एक्स्प्लोर

मोठी बातमी! टाटा समूहाचा तब्बल 55 हजार कोटींचा तगडा आयपीओ येणार, पडणार पैशांचा पाऊस?

टाटा उद्योग समूहाशी निगडीत असलेल्या एका बड्या कंपनीचा दमदार आयपीओ लवकरच येऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना पैसे कमवण्याची चांगली संधी मिळू शकते.

Tata Sons IPO : या वर्षी आलेल्या बहुसंख्य आयपीओंना गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे यातील बऱ्याच आयपीओंनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले. काही आपयीओंनी तर गुंतवणूकदारांचे पैसे थेट दुप्पट केले. या वर्षी ह्युंदाई मोटर्स इंडिया या कंपनीचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ आला. या आयपीओलाही गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला. दरम्यान, ह्युंदाईनंतर लवकरच आणखी एक दमदार आयपीओ येण्याची शक्यात आहे. विशेष म्हणजे हा आयपीओ जगभरात मोठं नाव असलेल्या टाटा उद्योग समूहाचा असू शकतो. 

आरबीआयने विनंती फेटाळली

मिळालेल्या माहितीनुसार टाटा सन्स चा आपयीओ लवकरच येऊ शकतो. कारण नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय दिला आहे. टााट उद्योग समूहाने आरबीआयकडे टाटा सन्स या कंपनीला शेअर बाजारावर सूचिबद्ध न करण्याची सूट मिळावी, अशी विनंती केली होती. मात्र आरबीआयने ही विनंती फेटाळली आहे. त्यामुळे आरबीआयच्या या निर्णयानंतर टाटा उद्योग समूहाला टाटा सन्सचा आयपीओ घेऊन यावा लागणार आहे. असे झाल्यास गुंतवणूकदारांसाठी चांगल्या परताव्याची ही एक चांगली पर्वणी असू शकते.

टाटा उद्योग समूहांच्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत

आरबीआयच्या निर्णयानंतर टाटा सन्सचा आयपीओ (Tata Sons IPO) येण्याची शक्यता वाडली आहे. विशेष म्हणजे टाटा सन्सचा आयपीओ येण्याची शक्यता लक्षात येताच गुंतवणूकदारांनी टाटा उद्योग समूहाच्या इतर कंपन्यांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. टाटाच्या काही कंपन्यांच्या शेअरचे मूल्य चांगलेच वाढले. सोमवारी म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी सत्र चालू असताना टाटा उद्योग समूहाच्या टाटा केमिकल्स या कंपनीचे शेअर्स साधारण 14 टक्क्यांनी वाढले. बाजार बंद झाला तेव्हा दिवसाअखेर हा शेअर 8.73 टक्क्यांच्या तेजीसह 1183 रुपयांवर बंद झाला. टाटा इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे शेअर्सही (Tata Investment Stock Price) साधारण 9 टक्क्यांनी वाढले. मात्र बाजार बंद झाला तेव्हा हा शेअर 3.60 टक्क्यांपर्यंत वाढून 7059.80 रुपयांवर पोहोचला. यासह तेजस नेटवर्क (Tejas Network) या कंपनीच्या शेअरमध्येही सत्र चालू असताना 11.04 टक्क्यांची वाढ झाली. हा शेअर 3.57 टक्क्यांच्या वाढसह बंद झाला. 

सप्टेंबर 2025 पर्यंत आयपीओ येणार?

दरम्यान, आरबीआयच्या निर्णयानंतर टाटा उद्योग समूहाला टाटा सन्स या कंपनीला सप्टेंबर 2025 पर्यंत शेअर बाजारावर सूचिबद्ध करावे लागणार आहे. म्हणजेच टाटा सन्स या कंपनीचा आयपीओ सप्टेंबर 2025 पर्यंत येण्याची शक्यता आहे. टाटा सन्स या कंपनीवर सध्या 20,270 कोटी रुपयांचे कर्ज आहे. एका अंदाजानुसार टाटा सन्स या कंपनीचे एकूण मूल्य हे 11 लाख कोटी रुपये असू शकते. म्हणजेच या कंपनीने आयपीओच्या माध्यमातून आपल्या फक्त 5 टक्के शेअर्स विकले तरी त्या आयपीओचा आकार तब्बल 55 हजार कोटी रुपयांचा होईल. म्हणजेच हा आयपीओ ह्युंदाई मोर्टसपेक्षाही मोठा असू शकतो. ह्युदाई मोटर्स इंडिया या कंपनीचा आयपीओ 27,870 कोटी रुपयांचा होता. हा आयपीओ आतापर्यंतचा सर्वांत मोठा आहे. 

हेही वाचा :

सोन्याला पुन्हा झळाळी! 450 रुपयांनी महागलं, सणासुदीच्या काळात थेट 80 हजारांचा आकडा पार करणार?

दिवाळीच्या तोंडावर आयपीओंचा धमाका! या आठवड्यात 'हे' तीन जबरदस्त आयपीओ येणार; पैसे कमवण्याची मोठी संधी

'या' दमदार आयपीओची तारीख आली, पैसे कमवण्याची वेळ झाली! दिवाळीच्या तोंडावर मिळवा दमदार रिटर्न्स!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Embed widget