(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'या' दमदार आयपीओची तारीख आली, पैसे कमवण्याची वेळ झाली! दिवाळीच्या तोंडावर मिळवा दमदार रिटर्न्स!
आजपासून एका मोठ्या कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे पैसे कमवायची ही नामी संधी चालून आली आहे.
Waaree Energies IPO : गेल्या काही दिवसांत आलेल्या आयपीओंनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलेला आहे. काही आयपीओंनी तर आपल्या गुंतवणूकदारांना थेट दुप्पट परतावा दिला आहे. दरम्यान, आता पुढचा आयपीओ गुंतवणुकीसाठी कधी येतोय, याची अनेकजण वाट पाहात होते. गुंतवणूकदारांची हीच प्रतीक्षा आता संपली आहे. कारण वारे एनर्जी ही कंपनी आपला आयपीओ घेऊन आली असून तो गुंतवणुकीसाठी आजपासून (21 ऑक्टोबर) खुला झाला आहे. येत्या 23 ऑक्टोबरपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. वारे एनर्जी ही कंपी देशातील सर्वांत मोठी सोलार PV मॉड्यूल मॅन्युफॅक्चरर कंपनी आहे. या आयपीओत गुंतवणूक करावी की नाही, याबाबतची माहिती देणारे वृत्त झी बिझनेस या वृत्तवाहिनीने दिले आहे.
Waaree Energies IPO मध्ये पैसे गुंतवावेत का?
या वृत्तानुसार वारे एनर्जी या कंपनीतील प्रवर्तक तसेच व्यवस्थापन पाहणारे कर्मचारी अनुभवी आहेत. ही कंपनी देशातील सर्वांत मोठी PV मॉड्यूल मॅन्युफॅक्चरर आहे. या कंपनीचा जागतिक तसेच भारतीय बाजारात चांगला वावर आहे. विशेष म्हणजे या कंपनीची आर्थिक स्थितीदेखील चांगली आहे. तर या कंपनीची नकरात्मक बाजू सांगायची झाली तर ही कंपनी कच्च्या मालासाठी चीनवर अवलंबून आहे.
Waaree Energies IPO ची सविस्तर माहिती
वारे एनर्जी हा आयपीओ 21 ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या आयपीओत 23 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. हा आयपीओ एकूण 4321 कोटी रुपयांचा आहे. या आयपीओत 3600 कोटी रुपयांचे फ्रेश इश्यू शेअर्स असतील. तर 721 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेलच्या रुपात विकले जातील. या आयपीओचा किंमत पट्टा 1427-1503 रुपये ठेवण्यात आला आहे. एकूण 9 शेअर्सचा एक लॉट असेल. म्हणजेच तुमच्याकडे एक लॉट घेण्यासाठी 13527 रुपये असणे गरजेचे आहे.
28 ऑक्टोबर रोजी कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार
Waaree Energies IPO मध्ये गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर 24 ऑक्टोबर रोजी शेअर्सचे वितरण होणार आहे. त्यानंतर जे गुंतवणूकदार अयशस्वी ठरले त्यांना 25 ऑक्टोबर रोजी पैसे परत केले जातील. तर यशस्वी गुंतवणूकदारांच्या डी-मॅट खात्यात 25 ऑक्टोबर रोजीच पैसे जमा होतील. 28 ऑक्टोबर रोजी ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहे. ही देशातील सर्वांत मोठी सोलार PV मॉड्यूल मॅन्युफॅक्चरर कंपनी आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
जिओ सिनेमा लवकरच बंद? आता फक्त डिज्ने हॉटस्टार; मुकेश अंबानी लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
6 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर, पण तीन दिवसांपासून लागतेय अपर सर्किट; अनेकांना केलं मालामाल!
यंदा मुहूर्त ट्रेडिंग 31 ऑक्टोबरला होणार की 1 नोव्हेंबरला? जाणून घ्या नेमकी तारीख!