराची (Share Market) सेंटिमेंट निगेटिव झाल्याचं पाहायला मिळत आहे. सलग सहा ट्रेडिंग सत्रांत घसरणीसह शेअर बाजार (Stock Market) बंद होत आहे. या घसरणीची दोन मुख्य कारणं सांगितली जात आहेत. पहिलं कारण म्हणजे, इस्रायल-हमास युद्ध आणि दुसरं कारण म्हणजे, अमेरिकन बाँड यिल्डमधील वाढती ताकद. अशा वातावरणात, शॉर्ट टर्म गुंतवणूकदारांसाठी, ब्रोकरेजनं पुढील 3-5 महिन्यांसाठी टाटा समूहाची हॉटेल कंपनी इंडियन हॉटेल्सची निवड केली आहे. हा शेअर 375 रुपये (Indian Hotels Share Price) आहे. जाणून घेऊयात या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची संपूर्ण स्ट्रॅटर्जी...
इंडियन हॉटेल्सचे (Indian Hotels) शेअर्स 5 दिवसांत 10 टक्क्यांनी घसरले
गुरुवारी, मासिक समाप्तीच्या दिवशी, इंडियन हॉटेलचे शेअर्स 375 रुपयांवर बंद झाले. व्यवहारादरम्यान हा शेअर 372 रुपयांच्या निचांकी पातळीवर आणि 386 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर व्यवहार करत होता. हा स्टॉक गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांपासून सतत घसरणीसह बंद होत आहे. या घसरणीत हा शेअर 414 रुपयांवरून 375 रुपयांवर घसरला. अशा प्रकारे हे करेक्श सुमारे 10 टक्क्यांचं होतं.
Indian Hotels Share Price Target
ब्रोकरेज फर्म IDBI कॅपिटलनं पुढील 3-5 महिन्यांसाठी हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 373 रुपयांचा स्टॉपलॉस दिला आहे, जो या शेयर्सनी इंट्राडेमध्ये पार केला आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांनी आगामी ट्रेडिंग सत्रांमध्ये किमतीच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे. जर या शेअर्सची किंमत पुन्हा उसळली तर खरेदी करा. तेजीचा कल पाहता पुढील 3-5 महिन्यांसाठी 450 रुपयांचं टार्गेट देण्यात आलेलं आहे. क्लोजिंगच्या तुलनेत टार्गेट प्राईज 20 टक्क्यांहून जास्त आहे. महत्त्वाचं म्हणजे, जर शेअर्सच्या किमतींत घट कायम राहिल्यास पोझिशन घेणं टाळण्याचा सल्लाही ब्रोकरेज फर्मकडून देण्यात आला आहे.
इंडियन हॉटेल्स शेअर्सच्या किंमतींचा इतिहास (Indian Hotels Share Price History)
Indian Hotels च्या शेअरसाठी 52 आठवड्यांचा उच्चांक 437 रुपये आहे, जो 7 सप्टेंबर 2023 रोजी झाला. 52 आठवड्यांचा नीचांक 280 रुपये आहे जो 27 जानेवारी 2023 रोजी होता. गुरुवारी हा शेअर ज्या किमतीवर बंद झाल्या त्याआधारे, या शेअर्सनी एका आठवड्यात 9.5 टक्के, एका महिन्यात 9 टक्के आणि तीन महिन्यांत सुमारे 4 टक्के निगेटिव रिटर्न दिला आहे.
ब्रोकरेज हाऊस काय आहे?
ब्रोकरेज फर्म ही एक अशी जागा आहे जिथे गुंतवणूकदार आणि व्यापारी स्टॉक खरेदी आणि विक्री करण्यासाठी जातात. फर्म खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करते आणि सर्वांसाठी एक ट्रेडिंग प्लेटफॉर्म प्रदान करते. ते या व्यवहारांवर कमिशन आकारते. जेव्हा जेव्हा गुंतवणूकदार स्टॉक खरेदी करतो, तेव्हा व्यवहार शुल्क आकारले जाते.
(टीप : वरील स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला ब्रोकरेज हाऊसनं दिला आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)